घरटं

Submitted by अज्ञात on 4 September, 2008 - 00:58

कोण कुठली पक्षीण आली
आणि तिनं घरटं केलं झाडाच्या एका फांदीवर !

कांही दिवस हसली खिदळली नाचली बागडली मनसोक्त
अन अचानक उडून गेली ......

स्थितप्रज्ञ झाड; ते निश्चल घरटं जपतंय ऊन वार्‍यापासून
आपल्या पानाफुलांमधे, तिच्या अस्तित्वाच्या सयी गोंजारत
एक स्वप्न समजून............

..................अज्ञात

गुलमोहर: 

सुंदरच

तिच्या मूळच्या निवार्‍याकडे ...... हे नसले तरि चालेल, म्हणजे ती कुठे गेली ? याची एक गंमत पण वाढेल !
गोदेय

गोदेय, Happy
तुझ्या म्हणण्याप्रमाणे सुधारणा केलीय !! थँक्स.

छान...

अस्तित्वाच्या सयी गोंजारत...

झकास.