लाटणे रिटर्न्स ! (भांडणात शिरताना)

Submitted by A M I T on 7 March, 2012 - 00:05

भांडणात शिरताना तुझा धरला मी हात !
सखये गं आवर ही लाटण्याची नको बात !

भरलेल्या लोकलला आलो मी लटकून
चार जिने चढल्यावर गेलो पुरता थकून
त्या तिथल्या म्हणे आणा वाण्याकडून अंडी सात !

सांग कसे चावू मी लाडू हे मोतीचुर
शेजारील बघ काका झाले किती चतूर
डाळ इतकी पातळ नि शिजला नाही कधी भात !

मुळ गीत इथे पहा.

* * *

http://kolaantudya.blogspot.in/

गुलमोहर: