मी आहे एक पक्षी...

मी आहे एक पक्षी
ऊंच ऊंच उडणारा
नवे विश्व बनवणारा
आकाश पंखाखाली घेणारा
मी आहे एक पक्षी

मी आहे एक पक्षी
घरट्याचा शोध घेणारा
अन्नासाठी वणवण भटकणारा
पंखात बळ नसताना उडणारा
थकून आकाशातून पडणारा
मी आहे एक पक्षी

मी आहे एक पक्षी
लंगडत लंगडत चालणारा
दुस-या पक्ष्यांपासून वाचणारा
आस-यासाठी धाव घेणारा
दुस-यांनी टाकलेले दाणे टिपणारा
मी आहे एक पक्षी

मी आहे एक पक्षी
पिंज-यात एकटा राहणारा
मालक सांगेल ते बोलणारा
पिंज-यातून आकाशाकडे बघणारा
जुन्या दिवसांची आठवण कढणारा
मी आहे एक पक्षी

- अरुणकिशन
abhipray23@gmail.com


जुन्या दिवसांची आठवण कढणारा

छान.