=======================================================================
=======================================================================
कोकणमय या मालिकेतील हा पहिला भाग या भागाची सुरुवात करण्याआधी कोकण फिरण्यास/जाणुन घेण्यास मायबोलीकर नीलू, भाऊकाका नमसकर, अतुलनिय, विवेक देसाई, नीलवेद, यो रॉक्स, साधना यांनी मोलाची मदत केली. आभार परक्यांचे मानायचे असतात म्हणुन त्यांचे आभार मी मानणार नाही. खरंतर याचा उल्लेख प्रस्तावनेच्या धाग्यात यायला हवा होता, पण राहुन गेलं.
=======================================================================
=======================================================================
"योग्या, हे माझ्या गावचे फोटो" नरेश त्याच्या गावचे फोटो दाखवत होता.
कुठंल रे गाव?
कुडाळ जवळील "सरंबळ""
नरेशच्या गावचे फोटो पाहत होतो. कोकण म्हटल्यावर जसं चित्र समोर येतं तसंच ते गाव फोटोत भासत होतं. (आधीच्या भागातील प्रचि ०२ ) तीच ती लाल मातीतली वाट, काजुच्या बागा, विहिर, अंगणातले पक्षी (हॉर्नबिल आणि स्वर्गीय नर्तकाचे काही फोटो होते :-))
"चलो तर मग यंदाची कोकण भटकंती तुझ्या गावातुनच सुरू करू."
साधारण नोव्हेंबर मध्ये कोकण भटकंतीचा प्लान शिजला. पण तारीख ठरत नव्हती. डिसेंबर हरीश्चंद्रगड आणि इतर भटकंती, जानेवारीमध्ये दोघांच्याही प्रचिंचे प्रदर्शन, राजमाची आणि दिनेशदा गटग यामुळे प्लान पुढे जात होता. शेवटी कुठल्याही परीस्थिती फेब्रुवारीमध्ये जायचेच ठरले. ऑफिसमधील आम्ही सहा आणि नरेशचे दोन मित्र असे आठजण तयार झालो. प्लान तयार झाला आणि गुरूवारी ९ फेब्रु. ला रात्री निघुन मंगळवारी १४ ला पहाटे परत परतायचे ठरले. यात कुडाळ (सरंबळ), धामापूर, वालावल, निवती, वेंगुर्ला, अरवलीचा वेतोबा, रेडीचा गणपती, मोचेमाड समुद्रकिनारा, मालवण, आंगणेवाडी , सिंधुदूर्ग किल्ला, तारकर्ली, देवबाग, कुणकेश्वर आणि शेवटी विजयदुर्ग असा भरभक्कम बेत होता. निघण्याच्या आदल्यादिवशी एक टांगारू निघाला. शेवटी आम्ही सातजण ठरल्याप्रमाणे (आरामात ;-)) गुरूवारी रात्री १०:३० - ११ च्या सुमारास विक्रोळीहुन क्वालिसने निघालो. सुरूवातीला गप्पाटप्पात रमलेल्या एकेकांची विकेट रात्री १-२ नंतर पडु लागली (अर्थात ड्रायव्हरच्या बाजुला बसलेला सोडुन
). सकाळी साधारण ७-८ च्या सुमारास आम्ही कुडाळमार्गे सरंबळला पोहचलो. घर बंदच असल्याने सकाळी सगळ्यांनी मिळुन आधी घर स्वच्छ केले. बॅगा टाकल्या आणि चुल पेटवून आंघोळीसाठी पाणी ठेवले. चुलीवरच्या गरम पाण्यात एक वेगळाच गंध असतो तो मला स्वतःला खुप आवडत असल्याने आंघोळ झाल्यावर अधिकस फ्रेश वाटु लागले.
शुचिर्भुत होऊन मी आणि नरेश गावात एक फेरी मारण्यास निघालो. खरंच गाव खुप सुंदर होते. दुरंगी बाभुळ, रीठा, काजुच्या बागा पहात/ फोटो काढत फिरत असतानाच हॉर्नबील, कोतवाल, अजुन एका सुंदर पक्ष्याने दर्शन दिले (फोटो काढता आला नाही
).
प्रचि ०१
(दुरंगी बाभूळ, रीठा आणि काजू)
गावात फिरून परत घरी येईपर्यंत इतरजणांची तयारी झाली होती. नाश्ता करून आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो, त्याआधी सरंबळ गावच्या श्री देवी सातेरीचे दर्शन घेतले. मंदिराचे काम चालु होते पण मंदिर आणि परीसर खुपच सुंदर होता. ("सातेरी" म्हणजे "वारूळ".)
प्रचि ०२
श्री देवी सातेरी मंदिर (सरंबळ, कुडाळ)
प्रचि ०३
श्री देवी सातेरी
सरंबळ गावातुन धामापुरला जाण्यासाठी एक रस्ता आहे तेथुनच आम्ही धामापुर, वालावल मार्गे निवतीला (मुक्काम) पोहचणार होतो. पण त्या रस्त्याचे काम चालु असल्याने आम्हाला पुन्हा गावाला वळसा घालुन कुडाळ-धामापूर रस्त्याने जावे लागले. इथे थोडीशी गफलत झाली. खरंतर पहिल्यांदा धामापूर करून नंतर वालावल आणि मग पाट मार्गे निवती असं केलं असत तर वेळ वाचला असता पण आम्ही पहिल्यांदा वालावल नंतर धामापूर आणि परत वालावलला येऊन पाट मार्गे निवतीला गेलो. अर्थात याचा एक फायदाच झाला. आम्हाला नेरूर या निसर्गरम्य गाव पाहता आले.
सरंबळहुन थोड्याच वेळात आम्ही श्री लक्ष्मीनारायणाच्या दर्शनासाठी "वालावल" गावी पोहचलो. आजपर्यंत वालावल गावाबद्दल जे ऐकल होतं अगदी तसाच परीसर पाहत होतो. (यावेळी आमच्या कडे कॅनन 1000D आणि 1100D असे दोन कॅमेरा असल्याने एका कॅमेर्याला 75-300 लेन्स आणि दुसर्याला 18-55 लेन्स लावली होती, सारखी लेन्स बदलायला नको म्हणुन :-), अर्थात याचा फायदाच वालावल तलावाजवळ किंगफिशर, नीलपंख टिपण्यासाठी झाला.)
वालवल येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिर:
कुडाळ शहरापासुन १५ किमी अंतरावल असलेलं श्री लक्ष्मीनारायण मंदिर हे हेमाडपंथी वास्तुकलेचे उत्तम उदाहरण आहे. गर्द वनराईने नटलेलं वालावल गाव आणि मंदिरालगतचा सुंदर व शांत तलाव मंदिराच्या सौंदर्यात अधिकच भर घालतो. हे मंदिर सुमारे आठशे वर्षापूर्वेचे असल्याचे जाणकार सांगतात. या मंदिराचं बांधकाम चौदाव्या शतकात सूर्यभान आणि चंद्रभान प्रभुदेसाई या महापराक्रमी बंधूंनी केले. त्यांची स्मारके श्री लक्ष्मीनारायण मंदिरासमोरील दीपमाळांजवळ कल्याण पुरूष म्हणुन उभी आहेत. हे मंदिर पूर्वाभिमुख असुन याची रचा त्रिस्तरीय आहे. मुख्य देवळी पुरातन असून या मंदिराच्या बांधकामामध्ये पूर्णतः सागवानाचा वापर केला आहे. सभामंडपातील त्याकाळी बसवलेली लादी कारागीरांचे कसब दाखविणारी आहे. या अतिप्राचीन मंदिरात असलेले कोरीवकामाचे स्तंभ देखणे असून मंदिरात अतिशय सुंदर आणि देखणी अशी श्री लक्ष्मीनाराययाची मूर्ती आहे. मंदिराचा सभागार प्रशस्त असुन येथील दगडी खांबावर व तुळईवरही कोरीवकाम केलेले आढळते. मुख्य दरवाजा उंचीला कमी असून, त्यावर अप्रतिम कमळांच्या फुलांचे कोरीवकाम केलेले आहे. मंदिराच्या समोरील द्वारपाल तसेच डोक्यावरील विष्णूची मूर्तीही प्रेक्षणीय आहे. रामनवमीला येथे नऊ दिवस यात्रा असते. वालावल गावची कोणतीही व्यक्ती पंढरपूरची वारी करत नाही, असा गावचा रिवाज आहे. मला स्वतःला सर्वात आवडलेलं ठिकाण म्हणजे वालावल.
मुंबई ते कुडाळ अंतर ~३९५किमी. कुडाळ ते वालावर अंतर ~१०-१२ किमी.
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८
(प्रचि: नरेश)
प्रचि १९
(प्रचि: योगेश)
वालावल गावच्या निसर्गमय मोहपाशातुन स्वत:ला नाईलाजाने सोडवून घेत आम्ही धामापूरला निघालो. वाटेतच नेरूरपार हे अतिशय शांत व रमणीय गाव लागले. नेरूरपार नदीच्या पुलावरून नदीचे आणि गावचे अतिशय मनमोहक सौंदर्य दिसते. वाटेतच कलेश्वराचे मंदिर आणि त्याच्या जवळच असलेल्या आणि कमलपुष्पांनी भरलेल्या तलावाने मोहिनी घातली आणि गाडी कलेश्वर मंदिराकडे वळवली.
प्रचि २०
प्रचि २१नेरूर कलेश्वर:
कुडाळ तालुक्यातील कलेश्वराचे मंदिर अतिशय सुंदर असुन कोरीव कलाकुसरेने नटलेले आहे. चौकोनी आकाराची शिवपिंडी हे येथील वैशिष्ट्य आहे (कलेश्वर मंदिरातील फोटो घेण्यास मनाई होत). मंदिरात सहा खांब अप्रतिम कोरीवकामाने सजवले आहेत. या मंदिरा शेजारीच असलेले दुसरे व स्वतंत्र मंदिर आहे ते श्री ब्रह्मदेवाचे. ब्रह्मदेवाची मंदिरे फारशी नाहीत त्यामुळे हे मंदिर अतिशय वेगळे आणि आवर्जुन पाहण्यासारखे आहे. भारतात ब्रह्मदेवाची तीन मंदिरे असुन त्यापैकी एक नेरूर येथे असुन ब्रह्मदेवाशेजारी विष्णू-लक्ष्मी, सावित्री व गायत्री देवता आहेत. ब्रह्मा, विष्णु व महेश या तीन देवतांची मंदिरे असणारे हे एकमेव प्रसिद्ध
देवस्थान.
प्रचि २२
कलेश्वर मंदिर
प्रचि २३
प्रचि २४
प्रचि २५
प्रचि २६ब्रह्मदेवाचे मंदिर आणि मूर्ती
प्रचि २७
प्रचि २८
प्रचि २९
नेरूरपार गावच्या निसर्गसौंदर्याचा पुरेपुर आस्वाद घेत आमची गाडी निघाली धामापूरच्या भगवती मंदिराकडे.
कोकणातील धामापूर हे अजुन एक अत्यंत निसर्गसंपन्न गाव आहे. या गावचे वैशिष्ट्य म्हणजे येथील सुप्रसिद्ध धामापूरचा तलाव. सुरूवातीला आपल्याला दिसते ते येथील श्री भगवती देवीचे मंदिर. मंदिराच्या थोड्या पायर्या चढुन गेल्यावर श्री भगवती देवीचे दर्शन घडते. हे हि मंदिर पुरातन असुन कोरीव कलाकुसर केलेले आहे. मंदिराचा परिसर स्वच्छ व सुंदर असून भगवती देवीची मूर्तीही अतिशय आकर्षक व सुंदर आहे. मंदिराला लागुनच अंडाकृती रचनेचा अतिशय सुरेख तलाव आहे. पाण्यात उतरण्यासाठी पायर्यांची सोय केलेली आहे. या तलावाविषयी एक आख्यायिका सांगितली जाते ती अशी - फार पूर्वी धामापूरमध्ये ज्यांच्या घरी लग्नसमारंभ असेल, ती व्यक्ती लग्नाच्या आदल्या रात्री फुलांनी बनविलेले दागिने एका परडीत घालून ते तळ्यात सोडत असे. दुसर्या दिवशी त्या परडीतील दागिने सोन्याचे झालेले असत. लग्नसमारंभ आटोपल्यानंतर दुसर्या दिवशी ते दागिने पुन्हा तळ्यात सोडले जात असत. खूप वर्ष असं चाललं. मात्र, एका व्यक्तीला दागिन्याचा लोभ झाला आणि त्याने ते दागिने तळ्यात न सोडता स्वतःकडेच ठेवले. त्यावेळी भगवती देवीचा कोप होऊन हि प्रथा पुढे बंद झाली. स्थानिक संस्थेमार्फत या तलावामध्ये बोटिंगची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या तलावाचे वैशिष्ट्य म्हणजे कितीही पऊस पडला तरीही या तळ्यातील पाणी वाहत नाही व कितीही दुष्काळ पडला तरीही येथील पाणी आटत नाही.
कोकणातील मंदिरे मला का आवडतात हे कुणी विचारल्यास माझे उत्तर असेल, शांत, निवांत आणि स्वच्छ मंदिर व परीसर आणि तेथील आख्यायिका.
प्रचि ३०
प्रचि ३१
प्रचि ३२
प्रचि ३३
प्रचि ३४
निसर्गसौंदयाने ओतप्रोत भरलेल्या या गावांची भेट आम्हाला पर्यटन आणि तिर्थाटन या दोन्हीचा अनुभव देऊन गेली. या तीनही गावांना भेट दिल्यावर कि मला वि.स.खांडेकरांच्या एका कवितेची प्रकर्षाने आठवण झाली.
रम्य अशा स्थानी
रहावे रात्रंदिन फुलुनि
मंजुळ घंटा सांजसकाळी
गोकुळ गीते गातिल सगळी
होउनि स्वप्नी गौळण भोळी
वहावे यमुनेचे पाणी
रंगवल्लिका उषा रेखिते
सिंदुर भांगी संध्या भरते
रात्र तारका दीप लावते
पहावे अनिमिष ते नयनि
रम्य अशा स्थानी
रहावे रात्रंदिन फुलुनि.......
वालावलच्या श्रीलक्ष्मीनारायणाचे, नेरूरच्या कलेश्वराचे आणि श्री भगवती देवीचे दर्शन घेतल्यावर आम्ही पाट मार्गे "निवतीला" मुक्कामासाठी निघालो.
(तटि: मंदिराची माहिती "कोकण पर्यटन" पुस्तकातुन साभार)
(क्रमशः)
फोटो अगदी ए-वन.. परत
फोटो अगदी ए-वन.. परत दोनतिनदा पाहायला हवेत. आता एकदम घाईघाईत पाहिले.
व्वा फार छान माहिती रे
व्वा फार छान माहिती रे जिप्सी.. आणी फोटोंची तारीफ त्या त्याच शब्दात पुन्हा!!!
आम्हाला असंच अपरिचित ठिकाणी हिंडवत राहा.. परिचय करून देत राहा..
पून्हा एकदा मस्त फोटो. सहीच
पून्हा एकदा मस्त फोटो. सहीच रे जिप्सी
अप्रतिम...
अप्रतिम...
वा वा.. बर्याच आठवणी जाग्या
वा वा.. बर्याच आठवणी जाग्या झाल्या
छान
छान
काय बोलू जिप्स्या..... एवढं
काय बोलू जिप्स्या.....
एवढं सगळ डोळ्यात साठवायचं म्हणजे.. एकदा दोनदा पुन्हा पुन्हा जरा पारायणं करायलाच लागणार..
(No subject)
सुंदर वर्णन, आणि अर्थातच
सुंदर वर्णन, आणि अर्थातच प्रचि.
आता रस्ते खुपच चांगले झालेत, त्यामूळे असे भटकणे शक्य होतेय !
योगेश ती कमळे मला
योगेश ती कमळे मला पाहीजेत.
नेहमीप्रमाणेच सुन्दर.
कलेश्वर च्या मंदिरात गेल्यावर
कलेश्वर च्या मंदिरात गेल्यावर किती शांत वाटतं ना? मी तिकडे गेली कि जावुन येतेच. अन खरच वालावलचं सौंदर्य तर अपार आहे.. मलाहि खुप आवडतं तिकडे. कोणत्याहि दिवसात हिरवळच हिरवळ तिकडे असते. तसं तर कोकणात कुठेहि गेलं तरी तोच फिल असतो. तरी बरच राहिलय तुझ कोकण पाहणं.
वालवल येथील श्री
वालवल येथील श्री लक्ष्मीनारायण मंदिर:>>
जिप्सी मस्त फोटो. आणि हा माझा आजोळचा देव.
परुळे ला नाही गेलात का? मस्तच गाव आहे ते पण.
तरी बरच राहिलय तुझ कोकण पाहणं.>>
अनुमोदन
मस्त! मंदिरं फारच मस्त आहेत
मस्त! मंदिरं फारच मस्त आहेत कोकणातली!
परूळे फार म्हणजे फार सुंदर
परूळे फार म्हणजे फार सुंदर आहे.
मस्त फोटो जिप्सी. तुम्ही
मस्त फोटो जिप्सी.
तुम्ही आमच्या गावाला जाऊन आलात म्हणजे.
वा मस्तच रे. सगळीच देवळं शांत
वा मस्तच रे. सगळीच देवळं शांत आहेत. बघूनच बरं वाटतय.
जागूले एका कमळाबरोबर एक मगर
जागूले एका कमळाबरोबर एक मगर फ्री येते. ती कुठे ठेवणारेस ?
खूप खूप धन्यवाद जिप्स्या. तुझे (म्हणजे तू काढलेले) फोटो हळूहळू तूझा छाप घेउन येउ लागल्येत
अप्रतिम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म
अप्रतिम्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म
मस्त
मस्त
या महाशिवरात्रीला कोकणात जाणं
या महाशिवरात्रीला कोकणात जाणं जमलं नाही म्हणून हळहळत होतों; हळहळ खूपच सुसह्य झाली अप्रतिम प्र.चि. पाहून... पहात राहून !
अप्रतिम..
अप्रतिम..:)
खूप खूप सुंदर फोटो आहेत....
खूप खूप सुंदर फोटो आहेत.... माझ्या गावाचे!
पुन्हा एकदा भुर्रकन जाऊन यावसं वाटतय....
योगेश, सर्व प्र.चि. उत्तम
योगेश, सर्व प्र.चि. उत्तम (खाली दिलेली ३ सोडून).
प्र.चि. १५, २७ व ३० मध्ये आकाश ओव्हर्-एक्पोज झाले. आहे.

आपले ठरल्याप्रमाणे जे फोटो चुकले आहेत ते criticize केले आहेत. कृपया राग मानू नये.
लाईक
लाईक
प्रतिसादाबद्दल मनापासुन
प्रतिसादाबद्दल मनापासुन धन्यवाद.
तरी बरच राहिलय तुझ कोकण पाहणं.>>अगदी अगदी
जागूले एका कमळाबरोबर एक मगर फ्री येते.>>>>>>बाबु

आपले ठरल्याप्रमाणे जे फोटो चुकले आहेत ते criticize केले आहेत. कृपया राग मानू नये>>>>अतुलजी, राग कसला. उलट जास्तच आवडलं.
कृपया criticize करतच रहा, यातुनच अजुन जास्त शिकायला मिळेल (मनापासुन लिहीतोय).
धन्यवाद___/|\____ मनापसुन
धन्यवाद___/|\____ मनापसुन आभार कोकण दर्शन घडवल्या बद्दल
जिप्स्या सहि एकदम..
जिप्स्या सहि एकदम..
एकदम मस्त मस्त... दुरंगी
एकदम मस्त मस्त...
दुरंगी बाभूळ तर खासच.. अजून येउ दे
बाबु, जागूकडे विहीर आहे, तळं
बाबु, जागूकडे विहीर आहे, तळं आहे कुठेही ठेवेल ती मगर.
वा जिप्सी मस्तच फोटो सुधीर
वा जिप्सी मस्तच फोटो
सुधीर
Pages