वर्तुळ

Submitted by कौतुक शिरोडकर on 30 August, 2008 - 03:01

स्पर्श मातीला
माती भा़ळाला
भाळ नभाला
नभ मेघाला
मेघ भुईला
भुई स्पर्शाला

गंध फुलाला
फुल वेलीला
वेल तरुला
तरु मुळाला
मुळ मृदाला
मृद गंधाला

आसवे भावात
भाव शब्दात
शब्द काव्यात
काव्य मनात
मन डोळ्यात
डोळे आसवात

गुलमोहर: 

कविता मायबोलीत

....
आसवे ओंजळीत
थोडीशी मातीत

स्पर्श तो मातीचा
भाळी लावियला.....

आभार सार्‍यांचे.