उपक्रमातील हा पाचवा भाग वाचकांसाठी समर्पित.
२३.
लालयेत् पंच वर्षाणि दश वर्षाणि ताडयेत् |
प्राप्ते तु षोडशे वर्षे पुत्रे मित्रवदाचरेत् ||
पहिली पाच लाडाची, दहा त्यापुढिल माराची |
सोळावे लागताच द्यावी पुत्रा जागा मित्राची ||
२४.
वृश्चिकस्य विषं पुच्छे मक्षिकाया: मुखे विषम् |
तक्षकस्य विषं दन्ते सर्वांगे दुर्जनस्य तत् ||
विंचु साठवी शेपटीत विष, मुखात साठवते माशी |
सापाचे त्याच्या दातांमधि, दुष्टाचे विष सर्वांगी ||
२५.
यस्य नास्ति स्वयं प्रज्ञा शात्रं तस्य करोति किम् |
लोचनाभ्याम् विहीनस्य दर्पण: किं करिष्यसि ||
स्वत:स बुद्धी नसणार्यावर शास्त्रांचा काही न उपाय |
दृष्टी नसणार्या अंधाला आरशाचा उपयोगच काय? ||
२६.
पुस्तकस्था तु या विद्या परहस्तगतं धनम् |
कार्यकाले समुत्पन्ने न सा विद्या न तद् धनम् ||
पुस्तकांतली विद्या ही धन गेलेले परक्या हाती |
वेळ पडे तेव्हा न मिळे, मग ना धन, अन् ना विद्या ती ||
२७.
छायामन्यस्य कुर्वन्ति स्वयं तिष्ठन्ति चातपे |
फलान्यपि परार्थाय वृक्षा: सत्पुरूषा इव ||
छाया देती दुसर्याला राहुनी स्वत: उन्हात खडे |
फळेहि यांची दुसर्यासाठी, सत्पुरुषासम ही झाडे ||
दुवे:
सुभाषिते १ ते ५ - http://www.maayboli.com/node/32066
सुभाषिते ६ ते ११ - http://www.maayboli.com/node/32119
सुभाषिते १२ ते १६ - http://www.maayboli.com/node/32218
सुभाषिते १७ ते २२ - http://www.maayboli.com/node/32230
सुभाषिते २८ ते ३२ - http://www.maayboli.com/node/32490
सुभाषिते ३३ ते ३७ - http://www.maayboli.com/node/32590
सुभाषिते ३८ ते ४५ - http://www.maayboli.com/node/32633
सुभाषिते ४६ ते ५१ - http://www.maayboli.com/node/32873
पाचवा भाग मस्तच. अनुवादही
पाचवा भाग मस्तच. अनुवादही अधिक सुंदर, सोपा, रसाळ. श्लोकांची निवड एकदम छान.
हा भागही उत्तमच पहिली ३
हा भागही उत्तमच पहिली ३ सुभाषितं मला हवीच होती केंव्हा पासुन पण तुम्हाला विचारण्यासाठी एकही धड आठवत नव्हतं..... म्हणुन मनातली सुभाषितं ह्या भागात दिल्याबद्दल स्पेशल धन्यवाद
जीवनानुभवातून त्या काळी
जीवनानुभवातून त्या काळी निर्माण झालेली सुभाषितं
तुमच्यामुळे परत वाचायला मिळतायत आणि तीदेखील
सहज सोप्या अनुवादित रूपात .....
कर्णिकजी, तुम्हाला धन्यवाद द्यावेत तितके थोडेच आहेत.
<<<कर्णिकजी, तुम्हाला धन्यवाद
<<<कर्णिकजी, तुम्हाला धन्यवाद द्यावेत तितके थोडेच आहेत.>>>>अनुमोदन!
प्रद्युम्न, अर्चना,
प्रद्युम्न, अर्चना, उल्हासराव, प्रज्ञा,
शतशः आभारी आहे.
प्रतिसादांच्या घटत्या संख्येवरून दिसते की वाचकांना या उपक्रमात वाटणारे आकर्षण ओसरते आहे. अनुवादांमधे कदाचित काव्यगुण कमी पडत असतील. तरिही मूळ संस्कृत सुभाषितांची रुची वाचकांमधे वाढावी अशी जी इच्छा होती ती अपुरी राहील असे दिसते. तेव्हा आणखी दोन भागांनंतर निरोप घ्यावा म्हणतो. आपण दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद.
प्रतिसादांच्या घटत्या
प्रतिसादांच्या घटत्या संख्येवरून दिसते की वाचकांना या उपक्रमात वाटणारे आकर्षण ओसरते आहे >> छे असे काही नाही. तुम्ही लिहा.
प्रतिसादावरून लेखन योग्य की अयोग मायबोलीवर ठरवता येत नाही.
हा भाग जास्त आवडला (तिस-या व
हा भाग जास्त आवडला (तिस-या व चवथ्या भागापेक्षा - तेसुद्धा आवडले होतेच.)
तेविसाव्या सुभाषिताचे भाषांतर
तेविसाव्या सुभाषिताचे भाषांतर बदलले आहे.