Submitted by prashansa on 28 August, 2008 - 09:04
वयापरत्वे येत जाते
म्हणे एक परिपक्वता
म्हणे लाभते भावनाना
अनुभवाची रन्गीत साथ
मला मात्र जाणवत
इतकच एक सत्य
अनुभवानी व्यथा उमलते
आदर्श उत्कटता सारे
हळुहळू सम्पत जाते
विचार खुन्टतात,सन्वेदना हरपतात
नाविन्याचा जोशही सम्पतो
तोच-तोच पणा वाढत जातो
कुठलेही गाणे आता फक्त
रडगाणे वेदनेचे बनते
आर्तता व्यथा यातच सारे
खळाळते जीवन अडते!!
गुलमोहर:
शेअर करा
वयापरत्वे
वयापरत्वे येत जाते
म्हणे एक परिपक्वता _
मला मात्र जाणवत
इतकच एक सत्य
अनुभवानी व्यथा उमलते >>> अगदी खरंय.....
बाकी सर्व पटले... पण हे नाही
>>> विचार खुन्टतात,सन्वेदना हरपतात>>
विचार खुंटत नाहीत, उलट वाढतात असे मला वाटते. संवेदना ही वाढतात. कारण परिपक्वता वाढली की माणूस प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करू लागतो आणि त्यांचा जास्ती विचार करू लागतो... नाही का?
अर्थात, हे माझं मत..... बाकी कविता सुंदर आहे.
पुढच्या लिखाणासाठी शुभेच्छा!
दक्षिणा...
नावामुळे
नावामुळे कविता वाचली. लयबद्ध सहज करता आली असती पण का टाळ्ले ते कळलं नाही.
रिकाम्या अर्ध्या ग्लासाशिवाय काही दिसत नाही ते या प्रमाणे जगतात हे खरं.
दक्षिणाचा मुद्दा ही खराच.
शुभेच्छा !!!