झुला

झुला झुलता झुलता
असा माझ्याशी बोलता
झुला बोलता बोलता
पाहा कुटे विसावला

हिरव्या गालिच्यावरला
वसन्त झुला हा झुलला
झुला वेलींचा सजला
फुला फुलाने दरवळला

झुला झुलवितो हा वारा
काय शिकवितो हा वारा
काळासंगती रहाण्याला
काळासंगती जगण्याला

झुला झुलाता बालपणीचा
नीज डोळ्यावर येण्याचा
झ्य्ला झुलला तारुण्याचा
जिव्हाळ्याचा नि प्रेम गीतांचा

वार्धक्याचा झुलला झुला
वेग त्याचा मंदावला
आयुश्याच्या क्षितीजाला
झुला असाच पोहोचला


चवथ कडव तिसरी ओळ पहीला शब्द झुला आहे तो बरोबर करावा



हेमंत, गोड आहे कविता. जरा शुद्धलेखनाकडेपण लक्ष देणे.



हेमन्त, चिन्नूला अनुमोदन. छानय कविता.
ती सुधारणा तुम्ही स्वतःच करू शकता.



कविता गंभीर आहे. पण छान आहे. स्मित