काही पावशेर

Submitted by कौतुक शिरोडकर on 28 August, 2008 - 04:39

काल पाहीले मी
चांदणे भर दुपारी
कानाखाली त्याने
वाजविता तुतारी

शब्द शब्द ही मी
पुरता न वाचलेला
घेऊनी गेला त्याचा
पेपर तो शेजारी

सारेच जवळ्चे आता
जाहले मज परके
जो भेटतो तो
मागतो जुनी उधारी

मी मैफलीत त्याच्या
टाळले जाणेही माझे
कोणीतरी म्हणाले ते
माझ्यासम भिखारी

सप्तपदी सुखाचे
होते दिले वचन
ती पहाते टिव्ही
अन मी राबता बिगारी

तु दिलेले सारे
सांडुन दान गेले
विसरलो ठिगळाचे
मम फाटक्या विजारी

शोधुन सापडेना
नकाशात मज देश
रापुनी त्यास ढेकर
देती सारे पुढारी

अणु रेणुत ईश्वर
संत सांगुन गेले
२५ फुटाचे गणपती
बसवितात पुजारी

गुलमोहर: 

के एस कविता छान लिहीली आहे तुम्ही... Happy
सगळे रस एकत्र आणण्याचा प्रयत्न चांगला आहे.

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

दक्षिणा...

>>सप्तपदी सुखाचे
होते दिले वचन
ती पहाते टिव्ही
अन मी राबता बिगारी

:):)

>>अणु रेणुत ईश्वर
संत सांगुन गेले
२५ फुटाचे गणपती
बसवितात पुजारी>>हा फारच मार्मिक.. सगळेच पाव'शेर' छान!