आई !

आई... हृदयाची हाक
आई... निशब्द जाग
आई... गूज अंतरीचे
आई... नाव परमात्म्याचे !

आई... नसे केवळ काया
आई... ओंजळभर माया
आई... गगन भरारी
आई... पंढरीची वारी !

आई... दुधाळ सावली
आई... आभाळ माऊली
आई... एक अक्षयगान
आई... कर्णाचेच दान!


>> आई... पंढरीची वारी !

आई... दुधाळ सावली
आई... आभाळ माऊली
आई... एक अक्षयगान
आई... कर्णाचेच दान!

अगदी अगदी सुमतीताई. कर्णाचेच दान, ही उपमा आवडली.



आईला समर्पक उपमा देताना सगळ्याच भाषा अडखळतात. म्हणुन काय झालं ?
आवडलं.



आपली कवच कुंडलं काढून देताना कर्णाने आपल्या जिवाची पर्वा केली नाही. आई पण मुलासाठी आपल्या जिवाची पर्वा करीत नाही. म्हणून....



मस्त! आवडली. स्मित
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे!



सुमती ताई, अख्खे काव्य आवडले. प्रत्येक कडव्याचा शेवट पराकोटी दाखवतो.
परमात्मा - सर्वोच्च शक्ती
पंढरीची वारी - पराकोटीच्या भक्तीचे, परमात्म्याच्या ओढीचे प्रतिक.
कर्णाचे दान - पराकोटीची दानशूरता.



वा अश्विनी... क्या बात है !
कविता लिहिताना हे डोक्यात पण नव्हतं...



अतिशय सुंदर कविता !! पण माया का बरं ओंजळभरच ?
त्यात काही विशेष रूपक असेल, पण मला लक्षात आले नाही म्हणून विचारले.

-- शकुन



फार छान रचना.....हा विषयच ईतका अमृतमयी आहे की यावर लिहीलेला प्रत्येक शब्द अतिशय मधुर वाटतो...स्मित
आणी ही रचना म्हणजे तर मधाचे भंडार आहे...व्वा...मस्तच...स्मित



माया का बरं ओंजळभरच ?
--- जगातील 'संपुर्ण माया' ही आईच्या ओंजळभर माये समोर अगदीच लहान ठरावी... असे म्हणायचे असावे बहुधा.

मला काव्य आवडले/ भावले.



अजून एक सुरेख कविता, सुमतीताई.
आई.... नि:शब्दं जाग
क्या बात है!
खूप दिवसांनी (महिन्यांनी?) येताय मायबोलीवर.... येत रहा हो.



सुमतीजी,

खुप आवडली कवीता!!
"आई... नसे केवळ काया
आई... ओंजळभर माया"

खरच आई म्हणजे आई असते!

आपला मोबाईल नबंर द्याल का ?



किती छान लिहिलं आहेत! खूप आवडलं