सुख दु:ख

Submitted by सुमेधा आदवडे on 26 August, 2008 - 06:38

हुंदके तुझे असे की, सारे सरुन गेले
आसवांच्या त्या झर्‍यांनी जिवन भरुन गेले

एकल्याच वाटेवर ज्या चालत होते आयुष्य
वळण येता हात प्रेमाचा ते धरुन गेले

असुदे ध्यानी तुझ्या नसते ती शित छाया
उष्ण हात आपले, जर आवरुन ऊन गेले

जरी दिसे हिरवे ,सुख हे असे पर्णापरी
परीपक्व होता वादळात जे झरुन गेले

शिवाराला आठवांच्या जपले किती जरी
भुकेल्या मनाचे चांदणे ते चरुन गेले

कष्टावुदे कितीही देहास ह्या झिजुदे
संपते सारेच जर हे मनही हरुन गेले

गुलमोहर: 

सुमेधा, पर्णापरि सूख आणि आठवांचे शिवार आवडले. मात्रा आणि वृत्त तसेच शुध्दलेखन सांभाळ बाई.

धन्यवाद चिनु..:) मात्रा आणी वृत्तांचा अभ्यास अजुन चालुच आहे माझा...ड्रायव्हर शिकत आहे....:)

सुमेधा प्रयत्न चांगला आहे पण वॄत्त आणि मात्रा ह्यांचा अभ्यास चालूच ठेव... भरीचे शव्द पण टाळ गझलेतून

    ================
    हीच शोकांतिका तुझी माझी
    काच शाबूत पण चरे होते

      -वैभव जोशी यांचा गझल अल्बम ’सोबतीचा करार’!
      प्रकाशन सोहळा : १ सप्टेंबर
      एस. एम. जोशी हॉल, पुणे

      धन्यवाद मिल्या.....मी पुढच्या गझलेत आणखी सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन..