राधा

हरी.. हरी.. शोधुनी बावरी
राधा वृंदावनी
सरी.. सरी.. बोलती लोचनी
बाधा आराधनी

लपतो छळुन
छळतो लपुन
हा रास ही भावणारा
पडे ना दृष्टी
दृष्टीस सृष्टी
अन पोळतो गंधवारा

पाव्याचे सुर
सुरात चुर
नसनसात धावे नशा
ह्रदयात कृष्णा
कृष्णा तृष्णा
अतृप्त, व्याकुळ दशा

विरहाचे दु:ख
दु:खात सुख
अवतरेल तो या क्षणी
अधरात हाक
हाकेत धाक
रागाच्या वर्खी विनवणी

पुसे ती फुलास
फुलाच्या झुल्यास
द्या माधवाचा मज ठाव
सोडीन प्राण
प्राणाची आण
वेड्या अंतरी दृढ भाव

स्पंदनी नाद
नादात वाद
ही भक्ती आहे की प्रीती
गुंता मनात
मन दोलनात
उगा संभ्रमाची ही भीती


सुंदर कविता! 'राधा' हा विषयच मोहिनी घालणारा असला तरी माधुर्य पुरेपूर उतरलय कवितेत. मला आकृतीबंधही आवडला. खूप छान.



ओहो, कौतुक! अप्रतिम. चिन्नूला मोदक आणि वर तुपाची धार स्मित
मधूर!



छानच झाली आहे कविता. "राधा धारेच्या विरोधात वाहणारी राधा"



छानच झाली आहे कविता. "राधा धारेच्या विरोधात वाहणारी राधा"



छानच झाली आहे कविता. "राधा धारेच्या विरोधात वाहणारी राधा"