विरंगुळा

Submitted by अज्ञात on 26 August, 2008 - 04:16

कसे वदावे मुकेपणाचे
शल्य पंजरी गोळा
अबोल्यात वडवानळ
गुदमर दाटुन आला गळा

श्वास धुराचे धुक्यात डोळा
वय अकुंचले सोळा
भासच सारे निळे चहुकडे
जीव बिचारा खु़ळा

असो कसेही आनंदच हा
कुणी म्हणो बावळा
स्वप्न हेच संजीवन-
हा जगण्याचा विरंगुळा

...........अज्ञात

गुलमोहर: 

परत एकदा! परत एकदा चटका लावणारं. एका शब्दाने मात्रं तटले आहे, अज्ञात.
अकुंचले?
श्वास धुराचे धुक्यात डोळा..... केवळ केवळ अप्रतिम!

दाद,
तुमच्या प्रतिसादाला रोजची सकाळ आतुरलेली असते. आता दिवस चांगला जाईल !! Happy
अकुंचले - अकुंचन पावले - आताचं वय सोळाव्या वर्षापर्यंत अकुंचन पावले .
..................अज्ञात

स्वप्न हेच संजीवन-
हा जगण्याचा विरंगुळा
अगदी खरं आहे.....

भाग्यवान आहात. कारण तुमच्याकडे दृष्टी आहे. भाग्यवान मीही कारण तुमच्या डोळ्यांनी मला पाहता येते.

थँक्स चेतना. Happy
................अज्ञात

क्या बात है कौतुक, हाहि एक सुंदर प्रकार आहे व्यक्त होण्याचा !! प्रतिसादावर आपण एकदम खुष !! Happy