Submitted by बेफ़िकीर on 20 December, 2011 - 01:08
गर्दीचे वाहत जाणेही स्तब्ध वाटते आताशा
कोसळ येथे सूर्यउबेने पेंगुळलेल्या आकाशा
विस्फोटाची निर्जिवतेच्या अंतरातली निकड पहा
सृष्टीच्या या सर्वांगाची कोसळणारी दरड पहा
खंडकाव्य रचताना त्याचा होत असावा वग येथे
ओघळलेल्या वीर्यामधुनी जन्म घेतसे जग येथे
दैवाचे स्तन कुस्करणार्या इतिहासाला चौतिस गुण
चौकांमध्ये कबूतरांनी शिटल्या पुतळ्यांची भुणभुण
एक निरागस बाळ मिळो जे अवलंबुन बस माझ्यावर
वय वाढो पण देह न वाढो जगुदे केवळ प्रेमावर
मर्दालाही पान्हा फुटुदे मानवतेचा आकाशा
नसेल जर हे जमत तुला तर जा तू गुंडाळुन गाशा
-'बेफिकीर'!
गुलमोहर:
शेअर करा
प्रचंड आवडली.
प्रचंड आवडली.
वैफल्य, विषण्णता अगदी
वैफल्य, विषण्णता अगदी प्रभावीपणे प्रकट होतेय.
"मर्दालाही पान्हा फुटुदे मानवतेचा आकाशा
नसेल जर हे जमत तुला तर जा तू गुंडाळुन गाशा"
.... हे अधिक आवडलं.
आवडली
आवडली
खूप आवडली!!!
खूप आवडली!!!
वाह बेफि जी छान आहे
वाह बेफि जी छान आहे .............अक्रमकता आणि बेफिकिरपणा आवडला..वैफल्य, विषण्णता खाऊन टाकलीत.
एक निरागस बाळ मिळो जे अवलंबुन
एक निरागस बाळ मिळो जे अवलंबुन बस माझ्यावर
वाक्यात जे अवलंबुन बसेल माझ्यावर असे काहीसे पाहीजे होते ना?
कविता छानच आहे
खूप छान....
खूप छान....
वय वाढो पण देह न वाढो जगुदे
वय वाढो पण देह न वाढो जगुदे केवळ प्रेमावर
मर्दालाही पान्हा फुटुदे मानवतेचा आकाशा
>> कवितेचा गाभा थेट पोहोचला. सुंदर!!
सगळ्यांनाच कळलेली दिस्तेय.
सगळ्यांनाच कळलेली दिस्तेय. मला कशी कळायची कविता ?
सर्वांना धन्यवाद
सर्वांना धन्यवाद
रचना सुरेख.
रचना सुरेख.
बेफिजी, खुप गोड कविता मुकु,
बेफिजी, खुप गोड कविता
मुकु, 'बस' म्हणजे 'फक्त' असं इथे अभिप्रेत आहे. हिंदी 'बस' ('बस' इतनासा ख्वाब हैं वालं.). मराठी नाही. (इंग्रजी 'बस' पण नाही :फिदी:)
बेफी..... सुंदरच..!!!
बेफी..... सुंदरच..!!!
व्वा काय कविता हाय?
व्वा काय कविता हाय?

सगळ्यांनाच कळलेली दिस्तेय.
सगळ्यांनाच कळलेली दिस्तेय. मला कशी कळायची कविता ?+१
उल्हासजी+१.
उल्हासजी+१.
सगळ्यांनाच कळलेली दिस्तेय.
सगळ्यांनाच कळलेली दिस्तेय. मला कशी कळायची कविता ?+१<<<
अहो तुम्हाला नाही कळली कविता. पण इतरानां कळली की. फारच अभ्यासू कविता आहे ती. सर्व सामन्य वाचकांनच्या कळण्या पलिकडील.
कंपुबाजी जिंदाबाद.....
उत्तम. आवडली.
उत्तम. आवडली.
कविता झेपली नाही. एक भा.प्र.:
कविता झेपली नाही.
एक भा.प्र.: "शिटल्या" ह्या शब्दाचा इंग्रजी अर्थ घ्यायचा का? सगळे जण कोलावेरी पासुन फारच प्रेरीत झालेले दिसतायत
सगळ्यांनाच कळलेली दिस्तेय.
सगळ्यांनाच कळलेली दिस्तेय. मला कशी कळायची कविता ?+१<<<
आणखी एकदा वाचा नक्की कळेल तुम्हाला.
कविता झेपली नाही.>>>>>>>>>
झोपेत वाचल्यावर झेपणार कशी? जागे होवून वाचा नक्की झेपेल. आणि हो, रूचेलही!
छान कविता.
फक्त शिर्षक तेव्हढ जास्त लांब वाटलं.व्ययक्तित मत.
चांगली कविता आहे. मला कळाली
चांगली कविता आहे. मला कळाली नाही.
पण एखाद्याला स्वतःची कविता कळत नाही असंही होत असेल का कधी ?
चांगली कविता आहे. मला कळाली
चांगली कविता आहे. मला कळाली नाही.
पण एखाद्याला स्वतःची कविता कळत नाही असंही होत असेल का कधी ?
.
होतं ना. माझ्या माहितीतील एक कवी कवितेचा अर्थ विचारल्यवर सांगतात की कविता लिहीताना मी एका तंद्रीत असतो. मी काय लिहीलं आहे ते विचारु नका. तुम्ही तुमच्या परीने अर्थ घ्या.
दि.पु.चित्रे,ग्रेस हे कवी त्याच पठडीतील असल्याचा मला दाट संशय आहे .
प्रतिसादकांचा आभारी आहे
प्रतिसादकांचा आभारी आहे
गर्दीचे वाहत जाणेही स्तब्ध
गर्दीचे वाहत जाणेही स्तब्ध वाटते आताशा
कोसळ येथे सूर्यउबेने पेंगुळलेल्या आकाशा
विस्फोटाची निर्जिवतेच्या अंतरातली निकड पहा
सृष्टीच्या या सर्वांगाची कोसळणारी दरड पहा
खंडकाव्य रचताना त्याचा होत असावा वग येथे
ओघळलेल्या वीर्यामधुनी जन्म घेतसे जग येथे
दैवाचे स्तन कुस्करणार्या इतिहासाला चौतिस गुण
चौकांमध्ये कबूतरांनी शिटल्या पुतळ्यांची भुणभुण
एक निरागस बाळ मिळो जे अवलंबुन बस माझ्यावर
वय वाढो पण देह न वाढो जगुदे केवळ प्रेमावर
मर्दालाही पान्हा फुटुदे मानवतेचा आकाशा
नसेल जर हे जमत तुला तर जा तू गुंडाळुन गाशा
............................
प्रत्येक द्वीपदींचा अर्थ तर भन्नाट आहेच पण प्रत्येक ओळ ही स्वतंत्र कविता वाटावी इतकी सुंदर!!!
..............-शाम
धन्यवाद शाम
धन्यवाद शाम
छान आहे कविता. विषण्णता
छान आहे कविता. विषण्णता पोहोचली.
(No subject)
खूप सुन्दर....!
खूप सुन्दर....!
अप्रतिम रचना .., खूपच आवडली
अप्रतिम रचना .., खूपच आवडली
एक निरागस बाळ मिळो जे अवलंबुन बस माझ्यावर
ऐवजी
एक निरागस बाळ असावे अवलंबून माझ्यावर
असावे - व्ययक्तिक मत
आभारी आहे
आभारी आहे
Pages