Submitted by brpawar on 21 August, 2008 - 14:31
आपलासुर्य
आपलासुर्य
आपण आपल्या मनाला
समजावत बसावयाचे !
उधाचा दिवस चांगला उजाडेल ,
निदान आजच्या पेकश्या, वाईट नसनारा!
पन छे, कालपेकश्या हि, नको असलेला,
तासन् तास रेंगाळणारा,सुतक्या सारखा ,
असा दिवस हमखास उजाडणार,लवकर नसंपण्यासाठी,
त्याला हाकलणार कसे, अन् कुठे!
सिंदबाद च्या पाठीवरील चीवट म्हातारी सारखा ,
सदैव आपल्या मनावर पगडा ठेवुन,
जगणेच काय,पण मरणे सुध्दा नकोसे, करनारा,
आपण वाट बघत बसनार...असा दिवस मावळण्याची.
अन् उध्याचा,दिवस, चांगला उजाडेल याची......
मनाला समजावीत् उध्याचा सुर्य़ आपल्या साठी
उगवणार आहे......केवळ आपल्यासाठी.............
भास्कर पवार
गुलमोहर:
शेअर करा
सिंदबादची
सिंदबादची म्हातारी. छान. बी पोजिटीव्ह मित्रा.