वेणा

Submitted by अज्ञात on 21 August, 2008 - 12:38

खंत रेशमी धाग्याची वेणा त्याच्या जरतारी
वीण साजर्‍या वळणाची अंगावर हुळहुळणारी

गंध नवा सण हवाहवासा येतो काळ त्रिकाळी
सुहास्य हर स्पर्शात झिरपते पहाट हुरहुरणारी

बंद सयी संदूक अंध परी वाट पहातो येणारी
कवेत घेण्या आतुरतो कळ एकटीच रडणारी

...................अज्ञात

गुलमोहर: 

द्विपदी मना भावणारी.

थँक्स कौतुक. Happy

पहिली द्विपदी मस्त, दुसरीपण आवडेल अशी, तिसरी मात्र कळली नाही