Submitted by अविकुमार on 19 August, 2008 - 12:06
भूल
आज का काही कळेना, अडखळते पाऊल आहे
शांत शांत सागरामध्ये, वादळाची चाहूल आहे
आप्त माझे तुझीया पायी, मीच का रे पायदळी?
विनवते प्रभुला किती ते, केविलवाणे फुल आहे
आज अडला श्वास देही, प्राण कंठी दाटले
तमा कुणाला जो तो, स्वत:मध्ये मश्गूल आहे
जाळुनी जन्मभरी स्वत:ला, भाजली रे भाकरी
प्रितभरल्या फुंकरीला तरसे, मी विझणारी चूल आहे...
अर्पिले सर्वस्व तुजला, वसविले मनमंदिरी
हात नाही जोडले, हीच माझी भूल आहे?
- अवि
गुलमोहर:
शेअर करा
नेहमीचीच
नेहमीचीच पळवाट. गझलचं मिटर जमत नाही हो. ते सांभाळता सांभाळता सगळी उर्मी निघुन जाते मनातली
प्रयत्न
प्रयत्न करत रहा. सुरेश भटांची गझलेची बाराखडी sureshbhat.com ला आहे. सुंदर गझला ही आहेत. एवढं सोपं नसलं तरी साध्य आहे. शुभेच्छा !!!
अविकुमार,
अविकुमार, तुम्ही नक्कीच उत्तम गजल लिहू शकाल. हा आकृतीबंध तर गजलेचा दिसतो. सगळेच काफिये आवडले.
छान लिहिताय.
वाह वाह!
वाह वाह! अलभ्य लाभ. दादकडुन दाद मिळणं ही खुप आनंदाची गोष्ट आहे. ज्यांची लिहिली गेलेली ओळनओळ वाचण्यासाठी आम्ही आतुर असतो त्यांच्याकडुनच दाद मिळणं म्हणजे.. वाह. 'याच साठी केला होता हा अट्टाहास'. धन्यवाद दाद!
धन्यवाद कौतुक. नक्की प्रयत्न करीन !
ग़जल जमत
ग़जल जमत आलीये की बरीचशी, जरा काम केलं तर निर्दोष होईल, आवडले सगळेच शेर
खूप
खूप छान.
हीच माझी भूल आहे,
येथे, हीच माझी का भूल आहे, हे जास्त
समर्पक होईल.
धन्यवाद
धन्यवाद अलका. पण 'का' मुळे गेयतेमध्ये ( मीटर का काहीसे म्हणतात त्याला बहुतेक!) गडबड नाही का वाटणार? दोन्ही ओळी मी जरा मनातल्या मनात म्हणुन पाहिल्या, तेव्हा असं वाटलं. काय वाटतं?