पावसात

एका साऊथच्या गाण्याचे सुर लोकलमधे ऐकले आणि सुचलं. ते तुमच्यासाठी...थोडं फिल्मी....

भेट .. थेट .. पावसात
खेट .. नीट ..पावसात
संधी अशी मिळते कुठे गं ? गं साजणी
संधी अशी मिळते कुठे गं ?
मोकळ्या मनाने असा, गं पाऊस
नेहमीच पडतो कुठे गं ?
गं साजणी, संधी अशी मिळते कुठे गं ?
आढे वेढे .. पावसात
नको वेडे .. पावसात
घे उरात भरुनी गारवा, गं साजणी
घे उरात भरुनी गारवा
सृष्टीच्या या नर्तनात गं, थिरकु दे
चिंब जीवाचा पारवा
गं साजणी, घे उरात भरुनी गारवा
मंद गंध .. पावसात
धुंद बंध .. पावसात
श्याम मेघांच्या चुंबनी, गं साजणी
विद्युलता झेपावली, गं धरणी
लोपली कुशी लाजुनी
गं साजणी, श्याम मेघांच्या चुंबनी
लाडे लाडे .. पावसात
चल गडे .. पावसात


स्मित छाने. चाल लावलीस का? एक दोन ठिकाणी अडखळेलसे वाटतयं. त्या साउथच्या गाण्याची चाल बसत असेल तर लावून इकडे अपलोड कर.



चिनु, 'आपडी पोड पोड' असं काहीस गाणं आहे ते. हे अपलोड वगैरे च्या भानगडी जमत नाहीत रे. अजुन इतका संगणक माहीतीगार झालेलो नाही. पण बघतो प्रयत्न करुन.
शुद्धलेखनाच्या चुका दिसल्या तर जरा सांगत जा म्हणजे दुरुस्त करता येतील. हल्ली मराठीचा संबंध वर्तमानपत्र वाचण्यापुरताच राहीलाय.



स्मित तू गाणं तर बसव. इकडे जाणकार मंडळी तुला नक्की मार्गदर्शन करतील अपलोड करायला. चाल डोक्यात ताजी असेपर्यंत रेकॉर्ड केलेले बरे.
शुद्धलेखनाचे फार मनाला लावून घेऊ नकोस रे. मी पण अजून शिकतेच आहे.