Submitted by बेफ़िकीर on 29 November, 2011 - 09:38
उर्मी विझली
कचरा जाळू
बोकड कापा
मी मी नाही?
पेनासाठी
चावट मांड्या
फाकत पीती
ओघळ शाई
डोहामध्ये
मैथुनमंथन
प्रबोधनाचा
डिंक मुखाला
अवघड खेडे
पेलत पळती
या प्रतिभेचे
कुंटणखाने
ये चल मृत्यो
या श्वासाला
वा ठर खोटा
जगासारखा
किंवा मग या
शब्दांमध्ये
लाटा नाचव
कुजक्या कुजक्या
अंतिम सत्ये
गटारगंगा
आणि मुलामे
अत्तरफाये
कुत्रे वाघुळ
घुबडे कोल्हे
माणुस उंदिर
काहीबाही
-'बेफिकीर'!
गुलमोहर:
शेअर करा
बेफी द व्हॅम्पायर यांची ही
बेफी द व्हॅम्पायर यांची ही कविता वाचताना रात्रीच्या बारा वाजता स्मशानात एकटेच असल्याचा भास झाला...
( ब्येणं लैच खोलात शिरलंय याधरला ...पैलं कडवं डोस्क्यावरून गेलं ..:फिदी: )
किरण, पहिल्या कडव्यात
किरण, पहिल्या कडव्यात ''मी,मी नाही'' असे वाचल्यास समजून येईल.
फार जबरदस्त कविता. अंतर्मुख व्हायला झाले.
मी बोकड कापणार नाही की, कापला
मी बोकड कापणार नाही की, कापला तरी तो मी मी करणार नाही???
ओक्के... आत्ता कळलं.. थँक्स
ओक्के... आत्ता कळलं.. थँक्स डॉक !
बाकीच्या व्यथा समजल्या होत्या
बाकीच्या व्यथा समजल्या होत्या मी पण पहिल्या कडव्याला किरणसारखा भंजाळलो होतो.
बरेच काही सांगणारी कविता
बरेच काही सांगणारी कविता
रसग्रहण कवितेची मांडणी
रसग्रहण
कवितेची मांडणी विलक्षण आहे. नवनवीन प्रतिमांची निवड आणि त्याचा सहज वापर ही कवितेची बलस्थाने दिसतात. या कवितेचा अर्थ सरळ सरळ कॅलिडोस्कोप प्रमाणे दिसणार आहे. पण विरोधाभास दर्शवताना, वास्तव मांडताना दिलेली ट्रीटमेंट लक्षात राहते.
उर्मी विझल्यानंतर मी काय शिल्लक राहतो हा कवीचा विचार याआधीही कवीने एका गझलेत मांडल्याचं आठवतं. (चु. भू. दे. घे.(). वैचारिक बैठक पक्की असल्याने प्रतिमा बदलत्या राहील्या तरीही एक सुसंगती दिसून येते.
शेवटचे कडवे नसते तरी चालले असते असं वाटून गेलं. पण हा निर्णय आणि अधिकार कवीचा आहे .. हे फक्त एक मत असं समजावं...
कळाली नाही
कळाली नाही
विलक्षण प्रतिभाविलास. "ये चल
विलक्षण प्रतिभाविलास.
"ये चल मृत्यो
या श्वासाला
वा ठर खोटा
जगासारखा"
कवीने अज्ञाताला दिलेले आव्हान परिणामकारी आहे.
बरेच काही सांगणारी
बरेच काही सांगणारी कविता>>समजनार्याला.
कळाली नाही>>>>>मलाही नाही.
नाही बाबा माझ्या मेंदुची क्षमता,रसग्रहण झाल्यास ऊत्तमच.
सर्वांचा आभारी आहे.
सर्वांचा आभारी आहे.
स्वतःच्या उर्मीत वावरणार्या,
स्वतःच्या उर्मीत वावरणार्या, सदैव मी मी करत माझेच खरे असे काहीसे वर्णन असावे.
कल्पनाविलासाची परिसीमा..!!
कल्पनाविलासाची परिसीमा..!! अफाट..!!
बेफीजी दंडवत..!
वा भाई वा! उपेक्षितांचे
वा भाई वा! उपेक्षितांचे अंतरंग....
भट्टी मात्र जमल्ये!!
पण....
जुना पसारा
जुनेच गंठण
पुन्हा नव्याने
उलगडले!
आग जुनी ती
जुना निखारा
जुन्या वादळा
नवा किनारा!
प्रतिभावंत साहित्यिकाचा
प्रतिभावंत साहित्यिकाचा कोंडमारा नेमक्या शब्दांत व्यक्त केलाय बेफिकीर तुम्ही! टीचभर पोटाची खळगी भरायला कायकाय तडजोडी कराव्या लागल्या असतील त्याला, देव जाणे! स्वत: मरायला तयार नाही (पहिलं कडवं), पण मृत्यूला आव्हान देतोय (पाचवं कडवं)! विरोधाभास हेच मुळी जिणं झालंय त्याचं! यावर अधिक काय लिहायचं आता?
आपला नम्र चाहता,
-गामा पैलवान
खूपच आवडली.
खूपच आवडली.
कल्पनाविलासाची परिसीमा..!!
कल्पनाविलासाची परिसीमा..!! अफाट..!!>>>>>>खालिल कडव्यात"विलासी" कल्पनेची परिसिमा
गाठलीय,भनानल डोक राव.
पेनासाठी
चावट मांड्या
फाकत पीती
ओघळ शाई>>>>
फ.ड.तू.स.
फ.ड.तू.स.
बा. सी. मर्ढेकरांची (पिपांत
बा. सी. मर्ढेकरांची (पिपांत मेले ओल्या उंदिर),स्टैल चोरायचा एक असफल प्रयत्न आहे हा !!
बेफि तू फक्त गझला किंवा 'सीमा गैलाडच' कर यार.......... तुझ्यानं नाय व्हायचं हे .
गूढ, आशयघन नावाचा प्रकारच नाहीय यात सगळं कसं ओपेन-टोपन आहे तुझ्या गैलाड सारखं.
नवीन प्रतिसाददात्यांचा आभारी
नवीन प्रतिसाददात्यांचा आभारी आहे.
नेहमीप्रमाणेच टुकार
नेहमीप्रमाणेच टुकार
उर्मी विझली कचरा जाळू >>> काल
उर्मी विझली
कचरा जाळू
>>> काल ह्या अर्ध्या कडव्याचा अर्थ लागला ( तसे वाटले )
असो .
गंभीर समीक्षकांना मी विनंती करतो की ह्या कवितेवर काही तरी बोलावे
काही कालावधीतच आम्ही येथे
काही कालावधीतच आम्ही येथे लिहू
कळावे
गंभीर समीक्षक
ये चल मृत्यो या श्वासाला वा
ये चल मृत्यो
या श्वासाला
वा ठर खोटा
जगासारखा.....
कमी शब्दात बरेच काही मांड्ले आहे ....
कवी बेफिकीर यांच्या या
कवी बेफिकीर यांच्या या रचनेबाबत लिहावे असे अनेकदा मनात आले होते. मात्र तो मोह टाळला याचे कारण ज्या वेगाने ते लिहितात त्या वेगाने आम्ही वाचूही शकत नाही. त्यामुळे गप्प बसलेलो होतो. मात्र आज जाणकार रसिक प्रसाद गोडबोले यांनी आवाहन केल्यावर पुन्हा लिहायचा मोह झाला. तर 'उर्मी विझली कचरा जाळू' या रचनेबाबत आमची मते खालीलप्रमाणे आहेत.
-------------------------------------------------------------------------------
उर्मी विझली
कचरा जाळू
बोकड कापा
मी मी नाही?
काव्यलेखनाची आणि आकृतीबंधात कल्पना नैसर्गीकतेचा आव आणून बसवण्याची उर्मी आता विझली आहे. कवी उर्मी गेली किंवा संपली म्हणत नाही तर विझली म्हणतो. विझण्यात मुळातच एक अशाश्वतता आहे कारण जेथे अग्नी असतो तेथे एक दिवस अग्नी नाही अशी स्थिती येणारच असते. आता अवस्था अशी आहे की कवीमनाला नवीन काहीच करावेसे वाटत नाही पण 'मी काहीतरी नवीन करत असतो' हे दाखवण्यातील पतप्रतिष्ठा मात्र हवीशी राहिलेली आहे. अशा वेळेस पुन्हा अग्नी कसा निर्माण होईल यावर विचार करताना कवीला कल्पना सुचते ती आजवर निर्माण केलेला कचरा पुन्हा जाळून अग्नी निर्माण करण्याची व स्वतःची पतप्रतिष्ठा टिकवून ठेवण्याची. हा वाममार्ग स्वीकारण्याची वेळ येण्याचे कारण हे की कवीला खोट्या प्रतिष्ठेची खरी अभिलाषा तर आहे पण खर्या निर्मीतीची खोटी तयारी करण्याचीही तयारी नाही. येथे कवी प्रामाणिक होताना दिसतो. पुढील ओळींमध्ये ही प्रामाणिकता गडद होत जाते. कवी म्हणतो की नवीन निर्मीती व्हावी म्हणून देवाला बोकड कापायला हवा. देवाला नवस बोलून आपण प्रसाद म्हणून काव्यनिर्मीतीची प्रतिभा देवाकडे मागतो याचा कवीलाच पश्चात्ताप होतो व कवीला स्वतःचीच घृणा वाटू लागते. तो स्वतःलाच एक प्रश्न विचारतो की 'देवानेच जर ही प्रतिभा तुला दिलेली आहे तर मग तू कोण आहेस? कोणीच नाहीस तू? म्हणजे तुला मिळालेला रसिकांचा आश्रय खरे तर देवदत्त देणगीला मिळायला पाहिजे, तुला नव्हेच?"
या उद्विग्नतेतून कवी अधिक पसरटपणे आपल्या भावना मांडायला सिद्ध होतो.
पेनासाठी
चावट मांड्या
फाकत पीती
ओघळ शाई
कवी स्वतःच्या लोभी मनाला साहित्यक्षेत्रातील कुलटा अथवा शीलभ्रष्ट स्त्री मानत आहे. या ओळींमधील पेन ही नवनिर्मीतीचे टोकदार साधन असून मांड्या या त्या शीलभ्रष्ट स्त्रीची अनैतिकता दाखवत आहेत. टोकदार नवनिर्मीती व्हावी अशी इच्छा असायच्या ऐवजी टोकदार नवनिर्मितीचे साधनच आपल्याला मिळावे असे त्या भ्रष्ट स्त्रीला वाटत आहे. यामुळे ती साध्य काय हे दुर्लक्षून साधनांवर लक्ष केंद्रीत करत त्या साधनांना आपल्या मांड्या फाकवून स्वतःत सामावून घेत आहे. या मांड्या इतक्या चावट आहेत की पेनातून गळलेली शाईसुद्धा त्यांच्या तात्कालीन हव्यासाला शांत करेल असे त्यांना वाटत आहे.
डोहामध्ये
मैथुनमंथन
प्रबोधनाचा
डिंक मुखाला
मेंदू हा एक डोह आहे व मेंदूमध्ये आलेले सर्वच विचार काय तर एक टक्का विचारही माणूस व्यक्त करत नाही. याच वर्मावर बोट ठेवून कवी स्वतःलाच हिणवतो आहे की अरे तुझे मन तर मैथुनाच्या (येथील अर्थ साहित्यातील भ्रष्टतेच्या) विचारांनी ओसंडून वाहत आहे पण समाजासमोर मात्र तू जणू कोणी समाज सुधारक असल्याच्या थाटात वावरत आहेस. येथे कवी प्रबोधनाचा मुखवटा मुखाला असे म्हणत नाही तर डिंक मुखाला म्हणतो हे विशेष. याचा अर्थ असा की मुखवटा तर वेळोवेळी त्या त्या प्रसंगाला साजेसा लावता येईल, पण तो लावण्यासाठी जो डिंक लागेल तोच मुळी प्रबोधनाचा डिंक असू द्यावा म्हणजे कोणत्याही भूमिकेत आपण असलो तर सर्वांचे भलेच करणार आहोत असे सर्वांना वाटत राहील.
अवघड खेडे
पेलत पळती
या प्रतिभेचे
कुंटणखाने
येथे कवी म्हणतो की निदान तो स्वतः इतका तरी प्रामाणिक आहे की त्याला हे समजत आहे हे तो मान्य तरी करतोय. आता अडचण अशी आहे की एकाच मनात स्वतःबद्दलची घृणा आणि त्याच मनात पुन्हा प्रतिष्ठेचा लोभ अशा दोन्ही परस्परविरुद्ध भावना सांभाळून पुढे कसे जायचे? कवी म्हणतो हे मन म्हणजे जणू एक अवघड खेडेच आहे जे परस्परविरोधी विचारांच्या वस्त्यांनी समृद्ध असून ते वागवायला एकच उपाय आहे ते म्हणजे आपली प्रतिभा, जिला आपण क्षणोक्षणी जगासमोर आणून जणू तिला एका कुंटणखान्यातच बसवली आहे. त्याच प्रतिभेचे तेच कुंटणखाने आपल्या मनातील या परस्परविरोधी भावनांच्या मूक युद्धाला सामावून घेतही आपल्याला पुढे जगायला ताकद देतील ती केवळ पुन्हा पुन्हा काही ना काही लिहिल्यामुळेच. म्हणजे कवी म्हणतो की जोपर्यंत तो प्रकाशात येत आहे तोवर त्याला त्याच्या मनातील या द्वंद्वाची बोच तितकीशी जाणवणार नाही.
ये चल मृत्यो
या श्वासाला
वा ठर खोटा
जगासारखा
मात्र कवीला सत्य माहीत आहे. सत्य हे आहे की कधीतरी लेखणी थांबेल, कल्पना संपतील, मनाची प्रकाशात राहण्याची ओढ संपेल आणि तेव्हा हे द्वंद्व इतके भीषण स्वरूप घेऊन पुढे येईल की मृत्यूसुद्धा लवकर येणार नाही. म्हणून कवी घाबरून आत्ताच मृत्यूला सांगतोय की एक तर यायचे असलेच तर आत्ता या क्षणी ये अन्यथा कधीच येऊ नकोस. तू कधीच येणार नसलास तर निदान मी ते द्वंद्व एन्जॉय तरी करेन. एक तर या क्षणी येऊन खरा तरी ठर नाहीतर हे जग जसे मायावी आणि मिथ्या आहे तसा खोटा तरी ठरून कधीच मला गाठू नकोस.
किंवा मग या
शब्दांमध्ये
लाटा नाचव
कुजक्या कुजक्या
कवी पुढे मृत्यूला अतिशय उद्वेगाने म्हणतो की यातील काहीच करायचे नसल्यास मग शेवटी माझ्या शब्दांमध्ये प्रतिभेचे भास होतील अशा मात्र प्रत्यक्षात अतिशय दुर्गंधीयुक्त आशयाच्या व कल्पनांच्या लाटा नाचव. थोडक्यात म्हणजे जे आज होत आहे तेच चालू ठेव. थोडक्यात कवी मान्य करतो की मृत्यू तर काही आपल्या दोन चॉईसेस पैकी एक निवडणार्यातला नव्हेच, त्याच्यावर आपले नियंत्रणच नाही. म्हणजेच जे जसे आहे ते तसेच चालू राहणार. कवी हताश व असहाय्य होतो.
अंतिम सत्ये
गटारगंगा
आणि मुलामे
अत्तरफाये
कवीची निराशा स्पष्ट डोकावते अशा या ओळींचा अर्थ तर स्पष्ट आहेच पण त्यातील शब्दयोजना रसिकांना भावली की नाही याबाबत आम्हाला कल्पना नाही.
कुत्रे वाघुळ
घुबडे कोल्हे
माणुस उंदिर
काहीबाही
येथे कवी निराशेचे असे टोक गाठतो जेथे तो स्वतःची तुलना मूक व माणसाला ज्यांचा सहसा तिरस्कारच असतो अशा प्राण्यांशी करतो. त्याला असे वाटते की प्रतिभाच जेथे भ्रष्ट आहे आणि कुंटणखाने काढून बसली आहे आणि आपले मनच जिथे लोभी आहे तिथे आपल्यात आणि या प्राण्यांमध्ये फरक तो काय?
आम्ही आम्हाला जाणवलेला अर्थ फक्त सांगितला. कवितेची समीक्षा नंतर करू, दरम्यान अर्थाबाबतचे मत योग्य चांगले वाईट वाटल्यास अवश्य कळवावेत.
कळावे
गंभीर समीक्षक
"ये चल मृत्यो या श्वासाला वा
"ये चल मृत्यो
या श्वासाला
वा ठर खोटा
जगासारखा"
हे कडवं आणि त्यातला आशय समजला अणि आवडला.
-------------------------------------------------------------------------------------------------
बाकी कवितेतून एक प्रकारचा जबरदस्त वैफल्याचा भाव डोकावतोय असं काहीसं वाटलं.
हाच भाव कवितेतून मांडायचा उद्देश असेल तर तो नक्की सफल झालाय असं वाटतं.
नव्याने वा नवीन प्रतिसाद
नव्याने वा नवीन प्रतिसाद देणार्यांचा आभारी आहे
-'बेफिकीर'!
@गंभीर समीक्षक - एक
@गंभीर समीक्षक - एक चारोळी
नाकापेक्षा नथ जड
अंगापेक्षा बोंगा मोठा
चिरफाड ही लटांबर हे
कविता छोटी प्रतिसाद मोठा
कविता तर कळलीच नव्हती, त्यात हा प्रतिसाद डोक्यात गेलाय :रागः
धन्यवाद
धन्यवाद
गंस चा प्रतिसाद वाचून नीट
गंस चा प्रतिसाद वाचून नीट कळाली. धन्यवाद
Pages