तेच ते.. तेच ते..

ह्याला अगदी विडंबन नाही म्हणता येणार.. पण तरी best suitable section हाच राहिल माझ्यामते.. स्मित
काल विंदा करंदिकरांची एक कविता वाचण्यात आली...
http://www.maayboli.com/cgi-bin/hitguj/show.cgi?tpc=103385&post=228725#P... बघा..
अगदी असेच काहिशी स्थिती असल्याने न राहवून मी केलेली तोडफोड...

सोमवार पासून रविवार पर्यंत... तेच ते तेच ते...
तोच प्रोजेक्ट.. तेच भांडण...
तेच slogging... तेच जागरण...
तीच चिडचिड.. तेच रडणे..
तेच मूर्ख.. तेच शहाणे...
सोमवार पासून रविवार पर्यंत... तेच ते तेच ते...

डोमेन बरेच बद्लून पाहिले..
कारण जॊब बदलणं शक्य नव्हतं...
बॅंके पासून टेलिफोन...
सगळी कडे तिच बोंब...
सतत चालू गुर्हाळ आमचे....
तुझ्या प्रोजेक्ट मधे issues कोणते...
सोमवार पासून रविवार पर्यंत... तेच ते तेच ते...

Verticals च्या झाडावर ODC ची वटवाघळे...
त्या प्रोजेक्ट्स चे शिल्पकार...
Knowledge थोडे.. सोंगं फार...
Design मधल्या भूतचेष्टा..
तर coding मधल्या माकडचेष्टा....
१०० team leads, एकच रंग...
दिखाऊपणाचेच सारे ढंग...
पुन्हा पुन्हा तेच भोग...
Promotion च्या हव्यासाचा जूनाच रोग...
तेव्हडीच रेटिंग... तितकाच पगार...
तेच apprisal.. तिच मारामार...
सोमवार पासून रविवार पर्यंत... तेच ते तेच ते...

करीन म्हंटले पत्ता कट..
सोंग करणार्यांचा... भांडत बसणार्यांचा...
डोकं नसलेल्यांचा... चूका करणार्यांचा...
पण कुठल्याशा पूर्व पुण्याईवर...
बनून येतात पुन्हा lead...
तेच ते... तेच ते....
सोमवार पासून रविवार पर्यंत... तेच ते तेच ते...


>>Knowledge थोडे.. सोंगं फार...
Design मधल्या भूतचेष्टा..
तर coding मधल्या माकडचेष्टा....
१०० team leads, एकच रंग...

स्मित:) अगदी अगदी. छान जमलयं.



ह्याला 'तीच ती तीच ती........विमनस्कता' हे नाव कसं वाटेल? फिदीफिदी



खूपच विमनस्कता आलेली दिसतेय तुला. स्मित



मस्त. आणि सायो ने सुचवलेले नाव पण अगदी फिट्ट. स्मित
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरूनी ऊन पडे!



तेव्हडीच रेटिंग... तितकाच पगार...
तेच apprisal.. तिच मारामार...
>>> हे खरं बोचतंय, बाकी तेच ते चालतं, हो ना आदमा? फिदीफिदी
--------------------------------------
अताशा असे हे मला काय होते
कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते..



घन्स चिनू, आशू..

सायो, रूनी.. अगदी अगदी.. स्मित

पूनम.. अ ओ, आता काय करायचं



अस झाल व्हय रं.. लई वाईट झालं बाबा... स्मित - स्मित