साद (२०१२ ची)

प्रेरणा: पुलस्तिची गझल--- पडसाद
आणि मायबोलीवरचा एक सुपरिचित BB

एक दुर्री तीन अठ्ठा, साद नि प्रतिसाद आहे
केवढा व्यासंग त्यांचा हासवांची दाद आहे

कोणत्या टक्क्यात मी? का? ते मला कळलेच नाही
केवढे संदर्भ त्याला अन जुना प्रवाद आहे

एक पानाच्या कडेला मूल बोबड बोलले, "ह्या
सुद्दलेखन फाल मंजे फाल मोथी ब्याद आहे"

जांभळे घाला तुम्ही पण पांढर्‍यांमध्येच का रे?
हातिमा त्या किरमिजीचा केवढा उन्माद आहे

रामराज्याने जगी होतेच की काही भले, पण
कोणत्या सालात होते नेमका हा वाद आहे


proud.gif



फिदीफिदी
फिदीफिदी
पण पुन्हा एकदा सांगतो-
२०१२ नाहीच. २०१६च!!
--
हस्सरा नाचरा, जरास्सा लाजरा-
सुंदर साजिरा, श्रावण आला..!



फिदीफिदी मस्तच रे देवा
****************************
खो खो खो खो खो खो खो खो



मी तल बुवा हसुन गेत्ल खुप
स्मित



देवदता
सांभाळून रे बाबा...
इथे पण टाळं लागेल.... खो खो



देवा ...जबरी

खो खो हाहा

    ================
    ऐक माझ्या आसवांची मागणी आता नवी
    रोज रात्री आठवांची ती जुनी मैफल हवी

      -एक झलक, वैभव जोशी यांच्या लवकरच येणार्‍या ’सोबतीचा करार’ या गझल अल्बमची!



      >>ह्या सुद्दलेखन फाल मंजे फाल मोथी ब्याद आहे
      हा हा हा! देवा, सहीच स्मित



      जबरी रे हाहा



      तो बीबी कोणता ते कळ्ळं नाही. पण विडंबन जबरी जमलय, देवा.



      सर्वांना धन्यवाद..स्मित
      >>तो बीबी कोणता ते कळ्ळं नाही.
      अरे ये वो बीबी नहीं जानती.. स्मित..
      'चालू' घडामोडी वर अफाट विनोदी मालिका चालु होती काही दिवस.. (जी मी संपल्यावर पाहिली)



      >>तो बीबी कोणता ते कळ्ळं नाही.

      दाद, हल्ली हितगुजवर येणं होत नाही का??

      देवदत्त - कविता खुप आवडली. विडंबनाखाली उगीच टाकली. मुळ कविता म्हणुनही सहज चालली असती.

      एक पानाच्या कडेला मूल बोबड बोलले, "ह्या
      सुद्दलेखन फाल मंजे फाल मोथी ब्याद आहे"

      हे तर मस्तच

      साधना.



      मस्त रे. एकदम परिपाक आहे सगळ्या चर्चेचा... अरे एक मस्त इनोदी लेखमाला होईल रे हे सगळं त्यात टाकुनशान... इचार करा आता कोणीतरी...



      सही...... फिदीफिदी



      दाद, अख्खं रामायण घडल्यावर तू विचारतेस रामाची सीता कोण म्हणून? फिदीफिदी
      असो. तो बीबी चालू घडामोडींवर 'तेव्हा' 'चालू' होता. घडून-मोडून-मुरडून-कुस्करून-चिरडून-रडून-ओरडून तो आता चिरनिद्रा घेत पडलाय तिकडं.
      डोक्याची मंडई-दह्यांडी-कुरडई करून घ्यायची असेल तर जरूर वाच.
      --
      हस्सरा नाचरा, जरास्सा लाजरा-
      सुंदर साजिरा, श्रावण आला..!



      देवा!! सही रे. हाहा



      "ह्या
      सुद्दलेखन फाल मंजे फाल मोथी ब्याद आहे"
      >>>>>>>>>
      देवा, जबरी.... हाहा
      ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
      'स्प्लिट्सव्हिला' मधून गेल्या शनिवारी रितु बाहेर.



      धन्यवाद लोकहो..स्मित
      साधना.. हे विडंबन आहे म्हणून विडंबनाखाली टाकलं बाकी काही नाही..स्मित



      वा वा.... ' तो' बी बी आता इथे परत चालु करुया.....

      || हरिण ओम || आज्जी..... परत या हरणावर बसून....

      ---------------

      || हरिण ओम ||
      सर्व धर्मान परित्यज्य माम एकम हरणं व्रज |