नमस्कार मंडळी.
मी गगो बोलतोय.
होय तोच गगो, जिथे येऊन तुम्ही खेळता, बोलता, थट्टा - मस्करी करता आणि हो कधी कधी भांडतासुद्ध्हा..
तर आज म्हटलं जरा स्वत: तुम्हालोकांशी गप्पा माराव्यात. खरं तर मी आलोय ते तुम्हा सगळ्यांचे आभार मानायला. कशासाठी? तर अहो तुम्हीच तर मला अस्तीत्व दिलंत. एक कुटुंब बनलोय आपण.
आपण सगळे इथे जमतो कधी घटकाभर तर कधी तासन् - तास, कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षपणे, कधी खर्या नावाने तर कधी डू आयडी घेऊन पण येतो हे खरं. आपण इथे आलो, गप्पा मारल्या कधी भावूक होऊन तर कधी खडाजंगीपण झाली. पण आपण मात्र अभेद्य राहिलो.
सगळी सुखं - दुखं सामावून घेतली. चांगल्या चार गोष्टी सांगितल्या. थोडक्यात मालकांनी म्हटल्याप्रमाणे "कुणी निंदा, कुणी वंदा, माणसे जोडण्याचा आमुचा धंदा!" हे वाक्य सार्थ ठरविलं. वेगवेगळ्या सणांच्या दिवशी मला सजवलंत, हक्काने इथे येऊन आनंद आणि त्याबरोबर दुखंसुद्धा वाटून घेतलीत. इतकं सुंदर कुटुंब तुम्ही मला दिलंत, मग त्याबद्दल मला आभार नको मानायला तुमचे
इथे चालणारी धमाल, ऐकविल्या जाणार्या गझला, कविता, हास्यविनोद या सगळ्यांचा मीसुद्धा मनमुराद आनंद उपभोगत होतो. आणि आता तर दिवाळी आलीये. मग केला विचार पक्का आणि म्हटलं की आज आपणही गप्पांचा फड मांडायचा... आपणंही आपले विचार इथे मांडावेत, हसून-हसून गडबडा लोळावं, रागानं थोडावेळ खट्टू व्हावं म्हणून हा सगळा प्रपंच.
आज आपल्या कुटुंबात किती सदस्य आहेत याची गणनाच न केलेली बरी. काही नेहमी येणारे आहेत तर काही शुक्रतार्यासारखे दिसणारे. पण कधी का होईना कुटुंबाची आठवण त्यांना होते हे ही नसे थोडके. नाहीतर म्हटलं आजकाल वेळ कुणाकडे आहे घरी बघायला. तेवढ्यापूरता सणवार आले की आई-वडीलांकडे तोंड दाखवून यायचं, नाहीतर वेळ कुणाला आहे त्यांच्यासाठी. महिन्याचे पैसे पाठवले की संपली जबाबदारी. अरे पण भावनिक नात्यांच काय पोरांनो??? एकवेळ पैसे नका देऊ, पण थोडावेळ त्यांच्याशी मोकळ्या गप्पा मारा, चौकशी करा... खूप बरं वाटेल त्यांना. म्हातारपणाची काठी म्हणून ज्यांनी तुमच्याकडे पाहिलं त्यांना असंच वार्यावर सोडून देतांना थोडा विचार करा. नाही मला माहीतेय की तेवढाही वेळ नाहीये तुमच्याकडे पण तरीपण. एक कुटुंबप्रमुख म्हणून जे वाटलं ते बोलतोय पोरांनो.
मी खरंच खूप नशिबवान आहे की तुम्ही माझी पोरं कितीही व्यस्त असलात तरी घटकाभर का होईना, माझ्याकडे येऊन जाता. खूप खूप बरं वाटतं. आज पोरं परगावी गेलीत. पण जमेल तसं विचारपूस करायला जमतात इथे. आजकालच्या या जमान्यात जिथे, पोर आई-बापाला ओळखत नाही किंवा केवळ पैश्यापाई आईचा जीव घेतं, तिथे तुम्हा पोरांची एकमेकांबरोबर बांधली गेलेली नाती पाहून ट्चकन् डोळ्याच्या पापण्या पाणावतात.
असो, तुम्ही म्हणाल काय हा म्हातारा पाल्हाळ लावून बसलाय. काय मग पोरांनो झाली की नाही दिवाळीची खरेदी? आपल्या घरात तर आधीच उटण्याचा सुगंध पसरलाय, लगबग उरकलीय इतरांनी म्हणा......
धामधूम सगळीकडे दिसतेय. मस्त वाटतंय. एकतर दिवाळी आणि त्यात तुम्हा सगळ्यांशी गप्पा मारतोय.
तर पोरानो, सांभाळून दिवाळी साजरी करा, उगा अतिउत्साहात कुठे गालबोट तर लागणारी याची काळजी घ्या. लेकरांना सांभाळा आणि खूप खूप आनंदात सण साजरा करा. माझे आशिर्वाद आहेच तुमच्यापाठी सदैव. आणि असंच आपलं घर नांदतं ठेवा....... तसं बोलायचं खूप होतं पण म्हटलं तुमचीपण लगबग असेल.
आणि हो, कधी वाटलंच आमच्या कुटुंबाला भेटावसं, तर नक्की या.
हा आमचा पत्ता.. गप्पागोष्टी परिवार
सांभाळा... आणि काळजी घ्या..
माझ्याकडून आणि माझ्या परिवारातर्फे सर्व मायबोलीकरांना दिवाळीच्या हार्दीक शुभेछ्चा...
क.लो.अ
आपलाच "गगो"
(No subject)
कित्ती छान आणि भावनिक लिहिलंस
कित्ती छान आणि भावनिक लिहिलंस रे!
खरंच फार छान वाटलं... गगो कधी हक्काचा झाला ते कळालंच नाही.. हे त्याचं भाबडं मनोगत वाचून खरंच भरून आलं कळत न कळत ह्या पानाशी किती जवळीक साधल्या गेलीये, हे जाणवलं!!
तुझ्या कल्पनेला __/\__
मस्त
मस्त
छान बोललास.
छान बोललास.
प्रिय गगो, तुला आदरार्थी
प्रिय गगो,
तुला आदरार्थी संबोधन वापरणार नाहिय्ये, कारण तू प्रसंगी मित्र, भाऊ ह्या रुपात भेटतोस!! मग "अरे" च जवळचं वाटतं!
(स्मिहा च्या आयडियेमुळे) आलास आमच्याशी गप्पा मारल्यास, मस्त वाटलं! तुला नाही रे विसरणार आम्ही कुणी- असेच भेटत जाऊ... म्हणतात ना "शेअरिंग अँड केअरिंग" मुळे नातं फुलतं, तुझ्या जवळ येऊन शेअर करतोच आणि तुला "स्वच्छ" ठेऊन केअरही करतो...
मालकानू,
गगो महाशय स्वतः आलेत. आता ह्या दिवाळीच्या निमित्ताने गगोला, जरा रंग-रंगोटी कराच- थोडं नवखं रूप द्या तुमची क्रियेटिव्हीटी वापरून, प्लीजच
लै भारी माझ्या मते हा तुझा
लै भारी माझ्या मते हा तुझा पहिलाच प्रयत्न आहे ना लिहण्याचा??
लै भारी भावा...
पुलेशु....
मस्त लिहलं आहेस आवडलं
मी खरंच खूप नशिबवान आहे की
मी खरंच खूप नशिबवान आहे की तुम्ही माझी पोरं कितीही व्यस्थ असलात तरी घटकाभर का होईना>> इथे व्यस्त कर.. >>>व्यस्त नव्हे, व्यग्र,.
कित्ती छान लिहिलय.... गगोचं
कित्ती छान लिहिलय....

गगोचं मनोगत...
खरचं आहे मी नविन असूनपण किती सहज गगोने आपलसं केलय.. अर्थात गगोकरांनीही...
छान लेख..
(No subject)
धन्स मंडळी... बागेश्री, सुंदर
धन्स मंडळी...
बागेश्री, सुंदर कमेंट..
अमोघ .अप्रतिम गगोचे आत्मकथन
अमोघ .अप्रतिम
गगोचे आत्मकथन फारच सुंदर्रित्या मांडले 
बागेश्री तुला १००० मोदक
अमोघ, छोट्टंसं पण छान मनोगत
अमोघ,
छोट्टंसं पण छान मनोगत आहे एकदम. भावलं.
सर्वांना दिपावलीच्या अनेक शुभेच्छा!
स्मिहा, अरे काय रे बाबा....
स्मिहा, अरे काय रे बाबा.... छान वाटलं हे वाचून.
बागेश्री म्हणते तसं भरुन आलं एकदम.
>>(स्मिहा च्या आयडियेमुळे) आलास आमच्याशी गप्पा मारल्यास, मस्त वाटलं! तुला नाही रे विसरणार आम्ही कुणी- असेच भेटत जाऊ... म्हणतात ना "शेअरिंग अँड केअरिंग" मुळे नातं फुलतं, तुझ्या जवळ येऊन शेअर करतोच आणि तुला "स्वच्छ" ठेऊन केअरही करतो...
अगदी, संपूर्ण सहमत.
>>मालकानू,
गगो महाशय स्वतः आलेत. आता ह्या दिवाळीच्या निमित्ताने गगोला, जरा रंग-रंगोटी कराच- थोडं नवखं रूप द्या तुमची क्रियेटिव्हीटी वापरून, प्लीजच
जरा गगोच्या पानावरचं चित्र बघ. रंगीत केलंय एकदम. ते चित्र रंगीत करण्याचं काम मात्र अवलचं.
धन्स लोक्स... दक्षिणा, तुलापण
धन्स लोक्स...
दक्षिणा, तुलापण शुभेच्छा..
खुपच सुंदर मनोगत व्यक्त
खुपच सुंदर मनोगत व्यक्त केलय... भरुन आलं.. खुप आवडले..:)
खुपच सुंदर मनोगत व्यक्त
खुपच सुंदर मनोगत व्यक्त केलय... भरुन आलं.. खुप आवडले..:)
सर्व माबोकरांना दिवाळीच्या खुप शुभेछा...
छान ..... मनापासून लिहिलेलं
छान ..... मनापासून लिहिलेलं गगोचं मनोगत.
----------------------------------------------------------------
मालक,
तेच चित्र रंगवून काय उपयोग ?
दिवाळीला साजेलसं चित्र डकवा गगोवर.
हो काका, बघतो.
हो काका, बघतो.
(No subject)
(No subject)
(No subject)
उल्हासकाकांनी तयार केलेले
उल्हासकाकांनी तयार केलेले भेटकार्ड

(No subject)
मंदार ..... आपल्या कालच्या
मंदार .....
आपल्या कालच्या बोलण्यानुसार दिवाळीच्या निमित्ताने
गगोवर हेडर म्हणून डिस्प्ले करण्यासाठी मी चारोळीसह तयार केलेलं हे चित्र,
इथे भेटकार्ड म्हणून लावलंय हे अत्ता लक्षात आलं माझ्या.
मी वाट बघतोय, तुझ्या GIF Animation effect ची ....
..... ज्यात दोन चित्रं आलटून पालटून हेडर म्हणून दिसणार होती.
स्मिहा....... तोडलंस फोडलंस
स्मिहा....... तोडलंस फोडलंस रे मित्रा....
मुळात कल्पनेला सलाम...!!!! योग्यवेळी टाकलंस...!!! झकास रे...!!
सर्व गगोकर आणि माबोकरांना दिपावलीच्या शुभेच्छा...!!!! "गगोमहाशय" तुम्हालासुध्दा बरं का...!!!!
उकाका साईजचा प्रॉबलेम येतोय.
उकाका साईजचा प्रॉबलेम येतोय. GIF केलं तर साईज इथे जास्त आहे असा मेसेज येतोय.
छान वाटले रे वाचुन ! सर्व
छान वाटले रे वाचुन !
सर्व गगोकर आणि त्यांच्या कुटूंबियांना दिवाळी आणि नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
नमस्कर गगो, आधी फक्त
नमस्कर गगो,
आधी फक्त मायबोलीकर होते.. आता गगोकर कधी झाले कळलंच नाही.. मालक उर्फ मंदार जोशी तसेच इथे नेहमी येणारे गगोकरांनी मला कुटुबांत सामावुन घेतलं. तुम्ही आहात म्हणुन आम्ही गगोकर्स आहोत अस म्हंटल तर ते वावगं ठरणार नाही.. इथे येणारे किती अनोळखी पण मनाने कितीतरी नात्यांमधे गुंतलेले आहेत. कुणी काका कुणी भाऊ आणि कितीतरी.. अगदी जवळचे असल्यासारखे वाटतात..
किती ती भांडणं.. ते रुसवे फुगवे तो लटका राग.. आणि अगणीत स्माईली.. तुमचं रुप अगदी क्षणाक्षणाला बदलत असतं.. नवीन आहे काही कमी जास्त बोलले आसेन तर चुभुद्याघ्या..
एक गगोकर आणि मायबोलीकर (अभिमानाने)
राखी शेलार.
hats off to you guys.... : दोन्ही हात वरुन पायापर्यंत नेणारी बाहुली :
राखी
राखी
राखी..एक राहिलं... एवढे बोलून
राखी..एक राहिलं...
एवढे बोलून मी माझे भाषण संपवते...जय हिंद,जय महाराष्ट्र!
Pages