भक्तजनहो,
गेल्यावर्षी आपण मला निरोप देताना पुढच्या वर्षी लवकर येण्याची विनंती केली होती.या वर्षी माझे आगमन काही दिवसांवर आले आहे.गेल्या काही वर्षांपासून तुमच्याकडे येताना विचार करावा लागतो.मी वेगवेगळ्या माध्यमाद्वारे तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केला पण आपण ऐकत नाही.तुम्ही सर्वजण आपल्या मनाप्रमाणे वागता पण मला त्याचा त्रास होतो.माझ्या काही भक्तांनाही होतो. उत्सव साजरा करताना जर मर्यादेचे बंधन पाळले तर उत्सवाचा आनंद द्विगुणित होतो.आपल्या हातून घडणार्या अशा बर्याच गोष्टी आहेत ज्या मला आवडत नाहीत, पण माझ्या भक्तांसाठी मला सर्व सहन करून यावे लागते.दरवर्षीच्या चुकांची पुनरावृत्ती या वर्षी होणार नाही.कदाचित माझ्या काही भक्तांना वाईट वाटेल,त्रास होईल पण त्या सर्वांसाठीच यावर्षी मी सशर्त {conditional} आगमन करणार आहे.पृथ्वीतलावर येण्यापूर्वी भक्तजनांनी माझ्या काही अटी आहेत,त्याचा जरूर विचार करावा.
१] ध्वनीक्षेपकांचा आवाज मंडपापुरता मर्यादित ठेवावा, जेणेकरून ध्वनीप्रदुषण कमी होण्यास मदत होईल.
२] ध्वनीक्षेपकांची वेळ मर्यादित असावी.
३] हॉस्पिटल, शाळा,वृद्धाश्रम यांच्या जवळ ध्वनीक्षेपक लावणे टाळावे.
४] पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसचा वापर टाळावा.
५] वर्गणीसाठी जबरदस्ती करु नये.
६] माझ्या उंच मूर्ती बनवू नयेत.
७] दानपेटीतल्या पैशाचा दुरूपयोग करू नये.त्यातून समाजाच्या विकासाची कामे करावी.व्यर्थ खर्च टाळावा.
८] उत्सव साधेपणाने आणि श्रद्धेने साजरा करावा.
मला कल्पना आहे की वरील अटींचे पालन करणे माझ्या काही भक्तांना अत्यंत कठीण जाणार आहे,परंतु आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणे आवश्यक आहे.
त्यामुळे उत्सवाचा मान राखला जाईल व शानही वाढेल.जरा आपणांस हे मान्य असेल तर मनापासून वरील अटी पाळण्याचा निर्धार करा. तुमचा हा प्रतिसाद माझ्यापर्यंत लगेच पोहोचेल.आपल्या या निर्धारावर माझे आगमन अवलंबून आहे. अन्यथा कितीही ओरडलात तरी मी मात्र तुमच्यापासून दूरच असेन.
आपला,
गणपती बाप्पा.
प्रदिप राणे.
(डोंबिवली)
गणेशोत्सव ऑनलाइन साजरा करावा. म्हणजे सगळेच प्रश्न मिटतील.
======================
|| हरिण ओम ||
सर्व धर्मान परित्यज्य माम एकम हरणं व्रज |
प्रिय बाप्पा,
तुमचा काहीतरी गैरसमज होतोय.
हा उत्सव तुमचा असं तुम्हाला वाटतंय का? तसं नाहीये. हा उत्सव आमचा असून वर्षभर दाबून ठेवलेल्या अनेक उत्साहजनक अन क्रांतीकारी उपक्रमांना यावेळी आम्ही पुर्ण करीत असतो. आता दह्यांडी, नवरात्र, लग्नसमारंभ, निवडणूका, शिवाजी अन आंबेडकर जयंती हेही आहेतच. पण ते कमी दिवस असतात. अन इतका धिंगाणा नाही घालता येत तिथं.
पटलं तर बघा. तुम्हाला नसलंच यायचं तरी काहीच फरक पडणार नाही. वर दिलेले इतर उत्सव आहेतच. आम्हाला करायचे ते आम्ही करणारच.
बघा, विचार करा, अन पटकन कळवा. आम्हाला भरपूर तयारी करायची असते.
रामराम.
--तुम्ही म्हणलं तर, तुमचा.
--
हस्सरा नाचरा, जरास्सा लाजरा-
सुंदर साजिरा, श्रावण आला..!
एक पत्राची प्रत स्वर्गात लोकमान्य टिळकांनाही पाठवा.....
खूप सुंदर आहे हे पत्र. मनापासून आवडले..