Submitted by बेफ़िकीर on 18 October, 2011 - 02:43
स्वप्न पडले की सफल होते असे नाही
शब्द आले की गझल होते असे नाही
खूप आनंदात दोघे चालले होते
पण तरीही ते कपल होते असे नाही
सोबतीला कोण आहे हे महत्वाचे
छान जागीही सहल होते असे नाही
माणसाचे मन ठरवते रंग दुनियेचा
सूर्य आला की धवल होते असे नाही
'बेफिकिर' संदिग्धता स्वीकार थोडीशी
सर्व प्रश्नांची उकल होते असे नाही
--------
-'बेफिकीर'!
गुलमोहर:
शेअर करा
सोबतीला कोण आहे हे
सोबतीला कोण आहे हे महत्वाचे
छान जागीही सहल होते असे नाही >>> या साठी एक जादु की 'झप्पी' स्विकार करावी!!!
मतला सोडून सर्व शेर
मतला सोडून सर्व शेर आवडले.
माणसाचे मन ठरवते रंग दुनियेचा
सुर्य आला की धवल होते असे नाही>>>> व्वा!!
स्वप्न पडले की सफल होते असे
स्वप्न पडले की सफल होते असे नाही
शब्द आले की गझल होते असे नाही..... सहज!!!
खूप आनंदात दोघे चालले होते
पण तरीही ते कपल होते असे नाही.........
'बेफिकिर' संदिग्धता स्वीकार थोडीशी
सर्व प्रश्नांची उकल होते असे नाही..... क्या बात है!!! सिंपल.
"एक नि:संदिग्ध गझल
वाह्, साध्या , सोप्या
वाह्, साध्या , सोप्या शब्दांतील जादू.
आवडली गजल.
अफाट आवडली सहज...पण
अफाट आवडली सहज...पण भिडणारी.
माणसाचे मन ठरवते रंग दुनियेचा
सूर्य आला की धवल होते असे नाही......सही!
'बेफिकिर' संदिग्धता स्वीकार थोडीशी
सर्व प्रश्नांची उकल होते असे नाही........कातिल!
सुंदर
सुंदर
जस्ट पर्फेक्ट.
जस्ट पर्फेक्ट.
तू कविता करायला लायक आहेस?? -
तू कविता करायला लायक आहेस?? - का का क>>>
उत्तर आपलच.
>>>>'बेफिकिर' संदिग्धता स्वीकार थोडीशी
सर्व प्रश्नांची उकल होते असे नाही
एकदम सहज!! मस्त.
एकदम सहज!! मस्त.
कपल वगळता आवडली...अप्रतिम
कपल वगळता आवडली...अप्रतिम गझल
माणसाचे मन..जबराट शेर्. गझलही
माणसाचे मन..जबराट शेर्.
गझलही छान...
मस्त आहे.
मस्त आहे.
मस्त गझल... मतला - मक्ता
मस्त गझल...
मतला - मक्ता आवडला... मतल्यातील मिसरे वर-खाली करून पाहिले..
सुंदर...सहज...गझल
सुंदर...सहज...गझल
कपल....!! ?? !! ?? असो.. पण
कपल....!! ?? !! ??
असो..
पण तरीही आवडली... "कपल"वाला शेरही आवडला!!
जबरी!
मस्त गझल...
मस्त गझल...
प्रियांकासाठी गझल
प्रियांकासाठी गझल पुनर्प्रकाशित!
नवीन प्रतिसाददात्यांचे आभार!
-'बेफिकीर'!
आवडलीच थँक्स टू केतन
आवडलीच
थँक्स टू केतन
'कपल' सकट आवडली.. 'युगल' असा
'कपल' सकट आवडली.. 'युगल' असा एक शब्द मनात आला, पण तोही तर युगुल आहे मुळात.
स्वप्न पडले की सफल होते असे नाही
शब्द आले की गझल होते असे नाही
'बेफिकिर' संदिग्धता स्वीकार थोडीशी
सर्व प्रश्नांची उकल होते असे नाही..
ही सुरुवात अन म्हणून हा शेवट खूप शैलीदार.
मतला मला खुप आवडतो हा. नेहमि
मतला मला खुप आवडतो हा. नेहमि गुन्गुन्तो.....
खूप आनंदात दोघे चालले होते पण
खूप आनंदात दोघे चालले होते
पण तरीही ते कपल होते असे नाही
>>> कपल पाशी अडखळुन पडलेच मी !
बाकी गजल उत्तम !
शेवञ्टचा शेर अप्रतिम !!
वा! आवडली. सहज सोपी वाटली
वा! आवडली. सहज सोपी वाटली
पुन्हा वाचली... सहल आफाट
पुन्हा वाचली... सहल आफाट
सूर्य आला की धवल होते असे
सूर्य आला की धवल होते असे नाही...
व्वा!!
'कपल 'च्या शेरासकट आवङली!!!
छान. "माणसाचे मन ठरवते रंग
छान.
"माणसाचे मन ठरवते रंग दुनियेचा
सूर्य आला की धवल होते असे नाही
'बेफिकिर' संदिग्धता स्वीकार थोडीशी
सर्व प्रश्नांची उकल होते असे नाही"
हे शेर अधिक आवडले.
''खूप आनंदात दोघे चालले
''खूप आनंदात दोघे चालले होते
पण तरीही ते कपल होते असे नाही''<<<<<<<<<<<<<< सुन्दर.
''सोबतीला कोण आहे हे महत्वाचे
छान जागीही सहल होते असे नाही
अप्रतिम
खूप छान आहे ही गझल (ही माझी
खूप छान आहे ही गझल
(ही माझी वाचायची रहीलीच कशी आजवर याचे आश्चर्य वाटते आहे )
धन्यवाद
धन्यवाद
पुन्हा वाचली सहल अफाट
पुन्हा वाचली
सहल अफाट !
धन्यवाद !
अतिशय सुंदर गझल. शेवटचा शेर
अतिशय सुंदर गझल. शेवटचा शेर तर क्लासच...
Pages