(आता ...! )

Submitted by निनाद on 8 September, 2011 - 21:07

मिलन टोपकर यांनी सुरेख गझल रचली आहे आता ...! ते पाहून आमची प्रतिभाही उसवली आणि ही प्रसवली.
अर्थातच टोपकर यांची क्षमा मागून!

पँट शर्ट टाकले शिवुनी, असता
कसे मागतो माप "तू" आता?

व्यर्थ मी कापड शिवाया दिले
बायको हसली बटने मी लावता!

ही धरा लंगोटी, उसवली
त्या हौदातून बादल्या काढाता!

मी दिली कात्रणे होती शिंप्या
दोर्‍याचा रंग कसा हा भलता!

शोधुनी थकली बायको मला
बसलो येथे जरा कापडे शोधता!

कार्टाही यावा न मज बोलवाया?
सिरियलही हुकली बोल लावता!

चहा पडतो का, कसा, शर्टावरी
नेमकी बटने ही लावता लावता!

हात बाहीत घ्यायचा होता माझा
आताशा स्लिव्हलेस फॅशन पाहता!

मी न आता घालतो माझ्या विजारी
धोतरे नेसू कशी निर्‍या न घालता?

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

(मी न वाचतो कविता येथे विचारी
विडंबने कशी करू अर्थ न मोडता?)

हे शेवटचे टंकायचेच राहिले होते Happy