(दूर आहे डेडलाईन अजूनि)

Submitted by संदीप चित्रे on 30 July, 2008 - 17:00

('तरूण आहे रात्र अजूनि' हे गाणं एका सॉफ्टवेअर प्रोग्रॅमरच्या नजरेतूनि)

दूर आहे ‘डेडलाईन’ अजूनि, साहेबा पेटलास का रे....
एवढ्यातच मानगुटीवर, तू असा बसलास का रे....

अजूनही सुकल्या न कागदी, रिक्वायरमेंटच्या ओळी
अजून मी लिहले कुठे रे, हाय तू रूसलास का रे….

सांग या शेजारच्या चटक चांदणीला काय सांगू
तिला पहाया जमती सारे, आणि तू बसलास का रे…

बघ तुला मिळतोच आहे, पश्चिमेचा मार गोरा
रूपया नि डॉलरमधला फरक तू लुटलास का रे…

उसळती पीसीवर ह्या, क्रिकेटच्या स्कोअर लाटा
तू भुतासारखा पण एकटा डोकावलास का रे…

डोळे अजूनि बंद का रे, श्वास ही मग मंद का रे
बोल रिक्रुटरच्या थापेवर, तू असा फसलास का रे…
---------------------------------------------
(टीपः 'डोळे अजूनि बंद ....' ही ओळ मूळ गाण्यातली आहे)
---------------------------------------------
www.atakmatak.blogspot.com

गुलमोहर: 

मस्तच आहे.
.
बघ तुला मिळतोच आहे, पश्चिमेचा मार गोरा >>>> Lol

संदीप... प्रच्चंड्ड सुरेख जमलय.
दूर आहे ‘डेडलाईन’ अजूनि, साहेबा पेटलास का रे.... Happy Happy
बघ तुला मिळतोच आहे, पश्चिमेचा मार गोरा Happy Happy Happy
उच्च!

संदीप, खल्लासच रे Happy चटकचांदणी, मार गोरा... Happy

    ***
    It is the spirit of the age to believe that any fact, no matter how suspect, is superior to any imaginative exercise, no matter how true.
    - Gore Vidal

    Happy ये झक्कास... अतिव सुंदर.... चिरलस मित्रा... पार चिरलस...

    ग्रेट जमलंय रे. प्रत्येक ओळीला मनापासून दाद.
    ***
    शब्दचि आमुच्या जीवाचें जीवन, शब्दें वाटू धन जनलोकां..

    एकदमच सही...
    ==================
    सुसाट वारा वीज कडकडे पाऊस झाला सुरू
    पाणीच पाणी रस्त्यावरती मुठीत गारा धरू

    मस्तच जमलंय. वाचताना आपोआप चालीवरच वाचलं गेलं Happy

    संदीप, पहिली दोन कडवी मस्त जमलीयत, पण पुढची कळाली नाहीत - म्हणजे डेडलाईन लांब असताना बॉस घाई करतोय या थीम मधे ती कशी बसातात ते कळाले नाही. शेवटच्या कडव्याचा अर्थ रिक्रूटर वर विश्वास ठेउन निवडलेला काम नीट करत नाही असा घ्यायचा का? शेवटून दुसर्‍याचा अर्थ ही थोडा जमतो बहुतेक "अजून वेळ आहे, आत्ता क्रिकेट वगैरे पाहू दे, आत्तात येथे कडमडू नको" हे बरोबर का?

    मस्तच संदीप Happy

    संदीप ..... सहीच रे!

    >>बघ तुला मिळतोच आहे, पश्चिमेचा मार गोरा
    >>रूपया नि डॉलरमधला फरक तू लुटलास का रे…
    एकदम खल्लास Happy

    >>>>>>
    डोळे अजूनि बंद का रे, श्वास ही मग मंद का रे
    बोल रिक्रुटरच्या थापेवर, तू असा फसलास का रे…>>>>>
    यासाठी १०० मार्क्स... Lol