Submitted by मी अभिजीत on 29 July, 2008 - 09:13
तुझ्या गळा, माझ्या गळा,
सीबीआय चौकशीच्या माळा.
दाद मागायची कोणाला ?
चला रे आता कोर्टात चला.
तुज "पोटा", मज "मोक्का".
आणखी "टाडा" कोणाला?
लाज वाटते का तुम्हाला ?
मला कुणाची, देशाला.
तुझ्या गळा, माझ्या गळा.
सीबीआय चौकशीच्या माळा.
तुज झटका, मज फटका.
आणखी अटका कोणाला ?
सांगू कुठल्या नेत्याला.
सांग तिकडच्या "भाई"ला.
तुझ्या गळा, माझ्या गळा.
सीबीआय चौकशीच्या माळा.
आसू आसू डोळ्यात आसू.
वरवर खोटे हसू हसू.
मंत्रीपदी आता नको बसू.
सरकार आमचे तसू तसू.
तुझ्या गळा, माझ्या गळा.
सीबीआय चौकशीच्या माळा.
कशी कशी आज अशी.
चंगळ आली अंगाशी.
आता गट्टी फू तुमच्याशी.
तर मग "युती" कोणाशी ?
-- अभिजीत दाते
मूळ गीत - तुझ्या गळा, माझ्या गळा, गुंफू मोत्यांच्या माळा..!
गुलमोहर:
शेअर करा
>>तुज झटका,
>>तुज झटका, मज फटका.
आणखी अटका कोणाला ?
सांगू कुठल्या नेत्याला.
सांग तिकडच्या "भाई"ला.
मस्तच रे
मस्तच रे अभिजीत


.
तुज "पोटा", मज "मोक्का".
आणखी "टाडा" कोणाला? >>>>
हे तर खासच
.
इकडे 'आणखी' च्या ऐवजी 'आणिक टाडा कोणाला ? ' कस वाटेल ?
चू भू द्या घ्या.
फर्मास
फर्मास जमलंय विडंबन!