तुझ्या माझ्यासवे कधी गायचा दाऊदही..!

Submitted by मी अभिजीत on 25 July, 2008 - 02:59

(अबू सालेम त्याच्या साथीदाराला ऐकवतो)

तुझ्या माझ्यासवे कधी गायचा दाऊदही.
क्रिकेटला शारजाला पोचायचा दाऊदही.

कळेना भारताला कराचीत की दुबईत तो,
कसा होता नि नव्हता व्हायचा दाऊदही.

मधूनच जाग जेव्हा येई इंटरपोलला,
कशा जागा नव्या शोधायचा दाऊदही.

कधी मर्डर, कधी मागायचा तो खंडणी.
कसे बाँबस्फ़ोट अन घडवायचा दाऊदही.

कशी भर पार्टीलाही आग माझी व्हायची,
जेव्हा मोनिकाला बिलगायचा दाऊदही.

आता जेलामध्ये या फ़क्त आठवणी जुन्या.
कधी मरणे अशी ठरवायचा दाऊदही.

-- अभिजीत दाते

मूळ गीत - तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊसही
कवी - संदीप खरे

(संदीप खरे आणि त्याच्या तमाम पंख्यांनी आणि एसींनी क्षमा करावी)

गुलमोहर: 

लय भारी की रे मित्रा...
शेवटची दोन कडवी तर झकास....
==================
सुसाट वारा वीज कडकडे

भन्नाट रे अभिजीत.. Biggrin

काही ठिकाणी वॄत्तात गडबड झाली आहे. ठिक करता आली तर बघ अजून धमाल येइल..

जसे की

कसे बाँबस्फ़ोट अन घडवायचा दाऊदही. च्या जागी
"किती स्फोटांमधे मारायचा दाऊदही?" असे करता येईल...

    ================
    ऐक माझ्या आसवांची मागणी आता नवी
    रोज रात्री आठवांची ती जुनी मैफल हवी

      -एक झलक, वैभव जोशी यांच्या लवकरच येणार्‍या ’सोबतीचा करार’ या गझल अल्बमची!

      है शाब्बास. मस्तच

      लै खास ...
      'नामंजूर' नंतर हे अजून एक मस्त विडंबन. ... जियो दोस्त Happy

      जमलय जमलय.... भारी....
      - येडचॅप

      बोले तो भै एकदम फीट हुएला है....

      मस्त रे.. जियो!!