‘बालगंधर्व’ चित्रपटावर भरपूर चर्चा केली, वाचली, ऐकली. ती चर्चा कानावर पडली नसती तरी सिनेमा पहायचा तर ठरवलाच होता. तसा तो ही पाहीला. सिनेमा पहायला बरोबर चक्क आमचे चिरंजीव आले होते. (आमच्या अर्धांगाच्या मनोरंजनाच्या कल्पना निराळ्याच असल्यामुळे अश्या कामी बहुतेकवेळा मुलाचीच मला साथ-सोबत असते. तो एक स्वतंत्र चिंतनाचा विषय आहे. असो.) सिनेमा पाहून आल्यावर सुबोध भावे, त्याची वेषभूषा, सिनेमातले सेट्स आणि बालगंधर्वांच्या आयुष्यातल्या नव्याने कळलेल्या काही गोष्टी हेच सगळं मनात जास्त घोळत राहीलं.
काही दिवस गेले. अचानक पेपरमध्ये एक जाहीरात आली - ‘असा बालगंधर्व आता न होणे’ : बालगंधर्व चित्रपटावर आधारीत गाणी, गप्पा, किस्से यांचा कार्यक्रम. स्थळ - गडकरी रंगायतन, ठाणे. कार्यक्रमाचं आयोजन सिनेमाचा सहाय्यक संगीत दिग्दर्शक आदित्य ओक यानं केलं होतं.
ट्रान्सफॉर्मर-३ची रिलीज डेट पाहण्यासाठी पेपर उघडलेल्या माझ्या मुलाची नजर प्रथम त्या जाहीरातीवर गेली. तो ‘आई, आपण या कार्यक्रमाला जायचंच.’ असं म्हणत अक्षरशः उड्या मारत माझ्याजवळ आला. मी प.फ.ची आ. मानून दुसर्या दिवशी आधी कार्यक्रमाची तिकिटं काढून आणली. सहभागी कलाकारांच्या यादीत बरेच गायक, वादक होते. मुलाला म्हटलं - मुख्यत्त्वे बालगंधर्वांच्या गाण्याचा कार्यक्रम असणारसं दिसतंय. तिथे ऐनवेळेला ‘पकलो, बोअर झालो’ असली कटकट मला चालणार नाही. त्याला ही अट संपूर्णपणे मान्यच होती.
कार्यक्रम हाऊसफुल्ल होता. सुबोध भावे, नितीन चंद्रकांत देसाई, दिग्दर्शक रवी जाधव, सिनेमॅटोग्राफर महेश लिमये, संगीतकार कौशल इनामदार सर्वांनी छान, दिलखुलास गप्पा मारल्या. चित्रपट बनत असतानाचे अनेक किस्से त्यांच्या मुलाखतींच्या स्वरूपात ऐकायला मिळाले. (स्वानंद किरकिरे त्यादिवशी काही कारणांनी कार्यक्रमात सहभागी होऊ शकला नाही. ‘नंतर कधीतरी तो ही येईल’ असं सुबोध भावे म्हणाला. समोर इतकं सगळं छानछान चालू असूनही काहीवेळ या गोष्टीची रुखरुख लागून राहिली होती.) पण हे सगळं अधेमधे चालू होतं. प्रमुख आकर्षण होतं - आनंद भाटेची गाणी. साथीला वरदा गोडबोले आणि मधुरा कुंभार.
चित्रपट पाहण्यापूर्वी ‘आनंद भाटेची गाणी ऐकायला म्हणून जाणार असलीस तर विरस होईल. त्याचा आवाज सुबोध भावेला अजिबातच सूट होत नाही.’ असं एक मत ऐकायला मिळालं होतं. मनातून ते पटलं नव्हतं. त्याला कारण होतं लहानपणी दूरदर्शनवर ऐकलेली चिमुकल्या आनंद भाटेची गाणी. शाळकरी वयात दूरदर्शनवरच्या त्या कार्यक्रमामुळे आमच्या पिढीला बालगंधर्वांच्या गाण्यांबद्दल खरं म्हणजे प्रथमच ठोस काहीतरी समजलं होतं. (बाकी, आनंद भाटे तेव्हाही पुढ्यात कुठलाही कागद वगैरे न घेता गायचा आणि प्रस्तुत कार्यक्रमातही त्यानं गाण्यांचे बोल इ.साठी सोबत काहीही लिखित साहित्य बाळगलेलं नव्हतं!)
कार्यक्रम सुरू झाला. इंग्रजी माध्यमात शिकणारा, लिंकिन पार्क-बिर्कची गाणी ऐकणारा आपला टीनएजर मुलगा आपल्या शेजारी बसून एक नाट्यगीतांचा कार्यक्रम आपणहून पाहतोय-ऐकतोय याचंच मला सुरूवातीला इतकं अप्रूप वाटत होतं की पुढ्यातल्या कार्यक्रमात शिरायला मला जरा वेळच लागला. आनंद भाटेच्या पहिल्या गाण्याबरोबर ते विचार मागे पडले आणि सुरांनी मना-मेंदूचा ताबा घेतला.
गप्पा मारताना कौशल इनामदारनं अगदी प्रांजळपणे कबूल केलं की कोणे एके काळी नाट्यसंगीत म्हणजे त्याला जुनी, मागे पडलेली कला वाटायची. ‘ध्वनीक्षेपक नसण्याच्या काळात प्रेक्षागृहातल्या अगदी मागच्या रांगेपर्यंत जे पोहोचवावं लागायचं ते नाट्यसंगीत.’ अशी त्यानं स्वतःशीच त्याची व्याख्या केलेली होती. पण ती त्याची केवढी मोठी घोडचूक ठरली असती ते त्याला हा चित्रपट केल्यावर लक्षात आलं. साधारण अशीच प्रचिती मला स्वतःलाही आली. अभिजात संगीताचा मी ‘प्रत्यक्ष’ ऐकलेला हा पहिलाच कार्यक्रम. तोपर्यंत नाट्यसंगीत मलाही कंटाळवाणं वाटायचं. त्यामुळे प्रत्यक्ष ऐकणं तर दूरच, आतापर्यंत मी सी.डी.ज वगैरेही गायनापेक्षाही वादनाच्याच जास्त विकत घेतलेल्या आहेत. त्याला छेद मिळाला त्या कार्यक्रमाच्या मध्यंतरात. प्रेक्षागृहाबाहेर बालगंधर्व सिनेमाच्या गाण्यांच्या सी.डी.ची विक्री चालू होती. मुलाच्या आग्रहाखातर तिथून मी ही एक संच विकत घेतला.
अनेक वन्स-मोअर्सना विनयशील नकार देऊन मध्यंतरानंतरही आनंद भाटे ‘चाबूक’ गायला. कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला. घरी परतायला त्यादिवशी रात्रीचा एक वाजला. सुरांनी मंत्रमुग्ध होणे म्हणजे काय याची मला व्यक्तिशः प्रथमच प्रचिती आली.
या सगळ्याला आता दहा-बारा दिवस उलटून गेले. तेवढ्या काळात तो दोन सी.डीं.चा संच दोन-तीन वेळा ऐकून झाला. कार्यक्रमामुळे आलेलं भारावलेपण बघताबघता कमी होईल असं आधी वाटलं होतं. पण जितक्या वेळा मी ती सी.डी. ऐकते तितक्या वेळेला पुन्हा ते प्रेक्षागृह आठवतं, तन्मयतेनं गाणारा आनंद भाटे आठवतो आणि वाटतं - सीडी वगैरे सब झूठ है याऽऽर, प्रत्यक्ष गायकाच्या पुढ्यात बसूनच हे सगळं ऐकायला हवं!
बालगंधर्वांची गाणी आधीपासून माहीत असल्यामुळे हे वाटतं की इतर अनोळखी गाण्यांच्या बाबतीतही असंच होईल ते मी सांगू शकत नाही. पण इतकं मात्र खरं की सध्या माझा मुलगा घरात ‘भाग भाग डी. के. बोस’सोबत ‘कशी या त्यजू पदाला’ हेदेखील गुणगुणत असतो. इतकंही खरं की अजून सहा-एक महिन्यांनंतर डी.के.बोसचं गाणं तो कुठल्याकुठे विसरूनही जाईल पण ‘नाही मी बोलत नाथा’चे सूर डोक्यातून जाणं शक्यच नाही.
कारण ते संगीत (पेस्तनकाकांच्या भाषेत) आहेच तसं - स्सालं हंड्रेड पर्सेंट डिव्हाईन!
(No subject)
>>हंड्रेड पर्सेंट डिव्हाईन!
>>हंड्रेड पर्सेंट डिव्हाईन! >> खरंच
आवडलं
आवडलं
मस्त लिहिलंयस लले आनंद
मस्त लिहिलंयस लले
आनंद भाटेचं लहानपणीचं गाणंही खणखणीत नाणं वाटायचं.
अगदी. हा लेखही १००% सही
इतकंही खरं की अजून सहा-एक
इतकंही खरं की अजून सहा-एक महिन्यांनंतर डी.के.बोसचं गाणं तो कुठल्याकुठे विसरूनही जाईल पण ‘नाही मी बोलत नाथा’चे सूर डोक्यातून जाणं शक्यच नाही.
कारण ते संगीत (पेस्तनकाकांच्या भाषेत) आहेच तसं - स्सालं हंड्रेड पर्सेंट डिव्हाईन!
अगदी अगदी..!
सुंदर लेखप्रपंच.
बघितली होती या कार्यक्रमाची
बघितली होती या कार्यक्रमाची जाहिरात. उत्सुकता आहेच बघायची.
ललिता, सुरेख लिहिलं आहेस.
ललिता, सुरेख लिहिलं आहेस. नाट्यसंगिताची मोहीनी अशीच असते. एका संभारंभाचं सुंदर शब्दात वर्णन केलंस तु.
आनंद भाटे आमच्या COEPचे
आनंद भाटे आमच्या COEPचे पासआऊट! COEP मधल्या एका कार्यक्रमात मी निवेदक असल्यामुळे शेजारी बसून त्यांचं गाणं ऐकलं होतं आणि गाणं संपल्यानंतर संपूर्ण सभागृहाने छप्पर उडवणारी दाद त्यांना दिली होती...
लेख मस्त!
भारीच की गं हा कार्यक्रम
भारीच की गं
हा कार्यक्रम पुन्हा कधी लागला तर बघायलाच हवा 
कौशल इनामदारांसारख्या
कौशल इनामदारांसारख्या सध्याच्या संगीत क्षेत्रातल्या दिग्गजाला आपली घोडचुक लक्षात येण्यासाठी चित्रपट करावा लागावा, ये बात कुछ हजम नही हुई. कलाकाराच्या वावदुक विनम्रतेचं आणि प्रामाणिकपणाचं नाट्य दडलेलं असावं असं वाटल ह्या कबुलीत. असो.
भाटेंच गाणं अप्रतिम यांत वादच नाही. लले, आता कुमारांचं 'मला उमजलेले बालगंधर्व', वसंतरावांच्या नाट्यसंगिताच्या, अभिषेकींचं (बुवा बरका, शौनक नव्हे) 'माझे जीवनगाणे' आणि इतर गाण्यांच्या क्यासेटी आणुन वाजवुन दाखव पोराला. काही तर तुनळीवर पण उपलब्ध आहेत. डीव्हाईनमधलं डीव्हाईन गवसल्याचा आनंद मिळेल ( हे ही पुलंच्या भाषेत ' तर काकाजीला, त्याच्या काकाजीला भेटल्याचा आनंद होइल !)
मस्तच लिहीलय. तुमच्या मुलाचही
मस्तच लिहीलय.
तुमच्या मुलाचही कौतुक.
मस्त! काही कारणाने हा
मस्त!
खूपच सुंदर अनुभव होता तो.
काही कारणाने हा कार्यक्रम बघण्याचं नशिबात नव्हतं. रा.मा.रोडवर या कार्यक्रमाची जाहिरात बघून खंतावत होते.
आपल्यापैकी कोणीतरी हा कार्यक्रम प्रत्यक्ष बघू, ऐकू शकलं याचं समाधान वाटलं लले.
परवा रविवारी आषाढीच्या आदल्या दिवशी साम वाहिनीवर अभंगवाणी कार्यक्रम लागला होता. गायक कलाकारांमधे शौनक अभिषेकी, आनंद भाट्यांसारखे दिग्गज... पूर्ण कार्यक्रम तू म्हणत्येस त्याप्रमाणे शंभर टक्के डिव्हाईन!
(No subject)
खुपच सुरेख लेख! मला
खुपच सुरेख लेख!

मला नाट्यसंगीताची विशेष आवड नसूनही (सुबोध भावेमुळे) बालगंधर्वपट कधी पहायला मिळतोय असं झालंय... आणि आता हा लेख वाचून ही सगळी गाणी-जी लहानपणी ऐकल्यावर आवडली नव्हती, ती ऐकावीशी वाटतायत .... न जाणो, तुमच्या मुलाप्रमाणेच मलाही आता ती भावतील... आणि जर ती भावली, तर त्याचे श्रेय या तुमच्या सुरेख लेखालाच...
>>पण इतकं मात्र खरं की सध्या
>>पण इतकं मात्र खरं की सध्या माझा मुलगा घरात ‘भाग भाग डी. के. बोस’सोबत ‘कशी या त्यजू पदाला’ हेदेखील गुणगुणत असतो.
झकास!!
बालगंधर्व चित्रपटासारखे प्रयोग पुन्हा पुन्हा व्हायला हवेत. तरच आजच्या शाळा/महाविद्यालयात शिकणार्या मुलांत सकस संगीताविषयी आत्मियता उत्पन्न होईल आणि त्यांच्या एकूणच संगीता विषयीच्या जाणिवा प्रगल्भ होतील.
मस्त.
मस्त.
अनुमोदन लिमये.
अनुमोदन लिमये.
लेख पण १०० % उतरलाय. मस्त.
लेख पण १०० % उतरलाय. मस्त. आणि शब्द नाहित
मस्त!
मस्त!
१००%
१००%
सुरेख !!
सुरेख !!
एकदम १००% मोहिनी आहे या "
एकदम १००% मोहिनी आहे या " १००% डिव्हाईन बालगंधर्वांची"....
:स्मित:.... माझ्यापाशी व तिच्या आईपाशी - आपण सगळे "बालगंधर्व" बघायला व ऐकायला केव्हा जायचे.... (तिचा केव्हाच बघून झालाय तरीही....)
माझ्याही टीनएजर मुलीच्या मोबाईलची कॉलर ट्यून ती नांदी आहे बालगंधर्वमधील.....
आणि तिची सतत भुणभुण
व्वा लले, मस्तच गं नशिबवान
व्वा लले, मस्तच गं
नशिबवान आहेस... आम्हाला अजुन बालगंधर्व चित्रपट पण पहायला मिळाला नाहिये 
अप्रतिम लेख, मलापण अजून
अप्रतिम लेख, मलापण अजून बालगंधर्व बघायला मिळाला नाहीये. पण बघणार आहे. ही गाणी खरंच टीनएजर मुलांच्या तोंडी अगदी बसलीयेत. आणि तो प्रोग्रॅम पण बघायला हवा. आता खूप उत्सुकता लागून राहिली आहे ह्या लेखामुळे.
मस्त लले.. गोरेगावला पांडुरंग
मस्त लले..
गोरेगावला पांडुरंग वाडीत एक असाच भारलेला बुवा होता. माझ्याच वयाचा असेल. पण लहान वयापासूनच पूर्ण भारलेला होता. आम्हाला त्या वयात अक्कल नव्हती नि हे गाण्यांचा इतिहासही माहीत नव्हता.
आता जेंव्हा जेंव्हा गंधर्व स्पर्शून जातात तेंव्हा आमचा भारीत मित्र आठवतो.. नशिबवान तो की काही कारणाने त्याला लवकरच दैवी स्पर्श झाला.. आम्हाला उमजायला उम्र बीतली!
मस्तच
मस्तच
फार फार छान! खरेच हण्ड्रेड
फार फार छान! खरेच हण्ड्रेड पर्सेण्ट डिव्हाईन!
एकदम मस्त!!! पुण्यात हाच
एकदम मस्त!!!
पुण्यात हाच कार्यक्रम हुकला माझा, अजून काही किस्से शेअर कर ना!
मस्त! बालगंधर्वचे परदेशातही
मस्त! बालगंधर्वचे परदेशातही खेळ व्हायला हवेत.
Pages