Submitted by बेफ़िकीर on 13 July, 2011 - 02:40
नवीन तरहीमध्ये माझा सहभाग! डॉ. कैलास यांनी धागा पुन्हा सुरू केल्याचा आनंद आहे.
===============================================================
केवढा करून जायची कहर
खोल खोल आतवर तुझी नजर
मी तसा लपेटण्यास चांगला
तू मला करून बघ तुझा पदर
थेंब व्हायची मजाच वेगळी
ओळखेचना कुणी समुद्रभर
फक्त शर्यतीत कोसळायच्या
रोज गाठणे नवे नवे शिखर
आटला भलेपणा जगातला
अंथरूण पाहुनीच मन पसर
वाटतो सुसह्य हाच जन्म जर
कस्पटासमान मानलास तर
प्रेम आपले टिकेचना कधी
संपला पगार देत आयकर
जे करायचे असेल तेच कर
'बेफिकीर' हासतील फार तर
-'बेफिकीर'!
गुलमोहर:
शेअर करा
आटला भलेपणा जगातला अंथरूण
आटला भलेपणा जगातला
अंथरूण पाहुनीच मन पसर >विच्प्रथमदर्शी चांगला वाटतोय... पण ह्यावर अजून विचार करत आहे...
वाटतो सुसह्य हाच जन्म जर
कस्पटासमान मानलास तर >>> सुरेख
फक्त शर्यतीत कोसळायच्या
रोज गाठणे नवे नवे शिखर >>> वेगळी कल्पना....
थेंब व्हायची मजाच वेगळी >>> सुरेख मिसरा आहे... खालचा मिसरा अजून वेगळा होऊ शकला असता का?
आयकर थोडा हजलिश वाटला...
मक्ता मध्ये तखल्लुस चा अट्टाहास टाळला असता तर शेर अजून गोटीबंद झाला असता असे वाटले...
चु.भू.दे.घे.
जे करायचे असेल तेच
जे करायचे असेल तेच कर
'बेफिकीर' हासतील फार तर
>>> सह्ही !!
बाकी मला आयकर आवडत नाही
वाटतो सुसह्य हाच जन्म
वाटतो सुसह्य हाच जन्म जर
कस्पटासमान मानलास तर
क्या बात !!!
________/\________
थेंब व्हायची मजाच
थेंब व्हायची मजाच वेगळी
ओळखेचना कुणी समुद्रभर.............. व्वा.
मतला फार छान आहे.
आयकर वगळता सगळेच शेर आवडले.
आयकर जरा कमी आवडला.
एकंदर छान गझल.
३, ४, ५ आणि मक्ता खूप आवडले
३, ४, ५ आणि मक्ता खूप आवडले
३, ४ आवडले
३, ४ आवडले
फक्त शर्यतीत कोसळायच्या रोज
फक्त शर्यतीत कोसळायच्या
रोज गाठणे नवे नवे शिखर>>>>>>> अप्रतीम
३.४,५ फार आवडले
३.४,५ फार आवडले
फक्त हाच आवडला... फक्त
फक्त हाच आवडला...
फक्त शर्यतीत कोसळायच्या
रोज गाठणे नवे नवे शिखर
थेंब व्हायची मजाच वेगळी - वाह!
बाकीचे आपल्या नेहमीच्या शैलीतलेही नाही वाटले..
वाह वा ! वाह वा! वाह वा! आता
वाह वा ! वाह वा! वाह वा!
आता खरा प्रतिसाद.......
केवढा करून जायची कहर
खोल खोल आतवर तुझी नजर......माझ्या पेक्षा छान.
रोज गाठणे नवे नवे शिखर...आवडला
थेंब व्हायची मजाच वेगळी...आवडला
..........शाम
धन्यवाद
धन्यवाद
थेंब व्हायची मजाच वेगळी
थेंब व्हायची मजाच वेगळी
ओळखेचना कुणी समुद्रभर
सगळेच खयाल आवडले पण हा विशेष कळला..
तोच चेहरा पुन; दिसेचना
मुंबईकर अनोळखी जन्मभर..ही अनुभूती असल्याने.
केवढा करून जायची कहर खोल खोल
केवढा करून जायची कहर
खोल खोल आतवर तुझी नजर....झक्कास मतला
मी तसा लपेटण्यास चांगला
तू मला करून बघ तुझा पदर.....वा !
थेंब व्हायची मजाच वेगळी
ओळखेचना कुणी समुद्रभर......क्या बात !
वाटतो सुसह्य हाच जन्म जर
कस्पटासमान मानलास तर........हम्न!
आवडली गझल....
>> थेंब व्हायची मजाच
>>
थेंब व्हायची मजाच वेगळी
ओळखेचना कुणी समुद्रभर
फक्त शर्यतीत कोसळायच्या
रोज गाठणे नवे नवे शिखर
<<
मस्त.
क्य बात है
क्य बात है
मस्तच
मस्तच
ही गझल बेफिकीरीत आहे का
ही गझल बेफिकीरीत आहे का बेफीजी वाचाल्यागत वाटते