Submitted by मिल्या on 13 July, 2011 - 02:16
खोल खोल आतवर तुझी नजर
काळजास पाडते फिरून घर
कारणाविना कसा चढेल ज्वर?
खोल खोल आतवर तुझी नजर
घाव हा तुझा तसा जुनाच पण
आजही जखम तशीच... ओलसर
एक तर उधार चेहरा तुझा
त्यात लिंपले थरांवरून थर
सांग ना सुगंध हा लपेल का?
आणतो कुठूनही तुझी खबर
तप्त अन उजाड वाळवंट मी
दे तुझेच मेघ अन तुझीच सर
रंगहीन वस्त्र जीवना तुझे
दु:ख त्यावरी ... खरी कलाकुसर
घ्यायचे असेल तर कवेत घे
पण नकोत स्पर्श हे सटरफटर
मी तुला हवा तसा दिसेन पण
आरसा जरा स्वत:समोर धर
श्वास तो शिध्यासमान वाटतो
नवल काय जर असेल त्यांत खर
दु:ख फार तर असेल वीतभर
पाहिजे रुमाल मात्र हातभर
गुलमोहर:
शेअर करा
च्यायला... भन्नाटच आहे प्रकरण
च्यायला... भन्नाटच आहे प्रकरण !!!
जबरदस्त... घाव हा तुझा तसा
जबरदस्त...
घाव हा तुझा तसा जुनाच पण
आजही जखम तशीच... ओलसर
तप्त अन उजाड वाळवंट मी
दे तुझेच मेघ अन तुझीच सर
रंगहीन वस्त्र जीवना तुझे
दु:ख त्यावरी करे कलाकुसर
घ्यायचे असेल तर कवेत घे
पण नकोच स्पर्श हे सटरफटर
हे शेर फार्फार आवडले.
एक तर उधार चेहरा तुझा त्यात
एक तर उधार चेहरा तुझा
त्यात लिंपले थरांवरून थर >>> सुंदर शेर!
रंगहीन वस्त्र जीवना तुझे
दु:ख त्यावरी करे कलाकुसर>>> छान!
घ्यायचे असेल तर कवेत घे
पण नकोच स्पर्श हे सटरफटर >>> वेगळा शेर!
श्वास तो शिधा म्हणून वाटतो
नवल काय जर असेल त्यांत खर>>> पहिली ओळ फार आवडली.
धन्यवाद व अभिनंदन!
-'बेफिकीर'!
खूपच सुंदर गझल. सगळेच शेर
खूपच सुंदर गझल. सगळेच शेर आवडले. खूप सहज !!
सांग ना सुगंध हा लपेल का?
आणतो कुठूनही तुझी खबर
हा तर खूपच आवडला
सहीच! सगळेच शेर अफाट!
सहीच! सगळेच शेर अफाट!
ओलसर, थर, स्पर्श, कलाकुसर फार
ओलसर, थर, स्पर्श, कलाकुसर फार फार आवडले..
सहीच
सहीच
चांगला प्रयत्न आहे.
चांगला प्रयत्न आहे.
थर, खबर आणि सटरफटर फार आवडले.
थर, खबर आणि सटरफटर फार आवडले.
जबरदस्त मिल्या.. सटरफटर, आरसा
जबरदस्त मिल्या..
सटरफटर, आरसा आणि शेवटचा अगदीच भावले..
बेफि.शी सहमत.
बेफि.शी सहमत.
मस्त. खूप कल्पना नविन आहेत.
मस्त.
खूप कल्पना नविन आहेत.
रंगहीन वस्त्र जीवना तुझे दु:ख
रंगहीन वस्त्र जीवना तुझे
दु:ख त्यावरी करे कलाकुसर
वाह्...लाजवाब!
जबरदस्त आवडली.
जबरदस्त आवडली.
छान आहे!
छान आहे!
मस्तच गझल मिल्या ! >>घाव हा
मस्तच गझल मिल्या !
>>घाव हा तुझा तसा जुनाच पण
आजही जखम तशीच... ओलसर
मस्तच !
छान..
छान..
ओलसर ,खबर, सटरफटर,थर....विशेष
ओलसर ,खबर, सटरफटर,थर....विशेष आणि चांगले.
गजल आवड्ली.
तुम्हाला शेर लिहायला मस्त
तुम्हाला शेर लिहायला मस्त जमतोय .................खुश झालो................
परत परत वाचली...परत परत
परत परत वाचली...परत परत आवडली...:-)
धन्यवाद!
धन्यवाद मित्रांनो... गझल
धन्यवाद मित्रांनो... गझल मध्ये थोडे फेरफार केले आहेत...
सहीच तुझी नजर..........
सहीच तुझी नजर..........
धन्यवाद मनिषा_माऊ
धन्यवाद मनिषा_माऊ
खबर, सर, कलाकुसर, खर खूप
खबर, सर, कलाकुसर, खर खूप आवडलेत.
कारणाविना कसा चढेल ज्वर? खोल
कारणाविना कसा चढेल ज्वर?
खोल खोल आतवर तुझी नजर
घाव हा तुझा तसा जुनाच पण
आजही जखम तशीच... ओलसर
एकदम सही शेर !
एक तर उधार चेहरा तुझा
त्यात लिंपले थरांवरून थर
छान !
घ्यायचे असेल तर कवेत घे
पण नकोत स्पर्श हे सटरफटर
आवडला.
अतिच सुंदर, <मी तुला हवा तसा
अतिच सुंदर,
<मी तुला हवा तसा दिसेन पण
आरसा जरा स्वत:समोर धर >
ही प्रचंडच आवडली!!
धन्यवाद परत एकदा व्वा
धन्यवाद परत एकदा
व्वा ज्ञानेशचा प्रतिसाद बघून छान वाटले... ज्ञानेश तुझ्या प्रतिसाद फार महत्वाचा असतो माझ्यासाठी तेव्हा विशेष धन्यवाद
खरोखरच नजर तुझी मिल्या वानी
खरोखरच नजर तुझी मिल्या वानी आहे, सुन्दर कल्पना आहे हो...........
सह्ही....... खासच रे भाऊ !!
सह्ही.......
खासच रे भाऊ !!