Submitted by आनंदयात्री on 12 July, 2011 - 00:31
"खोल खोल आतवर तुझी नजर" या तरहीसाठी माझा सहभाग -
खोल खोल आतवर तुझी नजर
पोचते तिथे जिथे तुझेच घर
आसवांत वाहिल्या तुझ्या खुणा
साचले रूमालभर तुझे शहर!
विरह वाढता रडायचीस तू
(मी असायचो उगाच थेंबभर)
आठवांत राहती जुन्या व्यथा
सांग मग पडेल का तुझा विसर?
चालतो तसेच पाय ओढुनी
वाट हरवली कधीच दूरवर
जीवना तुझा लळाच लागला
मरणही तुझीच वाटते कुसर
तू निवांत वाच एकदा कधी
मी तुझेच पत्र अन् तुझी खबर
- नचिकेत जोशी
गुलमोहर:
शब्दखुणा:
शेअर करा
विरह वाढता रडायचीस तू (मी
विरह वाढता रडायचीस तू
(मी असायचो उगाच थेंबभर)
व्वा.
जीवना तुझा लळाच लागला
मरणही तुझीच वाटते कुसर.... चांगला शेर.
एकंदर सुरेख गझल. धन्यवाद नचिकेत.
नचिकेत, मस्तच रचना... <विरह
नचिकेत,
मस्तच रचना...
<विरह वाढता रडायचीस तू
(मी असायचो उगाच थेंबभर)>
खुप्पच भावला हा शेर तर...!
अभिनंदन!
सह्ही
सह्ही
जीवना तुझा लळाच लागला मरणही
जीवना तुझा लळाच लागला
मरणही तुझीच वाटते कुसर
तू निवांत वाच एकदा कधी
मी तुझेच पत्र अन् तुझी खबर
बढिया!!!!!
नचिकेत, गझल छान आहे. >>तू
नचिकेत, गझल छान आहे.
>>तू निवांत वाच एकदा कधी
मी तुझेच पत्र अन् तुझी खबर >> हा शेर खूप आवडला..
व्वा!! सगळे शेर आवडले...! >
व्वा!! सगळे शेर आवडले...!
> विरह वाढता रडायचीस तू
(मी असायचो उगाच थेंबभर)
कातिल शेर!
> चालतो तसेच पाय ओढुनी
वाट हरवली कधीच दूरवर
अशक्य सुंदर!!
आसवांत वाहिल्या तुझ्या
आसवांत वाहिल्या तुझ्या खुणा
साचले रूमालभर तुझे शहर!>>
विरह वाढता रडायचीस तू
मस्त...
(मी असायचो उगाच थेंबभर)>>
चालतो तसेच पाय ओढुनी
वाट हरवली कधीच दूरवर>> ग्रेट
जीवना तुझा लळाच लागला
मरणही तुझीच वाटते कुसर>> हा भारीये...
व्वा.. क्या बात है.. एकापेक्षा एक..
लई भारी.. जियो....
वेड!
वेड!
चालतो तसेच पाय ओढुनी वाट
चालतो तसेच पाय ओढुनी
वाट हरवली कधीच दूरवर>> आवडला.
आख्खी गज़लच आवडली नचिकेत...
आख्खी गज़लच आवडली नचिकेत... जियो !!!
मस्त गझल नचिकेत विरह वाढता
मस्त गझल नचिकेत
विरह वाढता रडायचीस तू
(मी असायचो उगाच थेंबभर) >>> सुरेख
चालतो तसेच पाय ओढुनी
वाट हरवली कधीच दूरवर >>> मस्तच
हे दोन खूप आवडले...
ह्यावेळचा तरही चा मिसरा मस्त आहे. मीही प्रयत्न करतोय लिहायचा
.
.
अप्रतिम गझल!! सगळेच शेर
अप्रतिम गझल!! सगळेच शेर लाजवाब!
डॉक्टरकाका, बागेश्री, स्मितु,
डॉक्टरकाका, बागेश्री, स्मितु, हबा, दक्षे, मुक्ता, लल्या, झाडा, गिरीशजी, प्राजु, बेफिकीर - धन्यवाद!
मिल्या, धन्यवाद! लक्ष असू द्या..


ह्यावेळचा तरही चा मिसरा मस्त आहे. >> मिसरा मोहक आहे असं म्हणायचंय का तुला?
असो.. तू गझल लिही, मग बोलू आपण..
अप्रतिम!!!!!!!!!!!!
अप्रतिम!!!!!!!!!!!!
विरह वाढता रडायचीस तू (मी
विरह वाढता रडायचीस तू
(मी असायचो उगाच थेंबभर)>>> मस्त!!
मस्त
सहीये... एकदा प्रत्येक शेर
सहीये... एकदा प्रत्येक शेर नीट वाचला... एकेक खूब
जीवना तुझा लळाच लागला मरणही
जीवना तुझा लळाच लागला
मरणही तुझीच वाटते कुसर......
विरह वाढता रडायचीस तू
(मी असायचो उगाच थेंबभर)
खूप आवडले....
सुरेख. आवडली गझल.
सुरेख.
आवडली गझल.
क्रांतिताई, विदिपा, शामराव,
क्रांतिताई, विदिपा, शामराव, हर्षल, - धन्यवाद!
साती, तुमचा प्रतिसाद क्वचित असतो.. आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्द्ल thanks!
"आसवांत वाहिल्या तुझ्या
"आसवांत वाहिल्या तुझ्या खुणा
साचले रूमालभर तुझे शहर"
क्या बात है !
आवडली गझल.
फारच सुंदर!
फारच सुंदर!
तू निवांत वाच एकदा कधी मी
तू निवांत वाच एकदा कधी
मी तुझेच पत्र अन् तुझी खबर..
आह्ह्ह...!
क्या बात!!!!
क्या बात!!!!
ज्ञानेशराव, आभार! उमेश,
ज्ञानेशराव, आभार!
उमेश, सुप्रिया, ममता - तुम्हालाही धन्यवाद!
मस्त
मस्त
जीवना तुझा लळाच लागला मरणही
जीवना तुझा लळाच लागला
मरणही तुझीच वाटते कुसर
तू निवांत वाच एकदा कधी
मी तुझेच पत्र अन् तुझी खबर
खूप आवडली संपुर्ण गझल सुंदर...
वर्षा, मनिषा - धन्यवाद!
वर्षा, मनिषा - धन्यवाद!
मस्त.
मस्त.
Pages