रे मना ..

Submitted by सांजसंध्या on 9 July, 2011 - 01:16

रे मना ..

रे मना मोती पुन्हा निखळून गेले
थेंब डोळ्य़ांतील हे निथळून गेले

आस होती आठवांना आसवांची
मेघ तेव्हां गांव हे वगळून गेले

श्वास होते रोखलेले मी कधीचे
भास होते खास आज कळून गेले

जीव घेणे घाव देही सोसले मी
शीतवारे ना कधी जवळून गेले

खेळ जेव्हां जीवनाचे साहवेना
शोधते वैरी कुठे वितळून गेले

- संध्या
(२३.२०.२०१०)

कविश्रेष्ठ कै. सुरेश भट यांच्या एका गझले मुळे प्रेरणा मिळालीये..

गुलमोहर: 

मेघ तेव्हां गांव हे वगळून गेले
व्व्व्व्व्व्वाह!! मिसरा-ए-गझल!!! (अशी काही term नसली तर नसू दे! :))
अगदी भटसाहेबांसारखाच लिहिलाय मिसरा... Happy

बाकी
(१) थेंब डोळ्य़ांतील दोन गळून गेले
(२) नेमके मारेकरीच पळून गेले
इथे वृत्त बरोबर असलं तरी (१) न आणि ग पाठोपाठ उच्चारताना धडपडायला होतंय.. (२) च चा उच्चार खटकतोय.. ऐवजी, चार अक्षरी क्रियापदाचं रूप आलं असतं तर सफाईने म्हणता आलं असतं. उदा. नेमके मारेकरी चुकवून गेले इ.

सध्या एवढंच.. Happy

छान.

https://rapidshare.com/files/4277976069/Voice0005.mp3

चाल लावली आहे ........प्रयत्न केलेला आहे.........आवाज माझा खराब आहे त्यात मी मोबाईल फोन वापरा.....रेकॉर्डिंग साठी............क्षमा असावी...........

Thanks everyone. udayone. mobile varun access keley net.. sadhya itkech Happy

नचिकेत... बरोबर आहे तुझं. गणानंतर यती लांबल्याने असं होतंय.. समर्पक शब्द मिळाल्यावर बदलीन ते. लक्षात आणून दिल्याबद्दल खूप आभारी आहे.

उमेश, शाम आणि ममता धन्यवाद

उदयवन... आवाज तर छानच आहे कि, आणि चाल पण सुंदर लावलीये... Keep it up ! मनापासून आभार तुझे Happy

नचिकेत, शाम तुम्ही सुचवल्याप्रमाणे बदल केलेत.. Happy
शाम.. दिनांक गझल पहिल्यांदा प्रकाशित केली ( माबोवर नाही) तेव्हाचा आहे !!

परत बदलली.............??????

सुटसुटीत आहे आत........... Happy

छान !

..

.

गझल ठीकठाक आहे संध्या... सुधारणेला वाव आहे Happy

बहुतेक शेर cliché आहेत

भास होते खास आज कळून गेले >>> भास काही खास पण जवळून गेले असे चालेल का?

शीतवारे ना कधी जवळून गेले >>> 'स्पर्श त्याचे ना कधी कवळून गेले' असे काहीसे केले तर? शीतवारे असा शब्द प्रयोग बळंच वाटत आहे...

मिल्या

तुमच्या सूचना सर आंखो पर..:) पण शीतवारे हा शब्द मुद्दाम वापरलेला आहे. नेमका संदर्भ आहे त्याला. फुंकर असते ना !! Happy

श्वास होते रोखलेले मी कधीचे
भास होते खास आज कळून गेले

श्वास रोखून धरावं असं कधी घडतं ? पण ज्यासाठी श्वास रोखले ते तर भासच असावेत असं आज कळालं असं काहीसं म्हणायचं होतं....:)

तुमच्या सूचनांवरून तुम्ही अगदी मन लावून गझल वाचल्याचं दिसतंय....त्याबद्दल मनापासून आभार. Happy

ऑर्कूटवर वाचलेली ही गझल. पुन्हा वाचली. आवडली.
( मला पण एखादी गझल लिहावी असं तीव्रतेने वाटू लागलंय....कधीच ट्राय नाही केला Sad )

शोधते वैरी कुठे वितळून गेले>>> छान!

सांजसंध्या, दोन ओळीतील परस्पर संबंध, प्रभावी समारोप, आशयाची दोन ओळीत अधिकाधिक समान विभागणी इत्यादी बाबी आपण जमवालच ! पण प्रयत्न आवडलाच व मनापासून शुभेच्छा! Happy (अधिक उणे बोल्ल्यास क्षमस्व!)

-'बेफिकीर'!

अधिक उणे बोल्ल्यास क्षमस्व!

हे डिलीट करा बघू आधी Happy काहीतरीच काय बेफिजी !!!

उलट मिल्या किंवा तुमच्यासारखे चिकित्सक वाचक लाभणे हे खरोखर भाग्य आहे !!
मिल्या यांनी वापरलेला cliché हा शब्द अचूक आहे. कदाचित थेट नसल्याने परस्परसंबंध लक्षात येत नसावा Sad