Submitted by Godeya on 19 July, 2008 - 09:18
रोज सकाळी पडते
टक्क नेहमीचे उन
कुठे पळाला पाउस
सरला केव्हाच जून
पागोळ्याही दिसल्या नाही
धारांचा तर पत्ताच नाही
कसे व्हायचे छत्रीचे
ढग गेले गा विरून
डिक्कीत बंद रेनकोटही
टोप्यांचा वेगळाच छंद
काटा वीज आमुची
अन् नळ झाले बंद
हे वाचवा ! ते वाचवाचे
लावा नारे...
या सार्यांत जेव्हा
तुम्ही आम्ही मरे
गोदेय
गुलमोहर:
शेअर करा
या
या सार्यात जेव्हा
तुम्ही आम्ही मरे .....
किंबहुना मरुनी उरे
आणि तिळ तिळ झुरे
तुमच्या आमच्या जीवनांत
सदा सर्वच काही अपुरे अपुरे ....