पाऊस

चिंब पाऊस पाऊस
नको दुर उभी राहुस
तुजविण भिजण्याच्या
नको भरीस पाडुस
ऐक मल्हाराची तान
गाते थरथरते पान
लता बिलगे ग तरुला
विसरुनी देहभान
या ऐशा आसमंती नको रुसुन राहुस
रंग पोपटी हिरवा
बघ आसमंती नवा
काळ्या मेघांचा विहरतो
माथी डोंगराच्या थवा
या कोसळत्या सरींना नको पाठ उगा दावुस
खांदी वार्‍याच्या बैसुन
येई गारवा झोंबुन
धावे गोड अशी शिरशिरी
या ओल्या अंगातुन
या उसळ्त्या लाटांना नको बांध सखे घालुस


छानय, कौतुक. (एक दोन ठिकाणी मीटर गडबडलय), लय छान आहे.



दाद...धन्यवाद. मीटर चेक करतो.