Submitted by बेफ़िकीर on 4 July, 2011 - 07:23
खुले ओले खर्या सोन्याप्रमाणे लख्ख चमचमते
मला शोधायचे पुर्वी तुझे ते केस घमघमते
मला विसरून गेली हेच मी विसरून गेलेलो
कुणाला यातले जमते कुणाला त्यातले जमते
तुझ्यापासून ते अध्यात्म अंगी बाणले गेले
कुणाचीही चुकी असली तरीही घ्यायचे नमते
स्वतःला एकटा टाकून जातो त्या ठिकाणी मी
मला शोधून औदासीन्य जेथे शेवटी दमते
तुझ्या साड्या वगैरे वाटल्या गरिबांमधे सार्या
तरीही ठेवले आई तुझे अंतीम जाजम ते
घरी जाणे जरूरीचेच असले तर घरी जातो
बघा विश्वास ठेवा मन तसे रस्त्यातही रमते
मुनव्वर वाचल्यापासून कळली 'बेफिकिर' कविता
रचावी ओळ जी वाचून सारी काहिली शमते
गुलमोहर:
शेअर करा
तुझ्यापासून ते अध्यात्म अंगी
तुझ्यापासून ते अध्यात्म अंगी बाणले गेले
कुणाचीही चुकी असली तरीही घ्यायचे नमते >>>>> फार छान.
घरी जाणे जरूरीचेच असले तर घरी जातो
बघा विश्वास ठेवा मन तसे रस्त्यातही रमते >>>>> मस्त...
सुन्दर जमलीयं.
सुंदर गझल! मक्ता छान! स्वतःला
सुंदर गझल!
मक्ता छान!
स्वतःला एकटा टाकून जातो त्या ठिकाणी मी
मला शोधून औदासीन्य जेथे शेवटी दमते>>>>>आवडला!
बेफीकीर.. आपल्याला काही
बेफीकीर.. आपल्याला काही कामासाठी संपर्क करायचा होता.. आपण मला संपर्कातुन मेल करुन आपला इमेल कळवाल का?? आपण विपु आणी संपर्क बंद केला आहे असे दिसते म्हणुन हे इथे लिहले त्याबद्दल क्षमस्व..
तुझ्या साड्या वगैरे वाटल्या
तुझ्या साड्या वगैरे वाटल्या गरिबांमधे सार्या
तरीही ठेवले आई तुझे अंतीम जाजम ते
आहाहा...काय काळीज पिळवटून टाकणारं लिहिता !!!
घरी जाणे जरूरीचेच असले तर घरी जातो
बघा विश्वास ठेवा मन तसे रस्त्यातही रमते
कित्ती सहज...तरीही खोल गहिरं..क्या केहेने...आहाहाहा.. बोहोत खूब
मुनव्वर वाचल्यापासून कळली 'बेफिकिर' कविता
रचावी ओळ जी वाचून सारी काहिली शमते
हा शेर तर तूफान
अशाच अर्थाचा शेर आठवला....
हर एक लेहेजा यही आरजू यही हसरत
जो आग दिल मै है वो ही शेर मै भी ढल जाये
खूप अप्रतीम ..गझल ...बेफिकीरजी
आवडली गझल. यातल्या सार्याच
आवडली गझल.
यातल्या सार्याच द्विपदी आवडल्या.
स्वतःला एकटा टाकून जातो त्या
स्वतःला एकटा टाकून जातो त्या ठिकाणी मी
मला शोधून औदासीन्य जेथे शेवटी दमते
>>>> वाह !!
अप्रतिम
अप्रतिम
गझल छान आहे पण, तुझे ते केस
गझल छान आहे पण, तुझे ते केस घमघमते? केस घमघमते, हे जरा ऑड वाटतय. खाण्याच्या गोष्टींना आपण घमघमाट म्हणतो तेच चित्र डोळ्या समोर उभं राहील.
शेर क्रमांक ३ ते मक्ता हे
शेर क्रमांक ३ ते मक्ता हे सर्वच शेर खूप आवडले!!
मतल्यातला 'घमघमते' मला तरी ऑड वाटला नाही परंतु मतला इतका भावला नाही. विशेषतः पहिला मिसरा आवडलाच नाही. राग मानू नयेत ही विनंती...मला मतला कदाचित आधिक समजून घेण्याची गरज असावी.
कणखर - खुले ( मोकळे), ओले
कणखर -
खुले ( मोकळे), ओले (नाहिल्यामुळे), सोन्याप्रमाणे (सूर्यप्रकाशात आल्याशिवाय ती मला दिसायची नाही, म्हणजे घराच्या गच्चीत किंवा टेरेसवर वगैरे)
मला शोधायचे ( तू शोधत नसलीस तरी तुझ्या केसांचा सुगंध मला शोधत यायचा)
(स्वतःचीच समजूत घालण्याचा शेर आहे की तिच्या केसांचा सुगंध आपल्याला शोधायचा वगैरे, वास्तविक तिला माहीतही नव्हते की मी बघतोय, पण ते आठवून रडण्यापेक्षा मांडे खाल्लेले काय वाईट)
भूषणजी, धन्यवाद, अर्थ आधिक
भूषणजी,
धन्यवाद, अर्थ आधिक स्पष्ट करून सांगितल्याबद्दल.
मला असे वाटत आहे की, दोन मिसर्यांमधल्या संबंधाचा विचार करावयाचा झाल्यास, पहिला मिसरा हा केवळ केसांच्या वर्णनापुरता येत आहे. शेराचा संपूर्ण आशय हा दुसर्या मिसर्यातच आहे.
आपले मत वाचायला आवडेल.
तुझ्या साड्या वगैरे वाटल्या
तुझ्या साड्या वगैरे वाटल्या गरिबांमधे सार्या
तरीही ठेवले आई तुझे अंतीम जाजम ते...
जबरदस्त!
कणखर, 'नाहिल्यामुळे' ला मी
कणखर, 'नाहिल्यामुळे' ला मी महत्व देत होतो. आपल्याला तसे वाटत नाही याचा आदरच! हा भटांचा एक मतला पाहावात.
तू नभातले तारे माळलेस का तेव्हा ?
माझियाच स्वप्नांना गाळलेस का तेव्हा
वास्तविक तारे माळणे व स्वप्नांना गाळणे यांचा मी तरी संबंध लावू शकत नाही. पण मला असे वाटते की मतल्यात ही अडचण येणार! म्हणजे दुसर्या ओळीत जर मला केस घमघमते असेच सुचले असेल व ते जर आधी सुचले असेल तर केसांचे वर्णन पहिल्या ओळीत प्रामुख्याने आणायला आपोआप बांधिल व्हावे लागणार असे वाटते. तरी 'बायका नाहतात' त्या वेळेचे सूचक शब्दप्रयोग घ्यायचा मी प्रयत्न केला पण तेही अस्पष्ट आले की काय !
असो, पुन्हा विचार करून बघतो. कृपया लक्ष असूदेत.
-'बेफिकीर'!
तुझ्यापासून ते अध्यात्म अंगी
तुझ्यापासून ते अध्यात्म अंगी बाणले गेले
कुणाचीही चुकी असली तरीही घ्यायचे नमते...खुप आवडले.....
सावरी
मतल्यातल्या अडचणीबद्दल मी
मतल्यातल्या अडचणीबद्दल मी आपल्याशी सहमत आहे आणि भटसाहेबांच्या वरील शेरात दोन मिसर्यांत संबंध नाही ह्या मताशीही.
खरेच अजून विचार व्हायला हवा ह्या शेरावर असे वाटते...मी ही विचार करतो.
धन्यवाद!!
तुझ्या साड्या वगैरे वाटल्या
तुझ्या साड्या वगैरे वाटल्या गरिबांमधे सार्या
तरीही ठेवले आई तुझे अंतीम जाजम ते
आतून आलेला शेर आहे हा.. काय बोलणार यावर ?
इतर शेरांमधेही काही खूपच भिडणारे ..
विशेषतः हा
स्वतःला एकटा टाकून जातो त्या ठिकाणी मी
मला शोधून औदासीन्य जेथे शेवटी दमते
सुपर्ब !
स्वतःला एकटा टाकून जातो त्या
स्वतःला एकटा टाकून जातो त्या ठिकाणी मी
मला शोधून औदासीन्य जेथे शेवटी दमते
वा..वा..अप्रतिम !!
खुले ओले खर्या सोन्याप्रमाणे
खुले ओले खर्या सोन्याप्रमाणे लख्ख चमचमते
मला शोधायचे पुर्वी तुझे ते केस घमघमते>>>
घमघमणारा वास कशाचाही असू शकतो याबद्दल शंका नाही
मला विसरून गेली हेच मी विसरून गेलेलो
कुणाला यातले जमते कुणाला त्यातले जमते>>>
व्वा! क्या मारा है!
स्वतःला एकटा टाकून जातो त्या ठिकाणी मी
मला शोधून औदासीन्य जेथे शेवटी दमते>>>
मस्त शेर!
तुझ्या साड्या वगैरे वाटल्या गरिबांमधे सार्या
तरीही ठेवले आई तुझे अंतीम जाजम ते>>>
सर्वात जास्त आवडला!!
घरी जाणे जरूरीचेच असले तर घरी जातो

बघा विश्वास ठेवा मन तसे रस्त्यातही रमते>>>
मुनव्वर वाचल्यापासून कळली 'बेफिकिर' कविता
रचावी ओळ जी वाचून सारी काहिली शमते>>>
सुंदर शेवट!
सम्राट-ए-वियदगंगा. --
सम्राट-ए-वियदगंगा. -- बेफिकिर.
सुंदर गझल. वृत्त हाताळणी अप्रतिम.
तुझ्यापासून ते अध्यात्म अंगी
तुझ्यापासून ते अध्यात्म अंगी बाणले गेले
कुणाचीही चुकी असली तरीही घ्यायचे नमते
स्वतःला एकटा टाकून जातो त्या ठिकाणी मी
मला शोधून औदासीन्य जेथे शेवटी दमते
क्या बात है !बेफिकीरजी ,कसलं भन्नाट लिहितात .सगळेच शेर जबरदस्त .हे दोन शेर खूप आवडलेत .मार डाला
बेफिकिरजी, आपल्या गझला खूप
बेफिकिरजी,
आपल्या गझला खूप छान असतात!
<<घरी जाणे जरूरीचेच असले तर घरी जातो
बघा विश्वास ठेवा मन तसे रस्त्यातही रमते
:अगदी मनातले लिहिला आहात.
मुनव्वर वाचल्यापासून कळली 'बेफिकिर' कविता
रचावी ओळ जी वाचून सारी काहिली शमते >> क्या बात है!!!
घरी जाणे जरूरीचेच असले तर घरी
घरी जाणे जरूरीचेच असले तर घरी जातो
बघा विश्वास ठेवा मन तसे रस्त्यातही रमते
>>>>>
सहज सुंदर गहिरी गझल....
परत एकदा वाचली . मला विसरून
परत एकदा वाचली .
मला विसरून गेली हेच मी विसरून गेलेलो
कुणाला यातले जमते कुणाला त्यातले जमते
>>> क्या बात है !!
गझल आधी काव्यच म्हणून
गझल आधी काव्यच म्हणून वाचायचो... भिडायचे देखील..
काही दिवसांपासून मानवी भावना म्हणून वाचतोय...
खरेच जास्त भिडतेय !
एक वीकांत बसू म्हणतोय... माझीच गझल शिकायला ... आणि जगायला देखील ...
मै शायर तो नही.. हा हा !
केवळ अप्रतिम, बेफिकीर. हे
केवळ अप्रतिम, बेफिकीर.
हे वृत्तं कठीणय पण किती सुंदर संभाळलयत.
मतला खूप आवडला नाही. पण औदासिन्यं, "मन तसे रस्त्यातही रमते" आणि मक्ता... बेदम आहेत. खूप आवडले.
तुझ्यापासून ते अध्यात्म अंगी
तुझ्यापासून ते अध्यात्म अंगी बाणले गेले
कुणाचीही चुकी असली तरीही घ्यायचे नमते >>> अप्रतिम
इतर शेर ही खूप आवडले.
रचावी ओळ जी वाचून सारी काहिली
रचावी ओळ जी वाचून सारी काहिली शमते >>> सुरेख गझलेतली सर्वोत्तम ओळ. झाडुन सगळी गझल फाडू झालिये. अभिनंदन!
मस्त .
मस्त .
कुणाला यातले जमते कुणाला
कुणाला यातले जमते कुणाला त्यातले जमते >>> मस्तच ओळ
रचावी ओळ जी वाचून सारी काहिली शमते >> ही पण ओळ फार सुरेख
खालील शेर पण आवडलेच
मला विसरून गेली हेच मी विसरून गेलेलो
कुणाला यातले जमते कुणाला त्यातले जमते
स्वतःला एकटा टाकून जातो त्या ठिकाणी मी
मला शोधून औदासीन्य जेथे शेवटी दमते
मतला संदिग्ध वाटला केस शोधत यायचे च्या ऐवजी त्यांचा सुगंध शोधत यायचे असे काहीसे हवे होते वाटले..
केस शोधत यायचे ह्यावरून एक वेगळेच चित्र डोळ्यासमोर उभे राहिले जे इथे सागत नाही
मला विसरून गेली हेच मी विसरून
मला विसरून गेली हेच मी विसरून गेलेलो
कुणाला यातले जमते कुणाला त्यातले जमते
घरी जाणे जरूरीचेच असले तर घरी जातो
बघा विश्वास ठेवा मन तसे रस्त्यातही रमते >> पुन्हा वाचली पुन्हा खास...
Pages