Submitted by nikhilmkhaire on 17 July, 2008 - 03:21
झोपतो आता.
खूप झालं. रात्रही खूप झाली.
पॅण्डोरा वाट बघत असेल.
तिच्या सर्वज्ञात, सर्वमान्य खोक्यासोबत.
मी गच्च मिटून झोपून जाईन.
मगच ती येईल, हळूच.
मला उठवेल.
खो़कं हातात देईल.
'उघडू नकोस' असं बजावून निघून जाईल.
आताशा सवयीचं झालं आहे हे.
आजही ती आली.
खोकं दिलं.
'उघडू नकोस' असं बजावून निघून गेली.
मी तिच्या पाठमोर्या आकृतीकडे बघत राहतो.
कुठेतरी पश्चाताप जाणवायला हवा होता, तिच्या चुकेचा.
पण तो जाणवत नाही.
याआधी खोकं उघडलं तेव्हाच
जगातील यच्चयावत दु:खं त्याच्या गर्भातून बाहेर पडली.
मग आता आत काय उरलं असेल?
'आशा' आहे म्हणे युगांपूर्वी खोक्यामध्ये बंदिस्त झालेली.
दु:खांची ही धाकटी बहीण.
खोकं उघडून बघायची इच्छा युगांपूर्वीची.
खोक्याइतकीच जुनी.
आज खोकं उघडलं.
पण मोकळं होतं.
आशा कुठेच नव्हती.
आशा'रहीत' दु:ख मागे ठेवून
आता पॅण्डोरा मुक्त झाली.
..
निखिल.
गुलमोहर:
शेअर करा
हे खोकं कुणीच कसं नाही उघडलं?
हे खोकं कुणीच कसं नाही उघडलं? ते रिकामं नाहीये.
मनापासुन आवडल....दर्जेदार...
मनापासुन आवडल....दर्जेदार...
प्रतिकात्मक शैली आवडली.
प्रतिकात्मक शैली आवडली.
ग्रेट... !!
ग्रेट... !!
ग्रेट
ग्रेट
क्या बात है !!!
क्या बात है !!!