सदस्य प्रवेश |
campus recruitment आणि उमेदवारीचा काळEngineering college मध्ये सर्वांनाच campus interviews ला सामोरं जावं लागतं. हा काळ म्हणजे आयुष्यातला पहिला उमेदवारीचा काळ. त्या दिवशी लिस्ट लागणार म्हणून आम्हाला सर्वांनाच उत्सुकता होती. जवळजवळ एका तासाने selected candidates ची यादी लागली. त्यात माझं नाव न्हवतं. पहिलं REJECTION!!! त्यात भरीस भर म्हणून माझ्यापेक्षा कमी मार्कस असलेल्यालांना select केलं होतं. आठवडाभर केलेले कष्ट डोळ्यातून वहायला लागले. चांगलं academics, confidence असूनही कोणीतरी आपल्याला reject करतय ही जाणीव खूप त्रास देणारी होती. मित्र-मैत्रिणींनी समजावलं, पण खरी गोष्ट तर इथून पुढेच आहे. त्यानंतर मी तीन intervews दिले. तिन्ही वेळा aptitude tests कठीण असूनही top score केला. technical interviews दिले. पण नाही the time was not mine!!! सततच्या rejections ने मन कंटाळलं. असं वाटायला लागलं की अरे आपली certificates, topmost marks यांचा काय उपयोग आहे का नाही????? "सारखं कसं rejection होतयं??" पण यातून खूप शिकले. अजून धडपडतीये. यशाची अपेक्षा आहे, पण अपयशाने नाराज व्हायचं नाही असं ठरवलंय. असच खूप दिवसांनी मायबोली वर आहे, आपल्या मातीशी नातं असलेल्या आपल्या माणसांजवळ मन मोकळं करण्यासाठी हा लेखनप्रपंच! |
|
साक्षी, थोडा धीर धर, सगळ्यांपेक्षा उत्तम प्लेसमेंट होईल तुझी!!
साक्षी, काळजी नको करुस... मी पण ह्यातुन गेलेले.. २ - ३ रिजेक्शन्स नंतर छान नोकरी मिळाली.. धीर धर.. नक्की छान होइल तुझा.
साक्षी (काय छान नाव आहे, अगदी नुस्ता आयडी असला तरी),
).... असे अनेकानेक तारे आहेत त्या आभाळात... रोज एका नवीन तार्याचं दर्शन होईल तुला.... तेव्हा हाच आपला किंवा तोच आपला ह्यावर जीव नको लावूस...
तुझ्याच नव्हे तर अनेकांच्या मनातला सल बोलून दाखवला आहेस. कशा आशा आकांक्षांच्या तार्यांनी भरलेलं असतं आपलं आभाळ नाही? एक एक निखळून पडताना किती निराश होतो आपण.
साक्षी, एक सांगत्ये (खूप मोठ्ठी आहे मी तुझ्यापेक्षा, त्यामुळे अनुभवाचही
आणि अगदी मनातलं सांगायचं तर.... कदाचित मोठ्ठ्या तेजोनिधी सारख्या एखाद्या तार्याच्या प्रतिक्षेत असेल तुझी रात्रं
तू प्रयत्नं केले आहेस, मनापासून केले आहेस.... त्यातला आनंद या अशा 'निराशेच्या' प्रसंगांनी डहुळू देऊ नकोस.
ताठ मानेने सांग जगाला की, मी प्रयत्नं केलेत, मनापासून केलेत. त्याचं फळ मिळणं न मिळणं माझ्या हातात नाही. माझ्या प्रयत्नांसाठी मी आनंदी आहे, अभिमानी आहे. माझा तारा माझ्या क्षितिजावर उगवण्याची वाट बघतेय आणि तो पर्यंत जे काही प्रयत्नं करणं आवश्यक आहे, ते करेनच करेन. बाकी "कृष्णार्पणमस्तू"!
एकटी नाहीस तू. तुझे प्रयत्नं तुझ्या बरोबर आहेत!
किति छान लिहलयस दाद! मला पण सांत्वन मिळाल्यासारखं वाटलं, मी हि जातेय ह्यातुनच, देशात नोकरि केली, आता परदेशात शोधते आहे.
साक्षी, काळजी नको करुस.... देव जे करतो सगळे चांगल्यासाठीच... कदाचित ह्याहुन मोठि ऑफर तुझी वाट बघत असेल....
माझेही असेच झाले होते.. पण होते ते चांगल्यासाठीच होते हे खरे. ह्यातूनच नंतर काहीतरी चांगले मिळेल आणी आधी काहीच मिळाले नाही ह्याचे वाईट वाटणार नाही.
मीही interview मध्ये गचकायचो.. मग मित्राने force करून GATE द्यायला लावली.. दुसर्या दिवशी फिरोदिया म्हणून मी परिक्षेला जायलाही तयार नव्हतो.. तयारी तर काहीच केली नव्हती. मित्राने ओढून नेले. परिक्षा झाली तेव्हा असे वाटले की अभ्यास केला असता तर अजून चांगला पेपर लिहीला असता.. २ महिन्यांनी रिझल्ट आला आणी मी नंतर कानपुर ला join झालो.. जर आधीच नोकरी मिळाली असती तर मी गेट दिलीही नसती आणी ज्या संध्या मिळाल्या त्या हुकल्या असत्या. गेट च्या रिझल्ट आल्यानंतर दोन कंपन्यानी select केले होते.. पण मग offers नाकारल्या.
साक्षी,
तुझ्या अनुभवामुळे माझ्या आठवणी जाग्या झाल्या.. अगदी थोडक्यात सांगतो.
मी दहावीत पुणे बोर्डात पाचवा आणि बारावीत बोर्डात तेरावा. इंजिनियरिंगमध्ये प्रत्येक सेमिस्टरला डिस्टिंक्शन. फक्त सातव्या सेमिस्टरला पेपर चेकिंग मध्ये काहीतरी गडबड झाली आणि सगळ्या पेपर्सना ४०, ४५ असे गुण आले आणि एकामध्ये तर चक्क अनुपस्थित दाखवलं होतं. रिचेकिन्ग मध्ये सुद्धा गडबड झाली, अनुपस्थित दाखवलेल्या पेपरला छान गुण मिळाले, पण बाकीच्या पेपर्सचे गुण अजूनच कमी होऊन आले. त्यावेळी डिप्रेशन मध्ये गेलो आणि त्यांच्यावर कायदेशीर काहीतरी कारवाई करण्याची बुद्धी झाली नाही.. याचा परिणाम असा झाला की माझं फायनल ईयरचं % कमी झालं. campus इन्टरव्यू मध्ये शॉर्टलिस्टच झालो नाही. त्यावेळी एक टेस्ट घेतली होती त्यातही मी पहिला आलो. पण शॉर्टलिस्टच न झाल्याने तू म्हणतेस तशी अवस्था झाली.
नंतर मी वेगवेगळ्या ठिकाणी स्वतः अर्ज करून नोकरी मिळवली, नशीबानेही साथ दिली आणि आज मी इन्फोसिसमधे आहे. आता मी नोकरी शोधणार्यांसाठी (पात्र असल्यास) नोकरी मिळवून देऊ शकतो.
सांगण्याचा उद्देश हाच की निराश होऊ नकोस. ह्या कॉमेंट्स वगैरे सगळं खूप तात्कालिक असतं.. तुझ्यासाठी काहीतरी स्पेशल लिहिलेलं दिसतय भविष्यामध्ये.. ऑल द बेस्ट!
धन्यवाद daad!
खूप बरं वाटलं, तुझा प्रतिसाद वाचून. आत्मविश्वास दुणावला.
बाकी देणारा तो घननीळ श्यामसुंदर "कृष्ण" आहेच!!!!!!!!!
श्रीकृष्णार्पणमस्तु!!!!!!!!!!
ITgirl, swapna, akhi, dhumketu, aaftab
मनापासून धन्यवाद!!!!!
तुमच्या सर्वांच्या posts वाचून खूप बरं वाटलं.
खरच आपल्या माणसांनी दिलेला धीर वेगळाच असतो.
तुम्हा सर्व आपल्या मायबोलीकरांना धन्यवाद!!!!
आता मी काय बोलू!! सगळ्यांनी एवढे छान समजावले आहे तुला! या अनुभवांनी तू अजून शहाणी होतीयेस. माझा अनुभव थोडक्यात सांगू?? बघ तुला काही प्रेरणा मिळतीये का??
मी पण माझ्या कॉलेज मधे कायम पहिल्या तीनात येणारी.माझ्या campus च्या आदल्या दिवशी माझी अत्यंत प्रिय आजी गेली!! पहिल्या तीन कंपन्या तर माझ्या हातातून तशाच गेल्या.. Aptitude पण clear करायची ताकद नव्हती. चौथ्या कंपनीच्या आदल्या दिवशी मी रात्री ९ ला घरी आले तेराव्याहून. घरी दुसरी आजी आहे जिला चालता येत नाही.. आई - बाबा तिकडेच राहिले होते.
सकाळी ९ ला टेस्ट आणि ८ ला मी घरात स्वयंपाक करत होते... मी १० ला लगेच परत येईन असे आजीला सांगून विमनस्क अवस्थेत कॉलेजला गेले. खात्रीच होती ना ... सिलेक्ट न होण्याची. टेस्ट देऊन घरी येऊन झोपून गेले. ३ वाजता कॉलेजमधून फोन..!! इंटरव्ह्यूला या.... पुढे २ दिवसात त्याच केंपनीत ३ इंटरव्ह्यू झाले.
आणि मी सिलेक्ट झाले.
थोडा भाग नशीबाचा आणि थोडा तुमच्या आतापर्यंत केलेल्या कष्टांचा... काळजी करू नको. सग्गळं छान होईल.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आनंद या जीवनाचा सुगंधापरी दरवळावा
पाव्यातला सूर जैसा ओठातूनी ओघळावा
साक्षी,
मला मुलाखती घेण्याचा व देण्याचा भरपूर अनुभव आहे. त्यातून काही गोष्टी शिकलो त्या अशा -
१. काही मुलाखत घेणारे बर्याच वेळेला मुलाखत घेण्यापेक्षा आपल्याला किती येतं आहे हे दाखवायचा प्रयत्न करतात.
२. काही मुलाखत घेणारे basic understanding किती आहे ते बघण्याचा प्रयत्न करतात. तुला आश्चर्य वाटेल पण बर्याच जणांचा तिथेच अंधार असतो. जवळ जवळ ९०-९५% पोर पोरी इथे मोडतात.
३. काही मुलाखत देणारे निष्कारण प्रचंड बडबड करतात. बरीचशी विषयाला सोडून सुध्दा!
४. काही मुलाखत देणारे उत्तर माहीत नसलं तर उगीच बंडला मारतात. सरळ येत नाही म्हणण्यात त्यांना कमीपणा वाटतो.
५. काहींना इंग्रजी नीट येत नसतं, तर काही आधीच घाबरलेले असतात, तर काहींना स्वतःच project सुध्दा नीट समजावून सांगता येत नाही.
माझा सल्ला असा आहे - ज्याला मुलाखती घेण्याचा अनुभव आहे त्याला/तिला तुझी मुलाखत घ्यायला सांग आणि feedback घे.
शेवटी - Tough times don't last tought people do. हे लक्षात ठेव.
साक्षी
मुलाखतीला जाताना कंपनी बद्दल अभ्यास करून जावे. त्यांचे ब्रोशर , कंपनीची वेब साइट, तिथे काम करणारे सिनियर्स यांच्या कडनं प्राथमिक स्वरुपाची माहिती सहज मिळवता येते.
.
स्वतःचे strenghths, weaknessess, ideal job description इत्यादिबद्दल ची उत्तरे आधीच ठरवलेली ( व इतरांकडून ) तपासून घेतलेली असावीत. वाक्यच्या वाक्यं पाठ करून ठेवू नयेत. मुद्दे तयार असावेत.
.
मुलाखतीला जाताना वेष, केस नीट नेटके असावेत. कंपनीत जर फॉर्मल ड्रेस पॉलिसी असेल तर नक्कीच फॉर्मल कपडे असावेत. अति तंग, तोकडे, अति ढगळ, विटलेले कपडे नसावेत. चपला व पर्स सुद्धा नेटकी असावी. भडक मेकप,डोळ्यावर येणारे केस, एकदम स्ट्रॉन्ग वासाचे परफ्युम किंवा केसांच तेल वगैरे टाळणे इष्ट. मुलाखती दरम्यान ताठ बसावे. प्रश्न विचारणार्याच्या नजरेला नजर देउन प्रश्न लक्षपूर्वक ऐकावेत. मधे मधे नोटस घ्यायला ही हरकत नाही. प्रश्ण विचारुन झाला की दोन्-चार सेकंद मनातल्या मनात विचार करून मग बोलायला सुरुवात करावी. उत्तरे देताना एकाच व्यक्ती कडे बघू नये. तसेच खाली बघून , आपल्या हातांकडे बघुन बोलु नये.
टेक्निकल प्रश्न असतील तर गरज पडल्यास फळ्याचा वापर करावा. एखाद्या चित्राने किंवा कोड स्निपेट ने अर्ध्या तासाची बडबड एलिमिनेट करता येईल.
.
डु यू हॅव एनि क्वेश्चनस या प्रश्नावर आधीच विचार करून ठेवावा. फक्त बेनेफिट्स, किंवा सुट्या किती, कंटीन फ्री आहे का असले प्रश्न विचारू नयेत
.
' व्हाय डू यू लाइक धिस कंपनी' 'इथे तुमचे करियर ऑब्जेकटिव्ह्स कितपत सफल होत आहेत' असे प्रश्न विचारायला हरकत नसावी.
msn.com च्या करियर सेक्शन मधे, माँस्टर च्या साईटवर बरीच माहिती सापडेल.
बेस्ट ऑफ लक!
साक्षी : तुझे ऍकमडिक्स चांगले आहे... तुझ्यात कॉन्फिडन्स पण आहे तू टेस्ट पण पास होत आहेस तरी तुझे सिलेक्शन होत नाहीये ह्यात नशिबाचा भाग आहेच पण तू थोडे आत्मपरिक्षण पण करायला हवेस असे मला वाटते... कृपया ह्या सल्ल्याबद्दल राग मानू नकोस.. (इंटरव्हू घ्यायचा बराच अनुभव असल्याने हे धाडस करत आहे
)
खालील बाबींचा विचार कर...
१. तुझा कॉन्फिडन्स न कळत ओव्हर कॉन्फिडन्स कडे तर झुकत नाहीये ना?
२. चिमण म्हणतोय तसे बेसिक मध्ये राडा तर नाही ना... स्वतःच्या अनुभवावरून सांगतो.. campus recruitement करताना बहुतेक जण बेसिक्स वर भर देतात आणि तुमच्या अभ्यासाच्या विषयापेक्षा तुमची विचार करायची पद्धत कशी आहे... एखाद्या समस्येकडे बघायचा तुमचा दॄष्टीकोन कसा आहे इत्यादी गोष्टींवर भर दिला जातो...
३. तिसरी गोष्ट तुमचा अटीटयूड.. Who cares attitude नाहीये ना...
४. कमयुनिकेशन मध्ये पॉर्ब्लेम नाहीये ना? नुसते इंग्लिश चांगले असून उपयोउ नाही.. तुला जे म्हणायचेय ते तू कोणत्या आणि किती शब्दात मांडतेस ह्याला पण महत्व आहे.
५. शोनू म्हणते तसे कंपनी विषयी सर्व मिळेल तितकी माहिती जरूर मिळव आणि काही ठराविक प्रश्णांची उत्तरे वाटल्यास चक्क आधी लिहून काढ...
६. शेवटाचा विचित्र पण महत्वाचा मुद्दा... तू गेट, जीआरई किंवा तत्सम higher education साठी प्रयत्न करत आहेस का? तसे असेल तर तू ते सांगतेस का मुलाखतकाराला... ? हे पण रीजेक्शन चे एक कारण असते कारण तू जर higher education साठी प्रयत्न करत असशील तर कंपनीत जास्ती टिकणार नाहीस असा अडाखा बांधला जातो आणि आपोआप केस रीजेक्ट होते...
बोलता बोलता आम्ही ही माहिती काढून घेर्त असतो उमेदवाराकडून.. तेव्हा त्याबाबतीतली उत्तरे थोडी सावधपणे दे..
खूपच व्याख्यान लावले. आशा आहे की तुला उपयोग होईल
तुला खूप खूप शुभेचछा..
आणि नोकरी लागली की नक्की कळव..
================
नव्यानव्या दागदागिन्यांची ददात नाही तुला तरी
कशास देहावरी जुने चांदणे मिरवतेस ... सांग ना!
सुखात आहेस ऐकतो...
-एक झलक, वैभव जोशी यांच्या लवकरच येणार्या ’सोबतीचा करार’ या गझल अल्बमची!
साक्षी, तुला छान ऑफर मिळेल लवकरच. निराशा झटकून कामाला लाग.
दुसर्यांना आपल्याबद्दल काय वाटते याचा विचार करू नकोस. तुझे प्रयत्न चालु ठेव फक्त.
साक्षी, तुला बरेच सल्ले मिळालेले आहेत. मी टेक्निकल क्षेत्रातली नाही.. पण "इंटरव्ह्यु" हे रोजचेच काम!!
खाली दिलेले सल्ले हे मी स्वतः आचरणात आणलेले. काही मैत्रीणीनी दिलेले. आणि काही मीडिया ट्रेनिंग्मधे मिळालेले.
:)
अर्थात यातले किती सल्ले टेक्निकल क्षत्रात चालतील माहित नाही.
मुलाखतीला जाताना शक्यतो फॉर्मल ड्रेस घालावा. ट्राउझर आणि फॉर्मल शर्ट. कानामधे चेहर्याला शोभतील असे रिंग्स किवा टॉप्स. (कृपया हलते डुलते घालू नयेत) सलवार सुट घातल्यास तो पण जास्त भडक किंवा गॉदी असू न्नये. पेस्टल कलर्स्मधे प्लेन फार नक्षी नसलेला असा घालावा. चप्पल किंवा शूज पॉलिश केलेले असावेत,
हातात घड्याळ अवश्य बांधावं. (मोबाईल आहे घड्याळाची गरज काय?? असं म्हणणारे बरेच जण आहेत!!)
पर्स छोटी आणि हवी तशी कोंबलेली असू नये. कपडे इस्त्री केलेलेच असावेत. केस व्यवस्थित विंचरावेत. हलकासा मेकप करावा, (लक्षात न येइल असा) काँपॅट पावडर, आय लाईनर आणी मेकप.
कित्येक जण एका महत्वाच्या गोष्टीकडे लक्ष देत नाहीत. आपण घातलेले कपडे शून ऍक्सेसरीज या रास्तेका मालमधल्या नसाव्यात!! क्वालिटी मॅटर्स.
केबिनमधे जाण्या आधी थोडे पाणी प्यावं, यामुळे घसा कोरडा पडत नाही. किंवा खडीसाखर खावी. चिंगम अजिब्बात नको!!!!
चांगल्या वासाचे डीओ आणी परफ्युम जरूर वापरावे. पण उग्र वास नको किंवा चमेली गुलाब सारखे अत्तर टाईप परफ्युम नको.
मुलाखतीला केबिनमधे गेल्या गेल्या.. सर्वाकडे बघून स्मित द्यावे. (अति हसू नये, पण हलकेच स्मित)
त्यानी नाव विचारल्यावर नाव सांगावे. त्यानी स्वतःचे नाव सांगितल्यावर हेलो मिस्टर... हे अवश्य म्हणावे. शेक हँड मधून तुमचा कंफर्ट लेव्हल कळत असते. त्यामुळे हात घामट वगैरे नाहिये ना हे नक्की बघावं.
स्वतःच्या एकंदर ग्रूमिंगचा विचार करावा. भडक नेल् पॉलिश, रंग उडालेला चष्मा, या गोष्टी तुमचे व्यक्तिमत्व दर्शवतात.
आणि या सर्व बारीक सारीक गोष्टीकडे समोरच्याचे लक्ष असते आणि त्यातून तुमची एक इमेज त्याच्या मनामधे तयार होत असते. ( हे फक्त मुलाखतीच्या बाबतीतच नव्हे तर दैनंदिन जीवनातही तितकेच खरे आहे!!!)
प्रशनाची उत्तरे देताना प्रश्न विचारणार्याच्या नावचा उल्लेख जरूर करावा.. उदा "आय थिंक मिस्टर शर्मा.. "
आणि मोबाईल सर्वात जास्त व्हायब्रेटर मोडमधे असताना इरिटेट करतो.
मोबाईल स्विच ऑफच ठेवावा.. सायलेंटवर सुध्हा नको!!!! "काय झालं. इंटरव्ह्युचं म्हणुन्न घरचे कधी फोन करतील नेम नाही
खुर्चीवर बसताना व्यवस्थित बसावे, मुलीनी एक पाय दुसर्या पायावर ठेवून बसलेले ग्रेसफुल.
मुलाखत घेणार्याच्या प्रत्येकाशी आय काँटॅक्ट इस मस्ट. उगाच पाय हलविणे, इकडे तिकडे बघणे, खाली मान घालून बोलणे. छताकडे बघून बोलणे यातून तुमचा कमी आत्मविश्वास दिसतो. तर खूप जोरात बोलणे, एकाच व्यक्तिच्या डोळ्यात डोळॅ घालून बसणे. एक्दम रीले़क्स होउन बसणे यातून अति आत्मविश्वास दिसतो!
उत्तरे देताना बोटातल्या अंगठीशी पर्सशी वगैरे खेळू नये. हात शक्यतो रीलेक्स ठेवावे, प्रश्न ऐकत असताना किंचित पुढे झुकावे. उत्तरे देत असताना अगदी सहज हतवारे करावेत, नाटकी नव्हे!!!! केसातून हात फिरवणे, सतत ओढणी सारखी करणे वगैरे प्रकार टाळावेत.. ओढणी शक्यतो पिनप करावी.
इंग्लिशमधे जमत नसेल तर सरळ हिंदीचा आधार घ्यावा!!! चुकीचं इंग्लिश बोलण्यापेक्षा ते चांगले. अर्थात बंबय्या अथवा पुणेरी हिंदी नव्हे!!! मेरेको लगता है... इत्यादि बोलुच नये..
सर्व उच्चार शुद्ध ठेवावेत. आवाज जास्त जोरात नको, जास्त हळू नको.
सर्व डोक्युमेंट्स व्यवस्थित अरेंज करून फाईल फोल्डरमधे ठेवावीत.
प्रश्नाची उत्तरे आत्मविश्वासाने द्यावीत; थापा नकोत, मुलाखत घेणारा तुमच्यापेक्षा जास्त शहाणा आहे आणि याच प्रोसेस मधून गेला आहे याचे भान ठेवावे.
Strength and weaknesses : हे मुलाखत घेणार्यावर अवलंबून उत्तर द्यावे. मी आतापर्यंत hardworking and sincere हे weaknesses मधे सान्गते. आणि त्याचं परफेक्ट लॉजिकल उत्तर पण तयार आहे.
मुलाखत संपल्यावर त्यानी प्रश्न विचारायला सांगितलयावर कंपनी बद्दलच विचारावे. सुट्या वगैरे विचारू नये. ऑफर मिळाल्यावर या बाबीची चर्चा करता येऊ शकते.
एक दोन दिवस आरशासमोर उभं राहून मुलाखतीचा सराव जरूर करावा. बाऊन्सर्स काय येऊ शकतात याची पण तयारी ठेवावी.
छंद विचारल्यावर मेकिंग न्यु फ्रेंड्स किंवा लिसनिंग टू म्युझिक ही उत्तरे देऊ नका!!!!
माझा एक अनुभव;;;
आणि मला आयपीएल क्लायंट मिळाला!!!
मला या कंपनीमधे क्रिकेट आवडते का? जर मॅचची तिकीटे फुकट मिळाली तर ऑफिस चुकवून मॅचला जाशील का? हा प्रश्न विचारल अहोता.
मी ऑफिसमधे जास्त काम नसेन तर जरूर जाइन हे उत्तर दिले होते.
तेव्ह मुलाखतकर्त्याला तुमच्याकडून काय अपेक्षित आहे हे ते लक्षात घ्या आणि तसे उत्तर द्या.
एकदा मला जर आमच्या ऑफिसमधे साडी कंपल्सरी केली तर काय असा प्रश्न विचारला होता...
माझे उत्तर.. शाळेत असल्यापासून मला साडीची सवय आहे, त्यामुळे मला काहीच प्रॉब्लेम नाही पण कार्पोरेट मूव्ही वगैरे किंवा फिल्डमधे साडी नेसून "काम करणं" थोडे जड जाइल..
साक्षी, बरंच लिहिले आहे.. तुला जे पटतय तितके घे. आणि अऊन काही शंका असल्यास नक्की विचार. आमच्या कंपनीमधे सेलेबना मीडीया ट्रेनिंग देणारा माणूस आहे. त्याच्याकडून मी थोडी अजून माहिती घेऊ शकते.
--------------
नंदिनी
--------------
साक्षी,
वरती सगळ्यांनी तुला योग्य मार्गदर्शन केलेले आहेच..
मी अजुन काय सांगणार..
पण ह्या बाबतीत माझ्या मित्राचा एक किस्सा सांगतो.
एकदम झकास acads. कॉलेजचा टॉपर.. बाकीच्या ठिकाणी पण active.
सगळ्या कंपनीज् साठी elligible.
पण त्याला शेवटची कंपनी येई पर्यन्त जॉब मिळाला नाही.. कारण काय तर आधीच्या सगळ्या कंपनीतल्या लोकांना वाटले की हा काही आपल्या कंपनीत टिकणार नाही फार फार तर एखादे वर्ष थांबेल आणि जाईल US ला.. त्यामुळे त्याला कोणीच घेतले नाही.. शेवटच्या कंपनी मधे त्याला घेतले पण शेवटी ह्यानीच जॉईन केले नाही.. गेले साहेब UK ला...
इथे मुद्दा असा आहे की interview घेणार्याला असे वाटणे अत्यंत गरजेचे आहे की समोर बसलेली व्यक्ती आपल्या कंपनीत काम करुन त्या कामाचा काही तरी फायदा कंपनीला झाला पाहिजे.. आणि दुसरी गोष्ट अशी की कुठल्या प्रकरच्या कंपनीत नोकरी आहे त्यानुसार उत्तर देणे..
software कंपनीत कोणत्याही डिपार्टमेंट मध्ये काम करेन असे उत्तर घातक ठरु शकते.. कारण campus च्या वेळेस software कंपनी बहुतेक वेळेस developers शोधत असते.. तिथे work location च्या बाबतीत शक्य तेवढे flexible असणे उत्तम..
आणि ह्याच्या बरोबर उलटे manufacturing फर्मच्या संदर्भात म्हणता येईल.. त्यांना कोणत्याही डिपार्टमेंट मधे काम करायला तयार असणारी माणसे हवी असतात..
==================
डिंग डाँग डिंग
Hey wait for some time you will get good placement!
साक्षी, धन्यवाद! तुला केलेले हे मार्गदर्शन आम्हा मनुष्यबळ विकासाच्या विद्यार्थ्यांना ही बरच मोलाच ठरणार आहे! आणी म्हणूनच प्रथम तुला आणी ह्या सार्याना त्रिवार धन्यवाद!!
आणी कुणी specifically HR students ना काही सांगू शकेल का? आणी एक गंमत अशी आहे की आमच्या इथ मुली ५०% असून they may prefer these girls first!
well I don't mind that but then it becomes more tough for guys!!
धीर धर साक्षी ...
मला माहितीय सांगणं सोपं असतं. !
मी तर टॉप रँक्समधेही नव्हतो कधी ... पण जेव्हा जेव्हा इंटरव्ह्यूमधे अपयश आलं तेव्हा ते का आलं समजलं नाही... जेव्हा जेव्हा यश मिळालं तेव्ह ते ही का मिळालं ते तर अजिबातच समजलं नाही.
प्रत्येक गोष्टीची वेळ यावी लागते... धीर धर फक्त ! मुख्य म्हणजे स्वतःवरचा विश्वास कधी ढळू देऊ नकोस.
------
'तो' निळा बासरीवाला कधी कुठे आणि कुणाच्या रूपात येईल सांगता येत नाही पण भेटतो हे नक्की !
साक्षी ...
नंदिनीने खूपच छान आणि महत्वाची माहिती दिली आहे... त्याचा जरूर उपयोग कर.
--------
देश - विदेशातील इंटरव्ह्यू आणि नोकर्या ह्या शिदोरीवर मी माझे दोन पैसे घालतोय ..बघ काही मदत होतेय का
---------
-- कंपनीबद्दल गृहपाठ करून ठेव ...(टर्नओव्हर, ब्रँचेस, शक्तिस्थानं इ.)
-- त्या माहितीचा उपयोग बोलण्याच्या ओघात कर
-- कागदावर चक्क काही प्रश्न लिहून ठेव ..
उदा. -- मी पहिल्या तीन महिन्यात कुठे जास्त मदत करू शकते
-- तुम्हाला कुठला प्रश्न पुढच्या महिन्याभरात सोडवणं आवश्यक आहे?
-- नवीन एम्प्लॉईजसाठी कंपनीचं कल्चर कसं आहे?
-- ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंटबद्दल कंपनीचा दृष्टिकोण कसा आहे?
-- मी पुढच्या तीन वर्षांत कंपनीसाठी काय करू शकतो / शकते?
हे आणि असेच इतर प्रश्न ... तुला गुगलवर ही काही प्रश्न मिळतील.
-- प्रश्न विचारणार्याचं सगळं लक्ष एकाच ठिकाणी केंद्रित असतं ते म्हणजे WIIFM (What's In It For Me)
-- तुझी उत्तरं अशा पद्धतीनं दे की त्या व्यक्तीला जाणवेल तू मदत करण्यासाठी आली आहेस. पगार / बेनिफिट्स इ. साठी नाही !!!
-- प्रश्न जरी टेक्निकल असला तरी विचारणारा जर टेक्नॉलॉजीचा असेल तर त्याला टेक्निकल उत्तरात रस असतो. पण विचारणारा जर फायनान्सचा असेल तर त्याला उत्सुकता असते की ती टेक्नॉलॉजी वापरून तू कंपनीचा खर्च कसा कमी करशील किंवा फायदा कसा वाढवशील.
-- एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहिती नसेल तर सरळ तसं सांग... थापेबाजी नको !!
-- प्रश्नांची उत्तरं देताना प्रत्यक्ष जीवनातील / कॉलेज ऍक्टिविटीजमधली उदाहरणे दे. नथिंक वर्क्स लाईक गुड एक्झांपल्स !!
-- इंटरव्ह्यू घेणार्या प्रत्येकाचं नाव आणि ईमेल ऍड्रेस घेऊन ठेव. ईमेल नसेल तर कंपनीचा पत्ता घेऊन ठेव.
-- पुढची स्टेप काय असणार हे विचारून घे. (In other words, try to take control of closing the interivew rather than letting them do it)
-- इंटरव्ह्यू झाल्यापासून बारा-अठरा तासांत प्रत्येकाला 'थँक्यू..'ची ईमेल पाठव. ईमेल नसल्यास पत्र पाठव.
-- ज्या व्यक्तीला थँक्यू नोट पाठवशील, त्या व्यक्तीबरोबरच्या संभाषणातील एक - दोन महत्वाचे मुद्दे तुझ्या नोटमधे नमूद कर आणि हे परत सांग की तू त्याबद्दल उत्सुक आहेस.
तुझ्या उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा !!
इथे सगळे खूप छान लिहीत आहेत.. अजुनही काही मुद्दे आले तर आवडतील.. सगळ्यांनाच, सगळ्या क्षेत्रात उपयोगी पडतील..
नंदीनी आणी संदीप यांनी खुप छान माहीती दिली आहे. तुला नक्कि उपयोग होइल.
पण तुला १ सांगावस वाटतय की, जी हॉबी आहे त्याची माहीती असण फार आवश्यक आहे.
हा किस्सा माझ्या बहीणीचा...
हॉबी विचारल्या वर तिने लिसनींग म्युझिक / सिंगिंग हे सांगितल, तर तिला विचारल कुठल म्युझिक जास्त आवडत. तिच उत्तर होत शास्त्रिय गाण. मग शास्त्रिय गाण्यामधे काय काय आवडत ते तर विचरलच शिवाय १ गाण पन म्हणुन दाखवयला सांगितल.
दुसर म्हणजे फ्रेशर साठी लॉजिक clear असण फार महत्वाच. तिला reasoning साठी पण बरेच प्रश्ण विचारले. पण शेवटी तिच selection झाल.
आणी समजा सगळ जमुन जरी, selection झाल नाही तरी निराश व्हायच नाही. नवीन जोमानी सुरवात करायची.
सगळ्यांनीच अतिशय महत्वाची माहिती इथे दिलेली आहे. साक्षी , तुझ्यामुळे आज हा प्रश्न इथं मायबोलीवर चर्चेला आल्यामुळे तुझ्यासारख्याच इतरही अनेक जणांना त्याचा उपयोग होत आहे. आपल्याच इथल्या मित्र मैत्रीणींच्या अनुभवाचा तुम्हाला फायदा होत आहे. त्याबद्दल सर्वांचे आभार. आणि आपल्या मनाची होणारी घालमेल तू इथं व्यक्त करून आम्हाला आपलं मानलंस त्याबद्दल तुझंही कौतुक. कारण सहसा आपल्या संघर्षाबद्दल कुणी तो चालू असतानाच बोलत नाही तर त्यात जय मिळाल्यावर त्याचे वर्णन करत सुटतो.. तुझ्या मानसिक धैर्यामुळेच तुला ते आधीच इथे मांडणं शक्य झालं. इथे दिलेल्या सगळ्या टिप्स अत्यंत मोलाच्या आहेत.

त्यावर तू विचार कर. स्वतःचे स्वतः परीक्षण कर. आपोआप तू कुठे कमी पडतीयेस ते तुला उमगेल. आणि तुझ्याच एखाद्या मैत्रीणीला / मित्राला तुझा इंटरव्ह्यू घ्यायला सांगून feedback घेण्याचा पर्याय बेस्ट आहे!! तो नक्की वापर!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
रोके तुझे कोई क्यूँ भला
संग संग तेरे आकाश है
सहसा आपल्या संघर्षाबद्दल कुणी तो चालू असतानाच बोलत नाही तर त्यात जय मिळाल्यावर त्याचे वर्णन करत सुटतो..>>>> १००% बोललीस बघ आशू... इथे दिलेली माहीती बर्याच जणांना उपयोगी पडेल.
साक्षी, माझ्याही शुभेच्छा तुला !
साक्षी, अपयश म्हणजे फक्त यशास विलम्ब!!
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....
साक्षी,
तुझच वाक्य सांगते--sometimes time is not ours.
बाकीच्यांनी खुपच छान सांगितलं आहे, सगळ्यांच्याच उपयोगी पडेल अस.
नन्दिनी,
तुझ्या टीपस खुपच छान.
टोणग्या,
मस्तच रे!! खुप आवडलं तुझं वाक्य.
अनघा