ही जागा चारोळ्यांसाठी आहे. आपल्या चारोळ्या प्रतिसादात लिहा.
इथे काव्य संपले दोन ओळीत सारे चालीत त्या मग वाचले पुढचे उतारे
सगळ काही चालीत वाचण्याची सक्ती कशाला गझल नावाचा वेगळा विभाग केलाय ना त्याला
चालीत शब्द गाता गाता मुळ अर्थच विसरलो आयुष्याचा अर्थ कळायची वेळ आली तेव्हा जीवनात नाही उरलो
वादळाने तुझी छत्री उडाली, वाटलं द्यावा तुला आधार पण माझ्या छत्रीलाही भोकेच होती म्हणून घेतली माघार.
पहाटेच्या स्वप्नामध्ये तुझे चुंबन घेतांना बायको ओरडली चला उठा, ऑफिसला जाताय ना!
सुरात सुरांना गुंफवुनी तिने छानशी वेणी घातली झटक्यात उडवता हातानी वेणी पाठीवरती नाचली
हसताना तुझ्या गालावर छानशि खळी पडते आणि तुला पाहताना माझी नजर तिथेच अडखळते ----- तुषार
लग्न झाल्यावर
तो बायकोचे नांव बद्लतो नवराच हुषार भारी साद बायकोला मनात प्रेयसीलाच स्मरतो
---- तुषार
चार पायांच्या चारोळ्या दोन पायांच्या दोळ्या
एक पायाच्या पांगोळ्या काहिच नाही त्या वाटोळ्या
सत्यजित तुझ्या वेणी च्या चारोळीने माझी एक कविता तयार झाली
कविता मधे जाउन पहा
छान
निरोप तुझा घेतो म्हणालो तरी पाऊल तिथून निघत नाही, शरीर कदाचित ऐकेलही पण मन मात्र मानत नाही.
*****
विसरायचा प्रयत्न फार केला परत परत समोर येतेस, सहवासातल्या धुंद क्षणांचे रंग अचानक उधळून जातेस.
प्रीतीची कबुली दिली नाहीस तरी एक चूक नेहमी होते शब्दांना कितीही रोखलस तरी नजर सारं काही सांगून जाते.
उत्तरे शोधायच्या नादात अनेक प्रश्न निर्माण झाले, पुरता रिता झालो आज मी जे होते ते सर्व गेले.
प्रदिप राणे.
केवळ अप्रतिम! एकदम सही. लगे रहो!
धन्यवाद memazi.
एका बेसावध क्षणी अचानक ती समोर आली, लपवलेल्या वेदनांची क्षणात सुंदर गझल झाली....
******
तुझ्यासवे पाहिली आहेत भविष्याची स्वप्ने नवी, वाट खडतर असली तरी चालताना तुझी साथ हवी.....
सांगायचे होते बरंच काही शब्दच सापडत नव्हते, अखेर विचार सोडून दिला तुला ते केव्हाच उमगले होते....
तार छेडीली कोणीतरी एका निद्रिस्त सतारीची, पुन्हा आठवण झाली त्या क्षणाची,त्या मनाची....
त्या क्षणाच्या आठवणीने अंग अंग मोहरले तार छेडता सतारीची जीवनगाणे बहरले...
छेडल्या तारा तिने लावुनि खोटी नखे... उमटल्या सुरांसवे मी कुरवाळीली माझी सुखे...
छेडु नको तारा नखे लाउन हळुवार बोटांची अपेक्षा आहे सुरात तुझ्या बेभान होण्यासाठी माझ्या तालांची साथ आहे.
इथे काव्य संपले दोन ओळीत सारे
चालीत त्या मग वाचले पुढचे उतारे
सगळ काही चालीत वाचण्याची सक्ती कशाला
गझल नावाचा वेगळा विभाग केलाय ना त्याला
चालीत शब्द गाता गाता मुळ अर्थच विसरलो
आयुष्याचा अर्थ कळायची वेळ आली तेव्हा जीवनात नाही उरलो
वादळाने तुझी छत्री उडाली, वाटलं द्यावा तुला आधार
पण माझ्या छत्रीलाही भोकेच होती म्हणून घेतली माघार.
पहाटेच्या स्वप्नामध्ये तुझे चुंबन घेतांना
बायको ओरडली चला उठा, ऑफिसला जाताय ना!
सुरात सुरांना गुंफवुनी
तिने छानशी वेणी घातली
झटक्यात उडवता हातानी
वेणी पाठीवरती नाचली
हसताना तुझ्या गालावर
छानशि खळी पडते
आणि तुला पाहताना
माझी नजर तिथेच अडखळते
----- तुषार
लग्न झाल्यावर
तो बायकोचे नांव बद्लतो
नवराच हुषार भारी
साद बायकोला
मनात प्रेयसीलाच स्मरतो
---- तुषार
चार पायांच्या चारोळ्या
दोन पायांच्या दोळ्या
एक पायाच्या पांगोळ्या
काहिच नाही त्या वाटोळ्या
सत्यजित
तुझ्या वेणी च्या चारोळीने
माझी एक कविता तयार झाली
कविता मधे जाउन पहा
---- तुषार
छान
निरोप तुझा घेतो म्हणालो तरी
पाऊल तिथून निघत नाही,
शरीर कदाचित ऐकेलही पण
मन मात्र मानत नाही.
*****
विसरायचा प्रयत्न फार केला
परत परत समोर येतेस,
सहवासातल्या धुंद क्षणांचे रंग
अचानक उधळून जातेस.
*****
प्रीतीची कबुली दिली नाहीस तरी
एक चूक नेहमी होते
शब्दांना कितीही रोखलस तरी
नजर सारं काही सांगून जाते.
*****
उत्तरे शोधायच्या नादात
अनेक प्रश्न निर्माण झाले,
पुरता रिता झालो आज मी
जे होते ते सर्व गेले.
प्रदिप राणे.
केवळ अप्रतिम! एकदम सही. लगे रहो!
धन्यवाद memazi.
एका बेसावध क्षणी
अचानक ती समोर आली,
लपवलेल्या वेदनांची
क्षणात सुंदर गझल झाली....
******
तुझ्यासवे पाहिली आहेत
भविष्याची स्वप्ने नवी,
वाट खडतर असली तरी
चालताना तुझी साथ हवी.....
******
सांगायचे होते बरंच काही
शब्दच सापडत नव्हते,
अखेर विचार सोडून दिला
तुला ते केव्हाच उमगले होते....
******
तार छेडीली कोणीतरी
एका निद्रिस्त सतारीची,
पुन्हा आठवण झाली
त्या क्षणाची,त्या मनाची....
******
प्रदिप राणे.
त्या क्षणाच्या आठवणीने
अंग अंग मोहरले
तार छेडता सतारीची
जीवनगाणे बहरले...
छेडल्या तारा तिने
लावुनि खोटी नखे...
उमटल्या सुरांसवे मी
कुरवाळीली माझी सुखे...
छेडु नको तारा नखे लाउन
हळुवार बोटांची अपेक्षा आहे
सुरात तुझ्या बेभान होण्यासाठी
माझ्या तालांची साथ आहे.