Submitted by मामी on 6 June, 2011 - 23:50
मध्यंतरी या प्रकारच्या विनोदांचे उदंड पीक आले होते. एक कोणती तरी सिच्युएशन सांगून त्यातील एखादे पात्र अशा प्रसंगी कोणते गीत गाईल? असं ओळखायचं. मस्त धमाल प्रकार होता तो. तर इथे या धाग्यावर आपण अशीच गंमतदार, टाईमपास कोडी घालूया आणि गाणी ओळखूया. काय?
हा या धाग्याचा दुसरा भाग. असाच अखंड विणत राहूया.
पहिला भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/25569
तिसरा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/29961
चौथा भाग इथे पाहता येईल http://www.maayboli.com/node/35529
पाचवा भाग इथे पाहता येईल : http://www.maayboli.com/node/41855
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
ऑल द बेस्ट लोक्स... मी
ऑल द बेस्ट लोक्स...
मी वाचतेय.. चालू द्या.. 
मी हजर..
मी हजर..
मामी हा धागा सगळ्यांसाठी ओपन
मामी हा धागा सगळ्यांसाठी ओपन कर ना .. (म्हन्जे मला मोबाईलवरुनही पाहता येईल
)
आणि वर आधीच्या धाग्याची लिंक दिलीस तर मधुन मधुन पुनःप्रत्ययाचा आनंद घेता येईल..
ही शाहिन माला सिन्हाची मुलगी
ही शाहिन माला सिन्हाची मुलगी ना? सुमित सैगलने हिच्याशीच लग्न केलं होतं.दुसरी मुलगी मला वाटतं प्रतिभा सिन्हा.
माझं पहिलं कोडं....सोप्पं घालतेय....
कोडं १:
सुमित धावत धावत पोलिस स्टेशनमधे घुसतो. 'साहेब, साहेब, माझी मैत्रिण हरवली आहे. प्लीज तिला लवकर शोधा'.
ड्युटीवरचा इन्स्पेक्टर शांतपणे त्याच्याकडे बघतो 'काय नाव?'.
सुमित आपलं नाव सांगतो. 'अहो, तुमचं नाही हो, तुमच्या मैत्रिणीचं'
सुमित गोंधळतो. 'तिचं नाव कसं घेऊ साहेब?'.
'का? लाजताय काय? इथे काय उखाणा घ्यायला सांगितला मी?'
'नाही तसं नाही.....पण....'
'बरं, फोटो आणलाय का?'
'फोटो? नाही, तसाच निघालो घरातून...'
'काय राव तुम्ही? शिकले सवरलेले दिसता आणि मैत्रिणीचं नाव सांगायला तयार होत नाही. तिचा फोटो आणलेला नाही. आता निदान वर्णन तरी सांगता का?"
सुमित गाण्यातून आपल्या प्रेयसीचं वर्णन कसं सांगेल बरं?
कोडं २: पोलिसांनी हल्लाबोल
कोडं २:
पोलिसांनी हल्लाबोल केल्यावर बाबा रामदेव बाईच्या वेशात रामलीला मैदानावरून पळून जाऊ लागले. आधी पोलिसांच्या लक्षात आलं नाही. पण घुंगट घेतलेली एक बाई २ बायांच्या खांद्यावर हात ठेवून चालली आहे म्हटल्यावर त्यांची ट्यूब पेटली. त्यांनी त्या बायांना हटकलं आणि घुंगटवालीला घुंगट काढायला फर्मावलं. बाबा रामदेव काय म्हणतील?
हे पण सोप्पं आहे.
साधना, सगळ्यांकरता ओपन
साधना, सगळ्यांकरता ओपन नाहीये? बरं करते.
लिंक देण्याची सुचना केल्याबद्दल धन्यवाद. ती पण सुरवातीला देते.
रुख से जरा नकाब हटादो मेरे
रुख से जरा नकाब हटादो मेरे हुजुर..
घूँघट नहीं खोलूँगी सैंया तोरे
घूँघट नहीं खोलूँगी सैंया तोरे आगे
उमर मोरी बाली शरम मोहे लागे
घूँघट नहीं ...
किंवा
ना बोले ना बोले ना बोले रे
राधा ना बोले ना बोले रे
घुंगट के पट ना खोले रे
स्वप्ना कोडं १ ये चांद सा
स्वप्ना कोडं १
ये चांद सा रोशन चेहरा, जुल्फोंका रंग सुनहरा.....
कोडं क्र. ३ :
एका वेड्यांच्या डॉक्टरसमोर एक बरा झालेला पेशंट येऊन बसतो. पण डोक्यावर परिणाम झाला असताना तो त्यांच्याकडे रेग्युलरली ट्रीटमेंटकरता यायचा तरी आता बरा झाल्यावर तो डॉक्टरला ओळखतही नाही. त्यांच्याशी अगदी तिर्हाईतासारखा वागतो. तर ते डॉक्टर कोणतं गाणं म्हणतील?
मामी मतलब निकल गया है तो
मामी मतलब निकल गया है तो पहचानते नही
एका वेड्यांच्या डॉक्टरसमोर एक
एका वेड्यांच्या डॉक्टरसमोर एक बरा झालेला पेशंट येऊन बसतो. पण डोक्यावर परिणाम झाला असताना तो त्यांच्याकडे रेग्युलरली ट्रीटमेंटकरता यायचा तरी आता बरा झाल्यावर तो डॉक्टरला ओळखतही नाही. त्यांच्याशी अगदी तिर्हाईतासारखा वागतो. तर ते डॉक्टर कोणतं गाणं म्हणतील?>>
अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का??
नाही भरत आणि इन्द्रधनु.
नाही भरत आणि इन्द्रधनु.
कोडं २ घुंघट के पट खोल रे
कोडं २
घुंघट के पट खोल रे तोहे पिया मिलेंगे
मामी क्लु द्या!! :ड
मामी क्लु द्या!! :ड
<<एका वेड्यांच्या डॉक्टरसमोर
<<एका वेड्यांच्या डॉक्टरसमोर एक बरा झालेला पेशंट येऊन बसतो. पण डोक्यावर परिणाम झाला असताना तो त्यांच्याकडे रेग्युलरली ट्रीटमेंटकरता यायचा तरी आता बरा झाल्यावर तो डॉक्टरला ओळखतही नाही. त्यांच्याशी अगदी तिर्हाईतासारखा वागतो. तर ते डॉक्टर कोणतं गाणं म्हणतील?>>
वो जो मिलते थे कभी हम से दीवानों की तरह
आज यूँ मिलते है जैसे कभी पहचान न थी
देखते भी है तो यूँ मेरी निगाहो मे कभी
अजनबी जैसे मिला करते है राहो में कभी
इस कदर उनकी नजर हम से तो अंजान न थी
तुमची गणी खुप जुनी असतात.. हा
तुमची गणी खुप जुनी असतात.. हा घेउ का क्लु?
आर्या च बरोबर वटत आहे
आर्या च बरोबर वटत आहे
मी आर्याचे पर्फेक्ट वाटतेय.
मी आर्याचे पर्फेक्ट वाटतेय. दीवाने, पहचान दोन्ही आहेत.
और ये रहा आर्या का सिक्सर!
और ये रहा आर्या का सिक्सर!
स्वप्ना_राज क्लु ध्या..
स्वप्ना_राज क्लु ध्या..
नाही, माझ्या कोडयांची ही
नाही, माझ्या कोडयांची ही उत्तरं नव्हेत. मामी आणि बाकीची मंडळी, आपण कोड्यांना सिरियल नंबर्स देऊ यात का? म्हणजे किती कोडी विचारली गेली त्याचाही हिशेब राहील.
इन्द्रधनु, कोडं १ - तो तिचं
इन्द्रधनु, कोडं १ - तो तिचं नाव घ्यायला तयार नाहिये, ते का ह्याचं उत्तर त्या गाण्याच्या कडव्यात आहे. दुसर्या कोड्याला क्लू दिला तर फारच सोप्पं होईल. पण सिच्युएशन मला तरी त्या गाण्याला परफेक्ट वाटत आहे एव्हढं सांगते.
स्वप्ना, कोडं नं २ चं उत्तर
स्वप्ना, कोडं नं २ चं उत्तर हे का?
परदे मे रहने दो, परदा ना उठाओ
परदा जो उठ गया तो भेद खुल जाएगा
आर्या, येप कोडं
आर्या, येप
कोडं २:
पोलिसांनी हल्लाबोल केल्यावर बाबा रामदेव बाईच्या वेशात रामलीला मैदानावरून पळून जाऊ लागले. आधी पोलिसांच्या लक्षात आलं नाही. पण घुंगट घेतलेली एक बाई २ बायांच्या खांद्यावर हात ठेवून चालली आहे म्हटल्यावर त्यांची ट्यूब पेटली. त्यांनी त्या बायांना हटकलं आणि घुंगटवालीला घुंगट काढायला फर्मावलं. बाबा रामदेव काय म्हणतील?
उत्तरः
परदे मे रहने दो, परदा ना उठाओ
परदा जो उठ गया तो भेद खुल जाएगा
उफ्फ..एवढ सोप्पं सुचलं नाही
उफ्फ..एवढ सोप्पं सुचलं नाही तेव्हा.
आता पहिल्याचं सांग हे उत्तर का?
उम्मीद भरा पंछी,था खोज रहा सजनी
कहता था यही पंछी,हाय देखो रे गइ सजनी
मस्त सुरूवात झाली. येऊ द्यात
मस्त सुरूवात झाली. येऊ द्यात अजून.
स्वप्ना, कोडं १: आने से उसके
स्वप्ना,
कोडं १:
आने से उसके आये बहार
जाने से उसके जाये बहार
बडी मस्तानी है, मेरी मेहबूबा
मेरी जिंदगानी है मेरी मेहबूबा..
स्वप्ना, कोडं २: पोलिसांनी
स्वप्ना,
कोडं २:
पोलिसांनी हल्लाबोल केल्यावर बाबा रामदेव बाईच्या वेशात रामलीला मैदानावरून पळून जाऊ लागले. आधी पोलिसांच्या लक्षात आलं नाही. पण घुंगट घेतलेली एक बाई २ बायांच्या खांद्यावर हात ठेवून चालली आहे म्हटल्यावर त्यांची ट्यूब पेटली. त्यांनी त्या बायांना हटकलं आणि घुंगटवालीला घुंगट काढायला फर्मावलं. बाबा रामदेव काय म्हणतील?
उत्तरः
परदे मे रहने दो, परदा ना उठाओ
परदा जो उठ गया तो भेद खुल जायेगा....
नाही, माझ्या कोडयांची ही
नाही, माझ्या कोडयांची ही उत्तरं नव्हेत. मामी आणि बाकीची मंडळी, आपण कोड्यांना सिरियल नंबर्स देऊ यात का? म्हणजे किती कोडी विचारली गेली त्याचाही हिशेब राहील.
>>> फारच उपयोगी सुचना. प्लीज सगळे, आतापासून कोड्यांना सिरीयल नंबर देऊयात.
मामी दुसरा धागा पण पटापटा
मामी दुसरा धागा पण पटापटा विणायला घेतला आहेस
पहिल्या धाग्याची मस्त शाल बनली आहे. ह्या धाग्याकरता अभिनंदन.
कोडे ४: संजीवकपूर प्रेमात पडला तेंव्हा कुठले गाणे म्हणायचा?
Pages