Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40
पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मला मदत
मला मदत करा प्लीज्...लेकीच्या वाढदिवसाची पार्टी करायची आहे.३१ मोठी माणसे आणि ८ लहान मुले आहेत, २ ते १० वयाची. मेन कोर्स आहे पाव भाजी, बुंदी रायता आणि वेज बिर्याणी, थोडे सलाड्. बाकी आधी चिप्स , साल्सा, veg meatballs(readymade) , अजुन एखादा snack आणि गोडामधे केक आणि आईस्क्रीम .( हो, मी आळशी आहे :-)) तर मला सांगा की पाव भाजी आणि बिर्याणि साठी काय काय किति लागेल्?आदल्या दिवशी काय काय करता येइल?
पावभाजी
पावभाजी आदल्या दिवशीच तयार करुन ठेवता येईल.. आणि दुसर्या दिवशी थोडे पाणी घालून गरम केले की काम होईल.
पण नको त्या पेक्षा पावभाजीसाठी लागणार्या भाज्या आदल्या दिवशी उकडून ठेवा आणि दुसर्या दिवशी भाजी करा..
बटाटे, ढब्बू मिरची, फ्लॉवर हे आदल्या दिवशीच उकडून घ्या. टोमॅटोची प्युरी पण आदल्या दिवशीच करता येईल.. कांदा पण आदल्या दिवशीच किसून ठेवता येईल.. मटार जर घालणार असालच तर ते दुसर्या दिवशीच उकडा.. आदल्या दिवशी उकडून फ्रिज मध्ये ठेवलेत तर डांडरतील.
बिर्याणी साठी लागणार्या भाज्यांची पण आदल्या दिवशीच तयारी करता येईल.. बटाटा, फ्लॉवर, श्रावणघेवडा(फरसबी/बीन्स), कांदा..
आणि ३५ माणसांसाठीचा अंदाज...
हे कोणत्या तरी अचार्यालाच विचारायला पाहिजे.. 
=========================
रस्त्याने जाताना वाटेत नाचत मासे पाहत थांबू नये...
डांडरतील
डांडरतील हा शब्द पहिल्यांदाच ऐकला.
मी पण...
मी पण... धन्स himschool, आता बाकी लोकांनी अंदाज द्यायची वाट पाहते...
डांडरतील -
डांडरतील - डांडरणे.. शक्यतो कडधान्यांच्या बाबतीत आमच्या घरात वापरला जातो.. एखादे कडधान्य पूर्णपणे शिजले पण काही कारणाने ते शिजल्यावर पण जास्त वेळ तसेच ठेवले गेले तर ते परत कडक होतात. मटार तर अगदी तसा होतोच होतो.. मटार पूर्ण शिजवून जर फ्रिज मध्ये ठेवला तर दुसर्या दिवशी बाहेर काढल्या नंतर परत कच्चाच असल्या सारखा लागतो.. तो जो प्रकार होतो ना त्याला डांडरणे असे म्हणतो..
स्नेहा.. तुम्ही मला शाळेत बसवलेत की हो..
=========================
रस्त्याने जाताना वाटेत नाचत मासे पाहत थांबू नये...
sorry,himscool...
sorry,himscool...
दांडरतील>>>
दांडरतील>>>दांडरणे>>"पुरणासाठी डाळ शिजवल्यानंतर पाणी काढताना फार वेळ चाळणीत ठेवली, तर दांडारते" असा शब्दप्रयोग मी ऐकला आहे.
डांडारतील >> हा अपभ्रंश असेल कदाचित.
अरेच्चा! मला वाटलं मी शब्दार्थाच्याच बा.फ.वर आहे. विषय बदलाबद्दल सॉरी लोकहो.
प्लीज
प्लीज कोणीतरी अंदाज द्या...मला सामान आणता येइल मग...
हाय
हाय स्नेहा,
मी तुला माझा अंदाज सांगते. १५ बटाटे, १० वाटी मटार, ५ वाटी फ्लॉवर हे शिजवून.( मटार आणि फ्लॉवर आवडेल तसे कमी जास्त कर.) आणि ७-८ टोमॉटो, ४-५ कांदे आणि ३-४ शिमला मिरची याची फोड्णी. आणि लसूण ही लागेल ५-६ टे. स्पू.
एकदा कॉलेज चा भयंकर खादाड ग्रुप साठी अस केल होत. बाकी तू तुझ्या आवडीनुसार बदल कर.
धन्स,
धन्स, तराना..बिर्याणिसाठी तांदूळ किती घ्यावा लागेल?
जवळ जवळ ४०
जवळ जवळ ४० माणसे असतील तर २० वाट्या घे. आणि भाज्या असतीलच. थोडा जास्त झाला तर झाला. एवढी मोठी भांडी आहेत का पण? मला अस कल्पना करुनच महाभारतात गेल्यासारख होतय.
नाही, मोठी
नाही, मोठी माणसे ३१ आहेत, बाकी छोटी मुले आहेत्.आणि बिर्याणिमधे सरळ sam's मधले mix veg टाकणार्...आणि भांडी आहेत तशी...
जर पुलाव
जर पुलाव करणार असाल तर भाज्या असतीलच. तर प्रत्येक माणशी एक मूठ असे मोजुन घे. एक कप (मेजरिंग क जो साधारण २५० मिली. चा असतो) त्यात ३ माणसांचा भात होईल.
तुझ्या मेन्युमधे लहान मुलांसाठी स्पेशल काही दिसत नाहीये. ७-८ वर्षापुढील मुले खातील पावभाजी आणि भात. लहान मुले नाही खायची. ते वेजी मीटबॉल्स म्हणजे साधारण मंचुरियन सारखे असतील. ते खूप तिखट नसतील तर मुले खातील. अन्यथा मुलांसाठी पास्ता, नुडल्ससारखे काहीतरी असावे.
thanks,कराडकर्.
thanks,कराडकर्. वेजी मीटबॉल्स बिल्कुल तिखट नाहीत, अगदि mild आहेत्.आणि बिर्याणि पण मी खूप तिखट नाही करणार...तशी पास्ताची कल्पना छान आहे..
आणि हसू
आणि हसू नका, पण मला पाव भाजी च्या भाज्यांचा अंदाज किलो मधे पण हवा आहे.म्हणजे सामान आणायला बरे....
स्नेहा
स्नेहा तुझा अनुभव आम्हाला नक्की कळव
हो, शनिवार
हो, शनिवार झाला की सांगीन...
स्नेहा-
स्नेहा- मसाल्यांच्या अंदाजाबद्दल सावधान. ज्या कृती प्रमाणे करणार आहेस ती जर ४ जणांची असेल तर त्याला गणिता प्रमाणे सम प्रमाणात गूणू नये. मी एकदा केला होता हा पराक्रम. ४ जणाच्या मसाला राजम्याच्या कृतीला ४ नी गूणाकार करुन- १६ जणांसाठी करायचा प्रयत्न. भीषण झालं होतं ते प्रकरण. नंतर अश्रूपात - ते प्रकरण आवरणे, दूसरे काहीतरी करणे, मग पाहूणे यायच्या आत त्या राजम्याची विल्हेवाट लावणे वगैरे. ते फेकताना (अर्थातच) नव्-याचा एक खोचक प्रश्न- हे Bio degradable असेल का ग?
कचरा घेऊन जाणारा पण हे प्रकरण घेऊन जायला बॉम्बविरोधी पथक बरोबर घेऊन मग डायरेक्ट लॅब मध्ये पाठवेल- हा त्याचा अंदाज.
३५
३५ माणसांसाठी पाव भाजी :
सरासरी ४ पाव प्रत्येक माणूस खाईल ह्या हिशोबाने भाज्यांचे प्रमाण :
बटाते - २ किले
कांदे - २ किलो
टोमॅटो - दिड किलोतले २-३ वगळून
सिमला मिरची - पाऊण किलो
मटार दाणे - ४ वाट्या
फ्लोवर - सव्वा किलो
आलं लसूण पेस्ट - साधारण १ ते दिड वाटी
बाकी मसाला, तिखट, मीठ आपल्या अंदाजाप्रमाणे
बिर्याणीऐवजी जीरा राईस किंवा चिल्ड दहि भात नाही का चालू शकणार? पाव भाजीत सगळ्या भाज्या आहेतच.. परत बिर्याणीतही भाज्या... शिवाय दोन्ही पदार्थ मसालेदार आहेत.
धन्स, रैना
धन्स, रैना आणि मंजुडी...
सगळ्यांच्
सगळ्यांच्या छान छान टिप्स असल्यामुळे पार्टी छान झाली.पास्ता पण केला होता. संजीव कपूर च्या रेसिपी वरून पाव भाजी केली, ती सगळ्यांना आवडली. वेळेवर ५ लोक न आल्यामुळे थोडे अन्न उरले, पण एक bachelor असल्यामुळे त्याच्याबरोबर पाठवून दिले. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद....
लाजो,
लाजो, व्हेजी पफ, बनाना मफीन आणी आपला मस्त कडक आले-वेलची घातलेला चहा कर. पफ आणी मफीन आधी करता येतील. ऐनवेळी पफ गरम करुन द्यायचे...
दोन उत्तर
दोन उत्तर भारतीय कपल्स जेवायला येणार आहेत (कदाचित रात्रीच्या - अजुन नक्की नाही- लंच की डिनर)
मी ठरवलेला बेत असा आहे मराठी आणि युपी असे दोन्ही मेन्य आहेत डोक्यात ....कोणता करु? की अजुन काही बदल सुचवु शकतात?
स्टार्टर : मुग भजी चटणी , चिप्स, ज्युस
मेन कोर्स :
मराठी :
चपात्या,
पालकाची पातळ भाजी
बटाटे उकडुन कोरडी भाजी
चवळीची कोरडी भाजी
वरण भात
मठ्ठा
बुंदी रायता/ मिक्स वेज रायता
तिळाची चटणी
युपी :
फुलके
पालक पनीर
आलु गोबी/ आलु मटार
शिमला मिरची भरुन
मठ्ठा
बुंदी रायता/ मिक्स वेज रायता
तिळाची चटणी
पुलाव
आणि शेवटी
मस्तानी किंवा आईस्क्रीम.
मला कळत नाहीये की मराठी मेनु बनवावा की उत्तर भारतीय
. यात काही बदल करु का? अजुन काही सुचवता येईल का?
-प्रिन्सेस...
मला कळत
मला कळत नाहीये की मराठी मेनु बनवावा की उत्तर भारतीय >>> मला वाट्त मराठि मेनु बनवा, कारण त्यांना हि थोड चेंज ना!
प्रिन्सेस,
प्रिन्सेस, मराठी मेन्यु कर मस्तपैकी. चवळीची कोरडी भाजी म्हणजे उसळ करणार आहेस काय? कुठलीतरी एक उसळ कर. उ. भा. लोकांना नाविन्य असते उसळीचे.(स्वानुभव) आणि काकडीची दही घालून कोशिंबीर. बाकी बेत मस्त आहे.
(मी पण येणार... :))
................................
आज फिर जीनेकी तमन्ना है .....
धन्यवाद
धन्यवाद थंड आणि प्राची
प्राची, चवळीची उसळ नाही - चवळी रात्रभर भिजवुन दुसर्या दिवशी मटणाला बनवतो त्या मसाल्यात (मसाला कमी वापरायचा) परतायची . झणझणीत असते ही भाजी .
मराठी मेनु आवडेल की नाही याचे टेन्शन होते. पण तुला अनुभव आहे ना , मग मराठीच मेनु करते.
ये ना ग... अगदी कधीही ये
-प्रिन्सेस...
युपी चा
युपी चा मेनु नको वाटतोय त्यातल्या स्टफ्ड सिमला मिरचीच्या भाजीव्यतीरिक्त बाकिचे बरेचसे कॉमन आहे.
तुझा मराठी मेनु मस्त आहे. त्यातही थोडी अदलाबदल सांगतेय बघ पटतेय का.
एक उसळ असावी हा स्वानुभव. पालकभाजी खुप पातळ नको आळुच्या फदफद्यासारखी थोडी पळीवाढी टाईप असु दे. मट्ठा असेल तर रायता नको त्यापेक्शा खमंग काकडी वगैरे चालेल. किंवा मठ्ठा नको करु आणि रायता कर कारण शेवटी मस्तानी किंवा आईसक्रीम आहे. मठ्ठ्याऐवजी जलजीरा चालेल का बघ.
धन्यवाद
धन्यवाद मिनोती...
पालकाची भाजी अळुभाजी सारखीच करणार आहे मी. मठ्ठा न ठेवता जलजीरा.... चालेल....
अजुन काय सुचवु शकतेस , आमसुलाचे सार कसे वाटतेय?
-प्रिन्सेस...
आमसुलाचे
आमसुलाचे सार मस्तच. कुणाही अमराठी माणसांना हा प्रकार माहितच नसतो अजिबात. आणि तब्येतीलाही चांगलंच.
जलजीरा हे
जलजीरा हे क्षुधावर्धक आहे ना? जर जेवणाआधी देणार असशील तर खोबरे घालून केलेली कच्ची सोलकढीही करू शकतेस, जलजीराऐवजी.
................................
आज फिर जीनेकी तमन्ना है .....
Pages