Submitted by admin on 10 July, 2008 - 11:40
पाहुणे येणार आहेत पण बेत काय करावा? या भाजीबरोबर ती कोशिंबीर चांगली लागेल का? तुमचे प्रश्न इथे विचारा.
पण त्या अगोदर मायबोलीकरांनी सुचवलेले Menu Combinations इथे पहा.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तांदळाची
तांदळाची भाकरी, भरली वांगी, मिरचीचा ठेचा, चिकन रस्सा च्या जोडीला स्टार्टर काय ठेवावेत कुणी सुचवेल का?
पाटवड्या
पाटवड्या कशा वाटतील? तुला हवी असेल तर रेसीपी देते.
पाटवड्या
पाटवड्या म्हणजे पिठल्याच्या वड्या ना?
हो त्याच
हो त्याच वड्या पण थोड्य खमन्ग असतात.
फिकट
फिकट हिरव्या लाम्बुडक्या मिरच्या मिळतात ( हंगेरियन म्हणत असावेत त्यांना किंवा बनाना ) त्यांना मधे चीर देऊन बिया काढून टाकून त्यात खोबरं कोथिंबीर, भाजलेल्या जिर्याची पुड, मीठ लिम्बाचा रस, थोडसं मायक्रोवेव्ह मधे भाजलेलं बेसन कालवून भरायचं अन तव्यावर थोडं थोडं तेल सोडून मंद आचे वर मिरच्या खरपूस भाजायच्या. आधी करुन ठेवून आयत्या वेळी टोस्टर ओव्हन मधे गरम करून वाढायच्या. मिरच्या तिखट असतील तर थोडावेळ लिम्बाचा रस अन मीठ आतून लावून ठेवून मग धुवून घेता येतील.
पाटवड्या
पाटवड्या मस्तच..... प्रज्ञा, सुरळीच्या वड्या, कोथिंबीर वडी, मेथी वडी, अळूवडी, किंवा मटार पॅटीस बघ कसं वाटतंय....
लाल
लाल भोपळ्याचे भरित, किंवा काकडीची कोशिंबीर. बाकि झणझणीत पदार्थाना समतोल ठरतील.
धन्यवाद
धन्यवाद सगळ्यांना. शोनू मिरच्या मस्तच. मिनोती देशील का तुझी कृती. मला आवडेल करून बघायला तुझ्या कृतीने.
प्रज्ञा
प्रज्ञा इथे बघ!
http://www.maayboli.com/node/2631
----------------------------------------------------------------
~मिनोती.
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.
हा मेनु
हा मेनु कसा आहे ?
१. दाल्-बाटी, व्हेज बिर्याणी, काकडीची कोशींबीर, गुलाब्-जामुन. सुरुवातीला- पनीर टिक्का (कोरडा), पुदिना चटणी, हमस.
२. पनीर मसाला, भरली मिर्ची, दाल्-तडका, जीरा-राइस, टोमॅटोची कोशींबीर, पोळ्या, रस्-मलई. सुरुवातीला- आलु टिक्की, पुदिना चटणी.
.
दोन प्रसंगी लोक येणार होते. पहिल्या लोकांना थोडे वेगळे खायचे होते. म्हणुन दाल्-बाटी केली. शिवाय त्यातली एक जण दोन्ही वेळेस होती. त्यामुळे एकच पदार्थ परत करुन चालणार नव्हता. परत कुणाला असे combination करण्या आधी तुमचे मत घ्यावे म्हणुन पोस्टले
हा मेनु
हा मेनु कसा आहे ? >>>>
.
प्रत्यक्ष अनुभव घेतल्याशिवाय सांगता येनार नाही.
तृप्ती,
तृप्ती, लोक झोपले का तुमच्या घरीच नंतर
दाल बाटी बट्ट्या स्टाईल म्हआण्जे खूप तूप न ओतता तर ठीक नाहीतर व्हेज बिर्यानी, गुलाबजामुन आणि पनीर टिक्का सगळेच खूप हेव्ही वाटतेय
व्हेज बिर्यानी ऐवजी पुलाव आणि पनीर टिक्का ऐवजि एखादे हलके अपेटाईझर शक्य होईल का?
दुसरा मेनु एक्दम मस्त आहे पण - will not change a thing!
----------------------------------------------------------------
~मिनोती.
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.
तूप न ओतता
तूप न ओतता तर ठीक >>>> कसचं, मस्त ताजं ताजं तुप केलं होतं
बाट्या अक्षरशः हाणल्या सगळ्यांनी. बिर्याणी थोडी उरली खरे. आणि जेवणं झाल्यावर कुठे-कुठे जायचे ठरले होते ते आळसावुन घरातच गप्पा ठोकत बसलो 
८ मैत्रिणी
८ मैत्रिणी आणि त्यांची प्रत्येकी १ अशी ८ मुलं (सगळी ५ वर्षाची) संध्याकाळी ७च्या सुमारास येणार आहेत. कृपया कांदा-लसूण विरहित असा बेत सुचवा. आईसक्रीम केकही नको आहे. मुलं आली की काही सुचू देणार नाहीत, त्यामुळे शक्यतो सगळं तयार करून ठेवायचे आहे, आयत्यावेळी काही (तळणे वगैरे) नको. एक मुख्य पदार्थ, एक बाजूचा आणि एक गोड पदार्थ हवाय.

------------------------------
झाडावर प्रेम करा, झाडा’खाली’ नको!
संध्याकाळ
संध्याकाळी ७ वाजता म्हणजे पोटभरीचंच हवं (dinner cum snacks)......
.
फरसबी, गाजर, मटार घातलेला उपमा/मटार भात्/मसाले भात्/पुलाव याबरोबर दाबेली बघ कशी वाटतेय.. जनरली मुलांना आवड्तेच. त्यावर कच्चा कांदा घालू नकोस फक्त शेव+दाणे घाल. (जरा खटपटीचा प्रकार आहे हा... पण बरीचशी तयारी आदल्या दिवशी होऊ शकते) गोड पदार्थ छोटे रसगुल्ले किंवा बुंदी जामून (हे विकत आणावे लागतील) किंवा गाजर/दूधी हलवा.
.
अमिरी खमण+दहीवडे+कसल्याही वड्या
.
किंवा मुख्य पदार्थ म्हणून गोड शीरा (अननस किंवा आमरश घालून), कोथिंबीर वडी/मेथी वडी/ढोकळा/कचोरी आणि त्यावर कुठलंही मिल्कशेक.
.
अजून काही सुचलं तर बघते..
पावभाजी (
पावभाजी ( कमी तिखट, लाल भोपळा वापरून ) किंवा दाबेली हा मुख्य पदार्थ.
आणि केळी घालून केलेला शिरा, कसा वाटेल ? दोन्ही पदार्थ आधी करता येतील.
बघा एकमत
बघा एकमत झाले. तेही एकाच वेळी.
इडली एकदम
इडली एकदम सोपे आणि मुलांना आवडणारे खाद्य आहे..मायक्रोवेव्ह मधे गरम केले की झाले...
केळी घालून केलेला शिरा>> हे सोबत छान वाटेल
मला ना ६
मला ना ६ जणांसाठी टीपीकल मराठी शाकाहरी जेवण करायचे आहे येत्या नागपंचमीला.
वालाचे बिरडे नी निवर्या चार जणांची फर्माईश आहे. तर त्याबरोबर काय जाईल? कृपया कोणी सुचवेल का?
मी हा मेनुचा विचार केला आहे. सगळे जेवण मी एकटीच करणार आहे(मदतीला कोणी नाही आहे). फक्त त्याच दिवशी ऑफीसला दांडी मारून सकाळी उठून करणार आहे दुपारच्या जेवणाला १ पर्यन्त. तेव्हा एवढे सगळे करायचे आहे.
मी साधारण वेळेचा अंदाज बांधून आहे. त्यात काही तयारी जसे नारळाचा चोव,चटण्या,वाल साफ करणे,खोबर्याचे वाटण वगैरे आदल्या दिवशी करेन.
गोडा: वेळः १ तास
निवर्या,
उकडीचे मोदक,
आमरस शीरा,
मुख्य जेवण: ३ तास अंदाजे
आमटी(गूळ्,गोडा मसाला टाकून),
तोंडली भात (?) करु का हा प्रश्ण आहे,
साधा भात,
वालाचे भिरडे,
कोथींबीर चटणी,
खमंग काकडी,
चपाती(त्याच दिवशी सकाळी),
कोबीची भाजी मिरची ,ओले खोबरे टाकून,
पापड,
मठ्ठा,
आणखी काय काय करु शकते चमचमीत? एखादी आणखी कुठली भाजी जावु शकते?
खाणारे खूप चवीचे आहेत.
मनु, तु
मनु,
तु अगदी what will go? चा शब्दशः मराठी अनुवाद केला आहेस. असो, भा. पो. 
तुझ्या इथे अळू मिळतं का माहित नाही, मिळत असेल तर बिरड्याबरोबर अळू हा टिपीकल मराठी मेनू होऊ शकेल. डाळ, दाण्यांबरोबर मस्त काजू घालून कर. आणि तोंडली भात केलास तरी त्याच्याबरोबर खाता येऊ शकेल. मला वाटतं की मोदक, निवर्या, शिरा आणि बिरडं इतके चविष्ट पदार्थ असताना दुसर्या भाजीची आवश्यकता नाही. तसंही तू आमटी आणि कोशींबीर करणार आहेसच. कोबीच्या भाजीऐवजी कोबीची भजी कर, मस्त कांदा भजीसारखीच लागतात.
बाकी तुझी खरंच कमाल आहे. मोदकांपासून सगळं जेवण एकटीने करणार म्हणजे अगदी तुझं कौतुकच आहे.
मंजू,
मंजू, धन्यवाद, अग मला कोबीची भाजी विषेश आवडत नाही म्हणून खटकत होती. तळणीचे पदार्थ मी टाळतेच, उगाच एकदा तळून तेल फेकून देणार. मग नुसते बिरडं नी आमटीच ठीक आहे ना? म्हणून तोंडली भात. अळूचे बघायला हवे. बघुया कितपत झेपतय ते नाहीतर दुपार होईपर्यन्त कामवाली बाई दिसेन थकून लोकांपुढे.
btw हे होणार्या खास तिकडच्या मंडळीसाठी आहे.
आधीच तिकडच्या एकीने 'साधेसंच' आहे ना हा मेनु असे (उगीचच)म्हटले नी मला विचारात पाडलेय. :).(स्वतला तर मोदक सुद्धा येत नाहीत).
असो.
आमरस असेल
आमरस असेल तर त्याबरोबर पिठ्पोळ्या किंवा गवसण्या करायची आपल्याकडे पद्धत होती. कृति असावी इथेच. सांज्याच्या पोळ्या पण करता येतील. हे दोन्ही प्रकार आदल्यादिवशी करता येतात.
टिनमधे तयार अळूवड्या मिळतात. त्याची रस्साभाजी किंवा त्या फोडणीला देऊन वापरता येतील.
जर मसाले भात असेल तर आमटीपेक्षा काकडीचा कायरस चांगला लागेल. हाहि आदल्या दिवशी करुन ठेवता येतो. पंचामृत देखील करता येईल. तेहि आधी करुन ठेवता येते.
btw हे
btw हे होणार्या खास तिकडच्या मंडळीसाठी आहे.
अरे व्वा, मनु, हार्दिक अभिनंदन!! मस्त बातमी दिलीस तू.... पण चुपके चुपके दिलीस ती...
.
आधीच तिकडच्या एकीने 'साधेसंच' आहे ना हा मेनु असे (उगीचच)म्हटले नी मला विचारात पाडलेय.
ही सुरुवात झाली म्हणायची का?
.
तुला तळण आवडत नसेल तर तोंडी लावणं म्हणून भरली मिरचीचा विचार कर....
(स्वतला तर
(स्वतला तर मोदक सुद्धा येत नाहीत).
तू सगळंच इतकं मनापासून करतेस, की सगळेच खुश होतील नक्की. 'ते'ही 


मन्जू, ही सुरुवात झाली गं
.
अभिनंदन मनुस्विनी
मला 'वैयक्तिक' असं वाटतंय की खूप जास्ती पदार्थांचा घोळ घालू नकोस. बिरड्या, कोशींबीर, मोदक, शीरा, तोंडली भात याबरोबर टमॅटोचं सार चालेल. पांढरा भात नकोच. आणि पापडाऐवजी, मन्जू म्हणते तसं तळण- भजी, किंवा छोटे वडेही चालतील. गोडाच्या जेवणाला तळण हवंच गं
------------------------------
झाडावर प्रेम करा, झाडा’खाली’ नको!
बरं..
बरं.. निवर्या कशा करायच्या? मुळात 'निवर्या' कशाला म्हणतात तेच मला माहित नाहीये.. मी आपली तू मोदकांबरोबर करत्येस म्हणजे निवग्र्या असतील असं धरून चालले होते.. पण त्या तू गोड पदार्थात लिहिल्या आहेस, म्हणून विचारतेय....
अभिनंदन
अभिनंदन मनु. पुनमला मोदक. फार जास्त करत बसु नकोस.
तुझ्या मेनुमध्ये तोंडलीभातापेक्षा मसालेभात(optional), साधा भात-आमटी/सार/साध वरण, भरली मिरचीपेक्षा भरली वांगी-पोळ्या, तळण करत असशील तर भजी नाहीतर फ्रोझन पात्रा- ऐनवेळी तव्यावर गरम करणे. वाटणे आणि चटण्या आदल्या दिवशी करणे. आमरस शिरा पटकन होणार असेल तर नाहीतर श्रीखंड(घरी करणार असशील तर आधी करून ठेवता येइल.)
thanks to all for the wishes
thanks to all for the wishes and suggestions! ते कधीच मार्च मध्ये ठरले पण होणार आहे नोव्हेंबर मध्ये सर्वांच्या वेळा साधून. असो.
बरे तर माझा मेनु ठरला,
साधा भात,
मसाले भात /तोंडली भात्(जर fresh मस्त तोंडली मिळाली तर नाहीतर मसाले भातच करेन),
तूरीची आमटी,
बीरडं,
भरली वांगी,(चिन्नुची idea, thanks)
कोथींबीर चटणी,
खमंग काकडी,
भाजलेले (microwave ) पापड,
चपाती,
मट्ठा,
गोडात मोदक, निवर्या, आमरस शीरा.
गवसणीचा विचार डोकावला मध्येच कारण मोदकाचे पिठ जरा ज्यास्त करून कामी येइल. पण खूपच होइल ते. भजी वगैरे करायला आवडेल पण मोदकच वेळखाउ काम आहे नी गस जवळ उभे रहायचे आणखी थकायला होणार. त्यात चपात्या पण बर्याच करायच्या आहेत. चापून आवडीने खाणारी माणसे येणार आहेत.:)
मंजू,
निवर्या म्हणजेच उकडीचे कानवले. सेम मोदकाचेच पिठ घेवून आकार करंजीसारखाच द्यायचा पण ती desing काढायची जी रोजच्या करंजीला काढतो ती. करंजी बीबी वर बघ मिळेल्.(त्या design ला काय म्हणतात विसरले.)
मनुस्विनी,
मनुस्विनी, अभिनंदन !!! बाप रे तु हे सगळे एकटी करणार ? मोदकाचे सारण पण आदल्या दिवशी होउ शकेल ना ? मोदक करायच्या आधी microwave मधे नरम करुन घ्यायचे. बर निवर्या म्हणजे काय ?
.
आधीच तिकडच्या एकीने 'साधेसंच' आहे ना हा मेनु >>> असे खोडसाळपणे कुणी बोलले तर विचारात पडु नकोस. शांततेत "बर मग ?" किंवा "हो का..बर बर" म्हणुन आपण ठरवले तेच करायचे
मने अभिनंद
मने
अभिनंदन. म्हणूनच एन जे मधे लग्नाचे हॉल वगैरे विचारत होतीस
बरं मी एक विद्रोही मेनु सुचवू का? साधंसंच वाटतंय म्हणणार्यांसाठी -
फलाफल अन पीटा ब्रेड चे रोल, चांगले कॉर्न टाको आणून केसाडिआ, कोवळे सॅलड मिक्स ( एमरिल त्याला mache म्हणतो ) त्यावर थोड्या रोस्टेड रेड पेपर स्ट्रिप्स अन ऍस्परॅगस घालून ऑ.ऑ अन बाल्सामिक व्हिनेगर चे ड्रेसिंग,
ग्रिल असेल तर जांम्भळे अंजीर ग्रिल करून त्यावर २५ वर्षे जुना बालसामिक व्हिनेगर, नाहीतर छान, मोठ्या स्ट्राबेरी अर्धे तुकडे करून त्याबरोबर हाच व्हिनेगर, सोबत व्हिप्ड क्रीम अन वरून एक पुदिन्याचं पान. मिळत असल्यास चांगलं फ्रेंच व्हनिला आइस्क्रीम. वरून
लाडे लाडे मान वेळावून म्हणावं "सारखं सारखं बिरड्या, आमट्या अन फदफदं काय खायचं ते? मी नै बै ते सगळं करत"
शूनू, thanks ग.
शूनू, thanks ग. NJत करायचे का कुठे अजून एकमत नाही कुणाचे. असो.
अग हे मराठी टीपीकल जेवण नागपंचमी आहे म्हणून ठरवलेय. उलट हे असच जेवण कीती महीन्यात नाही केलेय. आता एवढी तयारी (मनाची ) केलीय की हाच मेनु करणार तेव्हा आता कोणी का साधेस म्हणोत ना.
एक काम करु शकते, साधेसे म्हणणारीला जरा लवकर बोलवून बिरडे साफ करायला बसवत नी निवर्या करायला..
Pages