फेक ग्रेट वॉल

Submitted by वर्षू. on 8 April, 2011 - 04:28

अश्विनीमामी ने विचारले होते कि टूरिस्ट्स करता बीजिंग शहराबाहेरच फेक ग्रेट वॉल बनवलीये का म्हणून..त्याला उत्तर 'नाही' ती खरोखरचीच आहे वॉल..
पण २००२ साली सिचुआन प्रांताची राजधानी'चंग तू' येथील उत्साही टूरिस्ट एंटरप्रूनर्सनी ' शान चाय' येथे टूरिस्टकरता मिनी ग्रेट वॉल किन्वा ग्रेट वॉल ची मिनी रिप्लिका तयार केली.
खास बीजिंग ला जाऊन द ग्रेट वॉल बघणं न जमल्यास या शहरातील लोकं बसमधे बसून शहराबाहेर बांधलेल्या ग्रेट वॉल च्या रिप्लिका वर जाऊन दुधाची तहान ताकावर भागवू शकतात..

shanzhai-great-wall-1.jpgshanzhai-great-wall-2.jpg

गुलमोहर: 

अगा इकडे नऊ,दहा मजल्यांच्या (जुन्या) रेसिडेंशिअल बिल्डिंग्स ना लिफ्ट सुद्धा नसतात.. त्यांना काय ग्रेट वॉल / फेक ग्रेट वॉल.. म्हंजे किस झाड की पत्ती Proud

अर्धवट झोपेत गुगल केल्यावर हे ही मिळाले.

http://www.chinadaily.com.cn/english/doc/2006-02/08/content_518316.htm

http://www.chinahearsay.com/shanzhai-saturday-chengdus-fake-great-wall/

रिकामा न्ह्वावी भिंतीला तुंबड्या लावी नावाची म्हण आहे ना तसेच वाटले Happy आपण खाल्ल्या चॉपसुयीला
जागतो

फेकच बांधायची होती तर हिमालयात बांधायची, मग आम्ही पण एव्हरेस्ट चढून गेलो असतो !!
वर्षू, खरेच असा एक प्लान ऐकला होता.
त्यांच्या तिबेटमधल्या रेल्वेबद्दल पण लिहि ना. नॅशनल जिऑग्राफिक वर प्रोग्रॅम बघितला होता. (त्यावेळी तिचे काम चालू होते.)

दिनेश दा.. तिबेट मधल्या रेल्वेबद्दल बहुएक मीना ने लिहिले असेल तिच्या पुस्तकात..
मी जर विझिट केली तर मात्र नक्कीच लिहीन यावर Happy

>>अगा इकडे नऊ,दहा मजल्यांच्या (जुन्या) रेसिडेंशिअल बिल्डिंग्स ना लिफ्ट सुद्धा नसतात..

विजाच्या बाबतीत मी पुनर्विचार करत आहे Proud
तू नव्या इमारतीत राहतेस ना वर्षू? smiley_dontknow_01.gif

वर्षु
फोटो सुंदर आलेत दोन्ही... पण खरंच गं पायर्‍या आहेत किती ते तरी सांग.
किती वेळ लागतो चढायला उतरायला? प्रथम चढावे लागते की उतरावे लागते?
इथे कशा त्या पालख्या असतात, तशी काही सोय असते का तिथे?

दक्षे पालख्या बिलख्या कुछ नही.. पायर्‍या किती आहेत ते मी सांगू शकत नाही.. आणी खरी तर ७००० किमी. लांब आहे त्यामुळे तिथेही किती पायर्‍या आहेत- माहीत नाही Uhoh

चिनी लोक ड्युप्लिकेट माल बनवण्यात माहिर आहेत ह्यात वाद नाही. >>> अगदी अगदी.
ओरिजनलपेक्षा फेकच भारी दिसते. भारतात पण बांधा म्हंजे आमालापण बघता येईल.

भारतात पण बांधा म्हंजे आमालापण बघता येईल.<< आहेत की, पहा म्हणजे सापडतील चिन च्या भिंती एवढी नसली तरी

वर्षू मस्त फोटो आहेत फेक वॉल सुद्धा पहायला मिळाली तुझ्या मुळे

<<इकडे नऊ,दहा मजल्यांच्या (जुन्या) रेसिडेंशिअल बिल्डिंग्स ना लिफ्ट सुद्धा नसतात.. >>
वाचूनच धाप लागली गं ! Proud

शोले,सचिन्-साचि,मी मुक्ता,रुणूझुणू धन्स.. धन्स रे तुम्हा सर्वांना

हे भारी आहे. पण ताजमहाल बघायला न जमल्याने औरंगाबादचा बीबी का मकबरा बघीतल्यासारखे वाटत असेल ना.
८-१० मजले रोज चढ-उतार करायचे ..हम्म.. म्हणजे तिथले लोक एकदम सडसडीत असणार Happy

थँक्स निल्तै, आज तुझ्यामुळे समजले की, चिन च्या 'ग्रेट वॉलची' प्रतिक्रुती "फेक वॉल" सुध्दा अस्तित्वात आहे. Proud
पण, मला जर चढ उतर करायचीच असेल तर 'ग्रेट वॉलचीच करीन' Happy

इकडे नऊ,दहा मजल्यांच्या (जुन्या) रेसिडेंशिअल बिल्डिंग्स ना लिफ्ट सुद्धा नसतात.. >>> confused0068.gifया इमारतीत राहणे म्हणजे एक प्रकारे 'शिक्षा' होण्या सारखेच आहे आपल्या सारख्याला.