Submitted by nikhilmkhaire on 28 June, 2008 - 02:22
दिवस असे की पगार होत नाही
अन् खायला भाकर नाही
फाटक्या तुटक्या छत्रीखाली भिजतो
कागद- काडी चाऊन थुंकून देतो
चाऊन चाऊन भूक भागत नाही
त्या चावणे म्हणवत नाही
दिवस असे की पगार होत नाही....
पैशाचे हे एकसंधसे तुकडे
बिले भागवून खिशात उरती थोडे
त्या पैशांवर महिना भागत नाही
त्या पगार म्हणवत नाही
दिवस असे की पगार होत नाही...
मी दत्तू की मी कोणी बिगारी
घरगडी अन् बिनपगारी
नोकरीला या हजार नावे देतो
परि नोकरी सोडवत नाही
दिवस असे की पगार होत नाही...
'पगार' म्हणता साहेब चिडतो थोडे
जुनाट त्याचे काढून देतो जोडे
त्या जोड्यांना (पण) किंमत मिळत नाही
अन् ते मजला बैसत नाही...
दिवस असे की पगार होत नाही...
(संदीप खरे यांच्या 'दिवस असे की' या कवितेचे विडंबन )
गुलमोहर:
शेअर करा
हा हा हा..
हा हा हा.. निखिल खुपच मस्त, आजचा दिवस एकदम आनंदात जाणार तुझी ही कविता वाचुन.
एकुण एक वाक्य दाद देण्यासारखे आहे.
स ही
स ही
रे
मिल्यादा ला गुरु केलस काय ??
~Three grand essentials to happiness in this life are something to do, something to love,and something to hope for. ~
नाही
नाही रे!
वैताग असा बाहेर पडला.
..
निखिल.
सही आहे रे.
सही आहे रे.
भोत आवड्या
भोत आवड्या रे.
मीही असाच एकदा नोकरीला वैतागून, आमच्या खवीस एम्.डी. ची सरळ चेअरमनकडे तक्रार अन माझा राजीनामा सोबतच दिला! नंतर त्या दोघांचं भांडण सहा-एक महिने चाललं बहूतेक!!
जोपर्यंत
जोपर्यंत लिहायला येतंय तोपर्यंत अशा खविसांचा 'उद्धार' करत राहू. मग कधी राजीनामा लिहू तर कधी कविता!

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
..
निखिल.
:) फार
चिडलो
चिडलो नाही... पण परिस्थितीच अशी आहे... जे खरे ते सांगावे, तुका म्हणे
..
निखिल.
निखिल, विडं
निखिल,
विडंबन एकदम आवडेश.... आणि पटेशसुद्धा!
!!!
!!!
सही!!!
सही!!!
हा हा हा
हा हा हा
फारच छान.
फारच छान.
(No subject)
जमलय!!! भारी जमलय!!!
जमलय!!! भारी जमलय!!!
झक्कास्स्स्स्स्स्स्स
झक्कास्स्स्स्स्स्स्स