भ्रष्टाचार

भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टाचार असतो.
तुमचा आमचा सेम नसतो
काय म्हणता?
हे कस शक्य आहे?
असु द्या
तरी सुध्दा,
तुमचा आमचा सेम नसतो.
मराठीतुन करप्शन म्हणत
हिन्दीतुन भ्रष्टाचार म्हणत
करप्शन करता येत
व्यवहाराच्या भाषेतून मात्र
भ्रष्टाचार आणि करप्शनही करता येत
अठरा वर्ष सरली की
मतदानाचा हक्क मिळतो
जागेपणीच हक्काचे चीज करुन घेण्याचे
स्वप्न पाहु लागतो
आठवतात ते निवडणुकीचे दिवस?
तुमचे नी माझे ?
तुम्ही मागत होता आमच्याकडे
आम्ही मागत होतो तुमच्याकडे
आपली होडी सगळी भरली होती मागण्यानी
निवडणुकीच्या लाटेवर
बेभान होवुन नाचत होतो
नाचता नाचता कदाचित बुडालोही असतो.
पण, त्यातुनही वर आलोच असतो
कारण
तुम्हाला ते माहित आहेच
मला तर खात्रीच आहे
आम्हाला वर काढण
किती गारजेच आहे ,कारण
भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टाचार असतो.
तुमचा असतो भ्रष्टाचार आमचा असतो व्यवहार
भ्रष्टाचार वगेरे सगळ झुट आहे अस
म्हणणारी माणस मला भेट्तात
असाच एक जण चक्क मला म्हणाला
आम्ही नाही केला कधी भ्रष्टाचार
चार प्रमोशन घेतली सगळ्यांच्या आधी
मला मुल दोन
एकाला चिकटून घेतल्,आमच्याच ऑफीसात,
दुसरा जरा अभ्यासात मागे,झाला नापास
त्यालाही घेतल पास करुन
तोही आता चिकटुन जाइल
साहेबाला वाटल,मास्तरला पटवल
तेव्हा मी इतकच म्हटल
सगळ काही कस व्यवस्थित झाल
काय म्हणता? कस जमल तुम्हाला हे सगळ?
सोप आहे,
भर पावसात गेलो साहेबाकडे साहेबाच्या मित्राला घेवून,
मित्रानीच साहेबाला म्ह्टल घ्या की
याच्या पोराला चिकटवून आपल्याकडे
साहेबान माझ्याकडे पाहिल, मी समजलो
आणि मान हलवून होकार दिला
नजरेची भाषा मला समजली
दोघांचही काम झाल.
भ्रष्टाचाराशिवाय काही अडल का?
भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टाचार असतो.
तुमचा आमचा सेम नसतो
तुमचा भ्रष्टाचार आमचा असतो व्यवहार
हसत हसत करायचा असतो
भल्या मोठ्या रांगेत,लोकांच्या नजरा चुकवून
पुढ जावून देव दर्शन घेण,
बसमध्ये चार आठ आणे सुटे नाहीत म्हणुन
कंड्क्टरने ते परत न देण,
हॉटेलमध्ये वेटरला दोन रुपयांची
टीप देण
परिक्षा जवळ आली की पिंट्या-पिंटीच्या वाढदिवसाची
'टीचरला' ट्रीट देण
बॉस नसताना त्याच्या फोनवर
तासंतास बोलत बसण
सोसातटीच्या वाचमनला,
ऑफीसच्या शिपायाला,
पाच दहा रुपये देवून घरच काम सांगण,
गॅसवाल्याला दोन पाच रुपये
बुक न केलेला सिलिंडर घेण
असा आमचा व्यवहार असतो,तुम्ही मात्र याला भ्रष्टाचार म्हणता
म्हणुनच
भ्रष्टाचार म्हणजे आमचा व्यवहार असतो
तुम्हाला मात्र उगिचव वाटत
हा व्यवहार म्हणजे भ्रष्टाचार म्हणजे भ्रष्टाचारच असतो.