सदस्य प्रवेश |
कविता एक प्रवास (४)कविता एक प्रवास (४)- डायरी क्र. २ 'रोबा' (सौ. सुहास यशवंत जोशी) ने दिली. डायरीवर लिहिले होते, "काव्य म्हणजे व्यक्तिमत्वाचा अविष्कार नव्हे कवीची प्रगती म्हणजे, "आठवण म्हणजे एकाकी करणारी सोबत" काव्य प्रतिभेस मनःपूर्वक शुभेच्छा !! कांहीतरी सुचंत असतं दाटलेलं उसळून येतं सुचलं तसं लिहिता लिहिता मागे मी 'एस एस वाय' म्हणजे 'सिद्ध समाधी योग' हा उपक्रम अनुभवला. मेडिटेशन करतांना डोळे मिटून शांतपणे श्वासांवर लक्ष केंद्रित करून विचारविरहित अवस्थेत जाण्याचा प्रयत्न करायचा. सुरुवातीला विचार विसरायचे याच विचारांचे काहूर माजते. नुसता गोंधळ उडतो. प्रचंड गर्दी होते आणि भरकटल्यासारखं होतं. त्यावेळी गुरुजींनी सांगितलेली प्रक्रिया आठवली. अशा वेळी विचारांना थांबवायचं नसतं. धरायचं तर नसतंच नसतं. ते येतात तसे येऊ द्यायचे आणि जातात तसे जाऊ द्यायचे. काही काळाने गर्दी आपोआप कमी होते, गुदमर हलका होतो आणि स्वस्थ वाटायला लागतं. मग गाळीव विचार यायला लागतात. आपण आपल्याला समजून येतो. स्वतः स्वता:शी बोलू शकतो. तर असेच अगणित विचार सरकत असतांना त्यातले कांही घरंगळून पडले ते मी वेळोवेळी वेचून ठेवले. चांगलं वाईट समजलं नाही तरी कांहितरी वेगळं वाटलं म्हणून ! जे दिसलं, बघितलं त्यापेक्षा कितितरी जास्त अजून आहे असं वाटत राहिलं आणि प्रवास चालू झाला. व्यक्ताचा हिमनग वरती झाकून राहिले अव्यक्त जरा मरण व्याधी भवती पिंगा घाली स्वामित्व मिळो कितिहि अतृप्त सदाही झोळी कधीही रिक्त कधि एकांत, कधि निसर्ग, कधि बाळकळी कधि स्वप्नपरी, कधि समाज कधि खमाज, सालस-गोंडस-अहं-व्यथित-हूल चाहूल्-स्पर्श आसक्ति-वेदना संवेदना-स्पंदने जिव्हाळे उमाळे-दंव थेंब अश्रू ओलावा- सयी आठवणी- संत महंत पुनर्जन्म- तोल समतोल्-जखम खपली-भान प्रमेये- भ्रम संभ्रम-भास आभास्-सण पारणे- वाट वहिवाट्-गाणे बहाणे मेणे परगाणे- द्वैत आद्वैत्-शोध अवरोध्-रंग गंध स्वर आकार विकार किमया- प्रारब्ध- कर्म वर्म मर्म्-भरती ओहटी-घात अपघात-ओढ सोबत- हळहळ सार्थक्-नाथ अनाथ्-वेड पिसे-दान समाधान-काहूर हुरहुर-वाळे डोहाळे-पाऊस वारा वादळ पळस पिंपळ गुलमोहर- भोवरा झरोका पागोळ्या आशा निराशा-वाद आशीर्वाद्-बिंब प्रतिबिंब- आणि अशी बरीच स्टेशने घेत बघता बघता ९ फेब्रु २००५ रोजी दुसरी डायरी संपली. या साधारण सव्वा दोन वर्षांच्या काळात, शब्दांचा वापर नेमकेपणाकडे वळला. लिखाणाचा आकार लहान झाला. अधून मधून भावनांचा उफाळ छंदाला फाटा देत मुक्तछंदात स्थिरावला. अजूनही चांगलं काय ते नक्की कळलं नाही. नाही म्हणायला एकदा नाशिक आकाशवाणीच्या दहाव्या वर्धापन दिनाचं कविसंम्मेलन थोडा वेळ ऐकलं(माझं ऐकलेलं पहिलंच म्हटलं तर अतिशयोक्ति नाही) छान वटलं. तसंच ७८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनातील पहिल्या दिवशीचं (२८ जाने २००५) सन्माननीय निमंत्रितांचं कविसंम्मेलन आवर्जून ऐकलं. ठीक वाटलं. विशेष म्हणजे साहित्य संम्मेलनाच्या दुसर्या दिवशीच्या निमंत्रित कवींच्या "शब्दरंग" ह्या कविसंम्मेलनात (२९ जाने २००५) माझी कविता निवडली गेली आणि ती, कवी व काव्यरसिकांनी गच्च भरलेल्या म.वि.प्र्.स.च्या थोरात सभागृहात मी प्रथमच जाहीरपणे वाचली. (उपस्थिती ५००० ते ६०००) सुरुवातच अखिल भारतीय मराठी साहित्य संम्मेलनात निमंत्रित म्हणून व्हावी, त्या दिवशी संकष्टी चतुर्थी असावी आणि निवड झालेली कविता माझी जन्मदाती असावी ( क.क्र. ११२ 'माय') हा परमभाग्याचा क्षण होता. शब्द अधरले कुंद मन पाखरू बेधुंद आंतराचे पक्षी थवे दूर आकाशात दंग सोनियाचा स्पर्श माझ्या जावळात फिरे जुना माय मांडीच्या कुशीत झोपी गेला बघे तान्हा गोकुळात लाडे लाडे संस्कारत लेक वाढे मनी ध्यास एक लेक व्हावा मुखी परीघत लेकी सुना लेकुरल्या झाले संसार आनंद कधी ऐकून हंबर वसु वासरू बघून अशी एक सांज वेळ मन करिते उदास कवी विठ्ठल वाघ 'शब्दरंग'चे अध्यक्ष होते. जाता जाता सहजपणे कवी आणि कविता यांची वैशिष्ठ्ये उलगडून दाखवत होते. अनेक व्यापक विषय आणि सादरीकरणाचे ढंग बघायला मिळाले. "सादरीकरणाची कविता वेगळीच असते आणि सादरीकरण ही पण एक कला आहे" हे उमगले. बघू काय परिणाम होतो पुढच्या प्रवासावर ............ पुढे डायरी क्र. ३........................ क्रमशः |
|
छान लिहिलय. मस्तच...