पोपटी च्या नावावरुनच पोपटी ह्या पदार्थाच आकलन होत. गावांमध्ये हिवाळ्यात जेंव्हा परीसर हिरवागर - पोपटी झालेला असतो त्या दिवसांतच पोपटी केली जाते. ही पोपटी पुर्णपणे नैसर्गिक साधनांचा उपयोग करुन केली जाते. पोपटीचे आयोजन पार्टी, एखादा सण, जागरणाचे दिवस ह्या दिवशी हमखास केले जाते. काळोख्या थंडी पडलेल्या रात्रीत पोपटीचा शेकत शेकत गरमा गरम आस्वाद घेतला जातो.
पोपटी करण्यासाठी लागणार्या साहित्या मधले लागणारे साहित्य म्हणजे मातीच मडक. हे मडक गरजेप्रमाणे छोटे मोठे घेतात. मडके आतुन स्वच्छ धुवुन पुसुन घेतात.
पोपटी ही हिवाळ्यात तयार होणार्या शेंगा, भाज्यांची केली जाते. तसेच आवडीप्रमाणे वांगी, बटाटे, कांदे, शेवग्याच्या शेंगा, नवअलकोल, हल्ली मटण चिकन टाकुनही पोपटी केली जाते.
पोपटी करण्यासाठी लागणार्या शेंगा, कांदे, वांगी आख्खीच धुवुन हेतात बटाटे, नवालकोलला, वांग्यांना धुवुन चिरा पाडतात मग ह्या चिरा पाडलेल्या आलकोल वांग्यांना भाज्यांना मिरची, कोथिंबीर, खोबर, थोड आल, लसूण घालुन केलेल वाटण आणि मिठ, ओवा चोळतात. जर वाटण राहीले असेल तर ते मिठाप्रमाणेच इतर शेंगांना व भाज्यांना चोळले तरी वेगळी चव येते. मटण किंवा चिकन असेल तर त्यालाही आल, लसुण, मिरची कोथिंबीरीच वाटण चोळतात. जर भाज्या आणि मटण किंवा चिकन एकत्र शिजवायचे असतील तर मटण किंवा चिकन केळीच्या पानात गुंडाळून बांधुन ठेवतात.
पाऊस संपुन हिवाळ्यात जेंव्हा जमीन सुकायला लागते तेंव्हा दवांच्या पाझरावर काही वनस्पती आपला जीव तग धरुन उभ्या असतात. त्याच वनस्पतीतील भांबुर्डा ही वनस्पती उगवते. ही वनस्पती शेतात, बांधावर ओसाडजागी भरपुर आढळते. ह्या वनस्पतीला एक विशिष्ट वास असतो. हया वनस्पतीचा जखमा भरण्यासाठीही औषधी उपयोग केला जातो.
हे दोन प्रकारचे भांबुर्डे असतात कदाचित एखाद्याच नाव दुसरही असेल.
ही छोटी रोपटी असतात ती मुळासकट काढून धुवुन घेतात. रोपटी मोठी असतील तर ह्याचा पाला घेतात. मडक्याच्या तळाला थोडा पाला टाकुन त्यावर भाज्या व केळीच्या पानात बांधलेले मटण किंवा चिकन घालतात. त्यावर पुन्हा भांबुर्ड्याचा भरपुर पाला घालून मडक्याचे तोंड बंद करतात.
आता शिजवण्याची प्रक्रिया करण्यासाठी मोकळी जमिन किंवा रिकाम्य शेतातील भाग निवडण्यात येतो. ही पोपटी पार्टी तिथेच साजरी केली जाते. त्या मोकळ्या जागी ते मडक बसवण्यासाठी एक विता एवढा आणि मडक्याच्या तोंडाच्या आकारापेक्षा थोडा मोठा खड्डा खणला जातो.
त्या खड्ड्यात सुकलेला पाला किंवा पेंडा टाकुन त्यावर मडके उलटे ठेवले जाते. म्हणजे खड्यात मडक्याचे तोंड असते.
आता मड्क्याच्या भोवती सुकी लाकडे, पाला किंवा शेणाच्या वाळलेल्या गोवर्या लावुन त्याला आग लावली जाते.
साधारण अर्धा ते पाऊण तास ही प्रक्रिया चालते. तोपर्यंत पार्टीचे खेळ, गप्पा गोष्टी रंगात येतात. थंडीने कुडकुडणारे आजोबा, लहान मुले ह्या पोपटीच्या शेकोटीच्या जवळ शेक घेतात.
साधारण अर्धा ते पाऊण तास ही शिजण्याची प्रक्रिया चालू ठेवावी लागते.
मग मडक्या भोवतालची आग एका काठीने बाजुला सारुन जाडी काठी खड्ड्यात मडक्याच्या तोंडाजवळ टाकुन मडके सारुन जाड फडक्याने धरुन बाजुला आणतात.
आता सगळ्यांना गोलाकार जमवून एका पेपरवर हे मडके आणून त्यातील वरचा भांबुर्ड्याचा पाला काढला जातो. मग आतील शिजलेल्या भाज्या आणि जर मटण किंवा चिकन टाकले असेल ते काठीने किंवा घरातील पळीने पेपरवर काढून मग सगळ्यांना वाढण्यात येते.
ह्या पोपटीला भांबुर्ड्याच्या पाल्याचा, ओव्याचा व भाजका असा एक विशिष्ट वास व चव असते. हा पुर्णपणे भाजलेला प्रकार आहे. तेल व पाणी न वापरता. भाजल्यामुळे ही पोपटी पचायलाही हलकी असते.
मी घरीही हा प्रकार केला होता.
मी घरीही हा प्रकार केला होता. कुंभार वाड्यातून मडकं आणले होते.. भांबुर्डा कोकणातून
चिपळूण च्या बाजूला ह्याला मोंगा असे म्हणतात.. रायगड मध्ये पोपटी.
सिझन मध्ये कोकणातून हा मेवा घरी नेहमी येतो... पण त्यात मुख्यतः पावट्याच्या शेंगा, बटाटा (तिखट्-मीठ लावलेला) आणी कांदा असतो... ओवा ही असतो...त्यामुळे पावटा बाधत नाही..
पावट्याच्या शेंगा कोवळ्या असतील तरच मस्त लागतात.
नाहीतर जागू पोपटी बनवून
नाहीतर जागू पोपटी बनवून ढणाढणा ट्युबलाईटच्या उजेडात स्टॉल लावेल आणि स्टीलच्या ताटात पोपटी देईल, मग निर्माण झालेल्या वातावरणाचा पचका
अश्वे कधी शेत बघीलीस नाही का ? शेतकरी अजुन इतका प्रगत झाला नाही की तो शेतावर ट्युबलाईट लावेल. आणि एवढ्या लोकांना स्टीलची ताट द्यायला काय माझा कॅटरिंगचा बिझीनेस आहे ?
आनंद आमच्याइथे पावट्यासारखीच मेदळ नावाची शेंग असते. हिरवी आणि कडा थोडी जांभळी. खुप चविष्ट असते ही शेंग.
पोपटी वरुन आठवल. खुप छोटी
पोपटी वरुन आठवल. खुप छोटी असताना पाहीलेला प्रकार आहे हा. याला मोटली म्हणतात.
आंबोलिला - चोकूळला शेतावर गेल कि जवळपासच्या नदिवरुन मासे पकडुन आणत. त्यात वाटलेल खोबर, कांदा, धने, मिरची पावडर, मिठ असच काहीतरि मिक्स करुन कुंभ्याची पान जोडुन केलेल्या द्रोणात टाकायची. वरुन कव्हर म्हणुन ५ ते ६ लेयर्स कुंभ्याचे असत. जमिनीत थोडा खड्डा खणुन आग बनवुन त्यात हि मोटली टाकत. मासे असल्यामुळे लगेच शिजते. उकडा भात, नाचण्याची भाकरि, डाळ भिजउन केलेल पिठल किंवा तिखट मसाला डाळ असा बेत असे.
जागू तूच म्हणालेलीस ना
जागू तूच म्हणालेलीस ना मस्करीत की स्टॉल लावेन. आता स्टॉल काय शेतात लावणारेस? बरं बाई, जिथे कुठे करशील आणि खाऊ घालशील तिथे खाईन मी पोपटी गप्प बसून हाताची घडी तोंडावर बोट !
रिमा काय भन्नाट वर्णन
रिमा काय भन्नाट वर्णन सांगितलस. मस्त.
अश्वे पुढे माझ वाक्य - दंगा केलास तर देईन एक चोप.
जागू, मी येणारे ह्या गटगला
जागू, मी येणारे ह्या गटगला हां. हळदीच्या पानांमध्ये गुंडाळून मासे ठेवायचे तिखट मीठ मसाला वगैरे लावून त्या पोपटीत. हाकानाका
शैलजा नक्कीच. आमच्याकडे
शैलजा नक्कीच.
आमच्याकडे भेंडीच्या पानातही मासे निखार्यावर भाजायचे.
अरे काय एक एक सांगताय.. इथे
अरे काय एक एक सांगताय.. इथे कोबोर्ड भिजायची वेळ आलीय,...
हापिसात बसुन असं काही वाचल्यावर कित्ती त्रास होतो माहित आहे का तुम्हाला?
रिमा, आंबोलीला गेले की माझी
रिमा, आंबोलीला गेले की माझी मावशी मला नेहमी मोटली खायला घालते. अगदी बोटबोटभर लांबीचे मासे असतात, पण काय चव लागते गं... आणि सोबत आपल्याकडल्या लालसर तांदळाची चुलीवर शेकलेली कुरकुरीत लाल भाकरी... आणि गंमत म्हणजे कधीकधी मी सुद्धा हे मासे पकडुन आणते नदीतुन...
माझे नशिब बलवत्तर आहे त्यामुळे इथल्या अनेक लोकांसारखे मला केवळ वर्चुअल खाऊन तृप्त झाल्याचा भास करुन घ्यावा लागत नाही. गावी गेली की लगोलग सगळे खाऊन घेते.
आणि एवढ्या लोकांना स्टीलची
आणि एवढ्या लोकांना स्टीलची ताट द्यायला काय माझा कॅटरिंगचा बिझीनेस आहे ?
आम्ही हातावर भाकरी आणि त्यावर पोपटी असे खाऊ.. खड्ड्यात जाऊदे त्या ताटांना. आम्हाला फक्त खायला मिळाले की बास्स्स्स्स्स्स्स्स
पण मस्त थंडीचा गारठा पाहिजे
पण मस्त थंडीचा गारठा पाहिजे तेव्हा
आहे आहे, थंडीही आहे. नव्या मुंबईत परवापासुन रात्री आणि सकाळी गारठा वाढलाय....
साधना किती छान ग. मला पण ने
साधना किती छान ग. मला पण ने ना तुझ्या गावाला.
जागू आणि इतर, प्लीज हे गटग
जागू आणि इतर, प्लीज हे गटग डिसे च्या शेवटच्या आठवड्यात ठेवा म्हणजे मलाही येता येईल पण पुर्ण शाकाहारी ठेवा. नाहीतर दोन पोपटी ठेवा. मोटली पण ठेवा.
अरे बी बाबा २५-२६ म्हणजे
अरे बी बाबा २५-२६ म्हणजे शेवटाच आठवडाना??????????????????
पण पुर्ण शाकाहारी ठेवा.
वा..... मग ह्या भानगडीत कशाला पडायचे??????? त्यापेक्षा दोन मडकी परवडली.....
जागु: हे सगळ वर्णनच (म्हणजे)
जागु:
हे सगळ वर्णनच (म्हणजे) आठवणी फक्त राहिल्या आहेत. मे महिन्यातही चोकुळ गाव थंड असायच तेव्हा. (आंबोली पेक्षा उंचावर आहे). बरोबरिला रानातली छोटी जांभळ, करवंद, पेरु पण असायचेत.
साधना: माझे नशिब बलवत्तर आहे >>>
हे मत्र खर बोललिस साधना. मोटलि आमच्या घरात सगळ्यांना फार आवडते. मि व्हेज आहे. त्यामुळे फक्त बाकिच्याना खातना बघुन स्वतःच पोट भरायचे.
संक्रांतीची सुगडं मिळायला
संक्रांतीची सुगडं मिळायला लागतील तोपर्यंत. मग प्रत्येकाचे खाजगी मडके भाजायचे म्हणजे सोवळ्यातल्या लोकांची सोय होईल.
माझ्या आजोळी आणखी एक प्रकार करतात, त्यात सर्व धान्ये व कडधान्ये, (गहू, तांदूळ, मूग, चवळी, चणे, मसूर, शेंगदाणे वगैरे ) भिजत घालून मग मडक्यात शिजवतात. त्यात मिठाशिवाय काहिही घालायचे नाही.
सगळे मऊ शिजले पाहिजे. मस्त लागतो हा प्रकार.
आयला मस्त दिसतोय पोपटी हा
आयला मस्त दिसतोय पोपटी हा प्रकार! बडोद्याकडील मराठी मंडळी यास उंधिय म्हणतात. गुजराती उच्चार उंधियु. एकदम खास लागतो.
रच्याकने : पोपटी गटग झालं का?
-गा.पै.
हा अजिबात उंधियु सारखा प्रकार
हा अजिबात उंधियु सारखा प्रकार नसतो.
मी आजवर खाल्लेल्या उंधियुमधे तरी जनरली भाज्या तेलात पोहत असतानाच बघितल्यात.
लले, विन्या,
हा बाफ वर निघाला परत.. यावरून काहीतरी बोध घेताय का?
पोपटी सिझनल प्रकार आहे. कृपया
पोपटी सिझनल प्रकार आहे. कृपया नोंद घ्यावी व धीर धरावा
नीधप, >> मी आजवर खाल्लेल्या
नीधप,
>> मी आजवर खाल्लेल्या उंधियुमधे तरी जनरली भाज्या तेलात पोहत असतानाच बघितल्यात.
बरोबर. मुंबईत जे उंधियु म्हणून विकतात त्यातून तेल पाण्यासारखं निथळत असतं. मूळ पाककृतीत तेल नसतं. माठात तेल टाकून उपडा केला की काय होणार ते उघड आहे!
आ.न.,
-गा.पै.
पोपटी सिझनल प्रकार आहे. कृपया
पोपटी सिझनल प्रकार आहे. कृपया नोंद घ्यावी व धीर धरावा
>>>>
season yeiparyant sanyojan
season yeiparyant sanyojan karayala vel aahe. krupayaa tyacha sadupayog karava..
वा जागुताई माझ्यासाठीपण बी
वा जागुताई माझ्यासाठीपण बी सारखेच शाकाहारी, दिनेशदानी पण मस्त वर्णन केलेय, काय छान चव असेलना मातीच्या भांड्यात चुलीवर केलेल्या पदार्थांना. शेंगा-वांगी पोपटी तर सुंदर. काही वर्षे नगर जिल्हात राहूनही हुरडा खाल्ला नाही, आता पोपटीच्या निमित्याने आठवण झाली.
मस्त सचित्र माहिती. उंधियोचा
मस्त सचित्र माहिती. उंधियोचा लहानपणी जत्रेत वगैरे ताटातूट झालेला भाऊ दिसतो आहे.
तो भांबुर्ड्याचा दुसरा फोटो इथे डॅन्डेलायन्स म्हणतात अगदी तसाच दिसतो आहे. ते तण (weed) असलं तरी कोवळी पानं खाद्य असतात. किंचित कडवट चव असते.
जागूताई, या भांबुर्ड्याला म्हातार्या असलेले गोंडे आणि पिवळी फुलं येतात का?
ही अशी :
स्वाती फुग्यासारखी पाने आहेत
स्वाती फुग्यासारखी पाने आहेत त्या रोपट्याला म्हातार्यांसारखी पण जरा कमी पिवळट फुले येतात व गुच्छाने येतात.
कातरी पानांना जांभळट फुले येतात.
मागच्या वेळी पोपटी पार्टी मी मिसली होती. ह्यावेळी बघू जमते का अजुन वेळ आहे पण.
भांबुर्ड्याऐवजी काय वापरता
भांबुर्ड्याऐवजी काय वापरता येईल
ओवा टाकायचा. वरुन केळीची पाने
ओवा टाकायचा. वरुन केळीची पाने टाकली तरी चालतील.
स्वाती_आंबोळे, इथे
स्वाती_आंबोळे,
इथे इंग्लंडमध्ये डँडेलियनची पाने खातात असं ऐकलंय. औषधी असतात म्हणे. एकंदरीत डँडेलियन म्हणजे भांबुर्डाच असावा.
आ.न.,
-गा.पै.
आत्ता ३१ डिसेंबरच्या पार्टीत
आत्ता ३१ डिसेंबरच्या पार्टीत पोपटीचा बेत होता. वेजी मंडळी जास्त होती म्हणून आम्ही फक्त भाज्या वापरल्या होत्या. बेत मस्त जमला होता. नॉनवेज तर अफलातुन टेस्टी लागेल. थंडीत मस्त गरमागरम भाज्या खायला मजा आली.
नंतर चिकन बिर्याणी पण होती पण मी पोपटीतच गार झाले
बर्याच वर्षांनी धागा वर आल
बर्याच वर्षांनी धागा वर आल स्मित:
आता पोपटी सिझन चालू झाला आहे. दर रविवारी कुठून कुठून वास येतो पोपटीचा.
Pages