बेफिकीर

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 12 October, 2010 - 05:38

कधी न करितो उशीर ,तू वक्तशीर मित्रा
कसे म्हणावे अम्ही तुला ''बेफिकीर'' मित्रा?

तुझ्या कथांनीच रंगले आसमंत आता
कशास उधळू गुलाल्,बुक्का,अबीर मित्रा?

सतेज सूर्यासमोर तुलना तुझी करावी
स्वतःस जाळून दूर करितो तिमीर मित्रा

तुफान काबूत ठेवले भावभावनांचे
जणू गृहस्थाश्रमातला तू फकीर मित्रा

तुझे नि माझे न काही नाते रुधीर पंथी
सदैव ''कैलास''ला असे तव फिकीर मित्रा.

--डॉ.कैलास गायकवाड

गुलमोहर: 

कैलासराव,

आपण मला ही गझल ऐकवलीही होतीत आणि तिचा माझ्याशी संबंध आहे असे म्हणाला होतात म्हणून दीर्घ प्रतिसाद देत आहे. काही अधिक उणे लिहिल्यास क्षमस्व! मात्र त्या आधी आपल्याला उदार मन मिळाले आहे याबद्दल अभिनंदन व मनःपुर्वक आभार!

कधी न करितो उशीर ,तू वक्तशीर मित्रा
कसे म्हणावे अम्ही तुला ''बेफिकीर'' मित्रा?

'मित्रा' हा शब्द सूर्य या अर्थाने घेतल्यास मतला चांगलाच!

तुझ्या कथांनीच रंगले आसमंत आता
कशास उधळू गुलाल्,बुक्का,अबीर मित्रा?

हा शेर ईश्वराबाबत संदर्भ लावून गृहीत धरल्यास सुंदरच शेर!

तुझी गझल वा तुझी द्विपदि कठोर वास्तव
तुझ्यामुळे विस्मृतीत जातिल ''कबीर'' मित्रा

पहिल्या मिसर्‍यात काहीतरी गडबडले असावे. (बाय द वे - दुसरा मिसराही माझ्यावर केला असलात तर मी नम्रपणे शांत बसतो.)

सतेज सूर्यासमोर तुलना तुझी करावी
स्वतःस जाळून दूर करितो तिमीर मित्रा

तुलना 'समोर' ऐवजी 'सवेच' अधिक शोभावे! 'सतेज सूर्यासवेच'! एक स्वतंत्र शेर म्हणून ठीकठाक!

तुफान काबूत ठेवले भावभावनांचे
जणू गृहस्थाश्रमातला तू फकीर मित्रा

हा मी त्या दिवशीही तुम्हाला सांगीतला होता की अत्यंत आवडला. फारच सुंदर शेर! म्हणजे, स्वतंत्ररीत्या सुंदर शेर! अभिनंदन!

तुझे नि माझे न काही नाते रुधीर पंथी
सदैव ''कैलास''ला असे तव फिकीर मित्रा.

का'हि' नाते असे करावे लागेल बहुधा! स्वतंत्र शेर म्हणून हाही शेर छानच आहे.

कैलासराव,

आपले पुन्हा आभार मानतो.

-'बेफिकीर'!

काय सुंदर गझल आहे ही!!! धन्य ते बेफिकीरजी आणि धन्य डॉ.कैलास, ज्यांना इतक्या उत्कटपणे अभिव्यक्त व्हायला जमते...

धन्य ते बेफिकीरजी आणि धन्य डॉ.कैलास, ज्यांना इतक्या उतकटपणे अभिव्यक्त व्हायला जमते...>>> अनुमोदन! खूपच छान कैलासजी.

धन्य ते बेफिकीरजी आणि धन्य डॉ.कैलास, ज्यांना इतक्या उतकटपणे अभिव्यक्त व्हायला जमते...>>> अनुमोदन..
खरं तर गझल मधलं काहीही कळत नाही पण ही आवडली....:)

धन्यवाद वर्षा,
बेफिकीरजी,
विजय,
सानी,
हबा,
रचु....

गझल आवडली.

धन्य ते बेफिकीरजी आणि धन्य डॉ.कैलास, ज्यांना इतक्या उतकटपणे अभिव्यक्त व्हायला जमते...>>>
---- धन्य ते वाचक Happy ज्यांना अशा दोन महाकवींच्या (जमीनीवरुन सुर्य चंद्र डोळ्यांना सारख्याच अंतरावर...) जुगलबंदी वाचावयास मिळतात.

तुझ्यामुळे विस्मृतीत जातिल ''कबीर'' मित्रा >> कमाल आहे. इथल्या एकालाही वाचताना ही अतिशयोक्ती नाही वाटली? तुमच्या भावना कितीही उत्कट असल्या तरी मला तर हा कबीरांचा अपमान वाटतो, जो करण्याची कुणाचीही पात्रता नाही.

आशू, तुला कळत नाही. कबीर बिबीर सामान्य आहेत गं. तू जळतेस कविवर्यांच्या लोकप्रियतेवर.....

मीही बेफिकिरांची एकही कादंबरी चुकवत नाही.. म्हणजे कादंबरी नाही - प्रतिसाद..
किती छान! एकदा आभार- मग अभिनंदन - पुन्हा आभार - पुन्हा अभिनंदन - ती सुंदर मनं , ती प्रेमळ वाक्य.. बाई बाई! मी तर एकदम फ्यानच झालेय बेफिकर फ्यान क्लबातल्या लोकांची!
मलापण घ्या बाई तुमच्यात... मायबोलीवरचे बाकीचे लोक फार तुसडेत!

कैलास, तुम्ही तो शेरच गझलेतून काढून टाकलात? दुसरी ओळ बदलली असतीत तरी चालले असते. अर्थात, गझल तुमची निर्णय तुमचा. तरीही, यावर पुनर्विचार केलात आणि तो योग्य वाटला म्हणून हा बदल केलात हे नक्कीच स्वागतार्ह आहे. धन्यवाद. Happy

आशूडी... खरं तर मला अभिप्रेत अर्थ पोचत नव्हता... व गैरसमज अधिक होत होते... यास्तव मी तो शेर काढून टाकला.... आपल्या सुहृदय प्रतिसादा बद्दल मनःपूर्वक धन्यवाद. Happy

असं असेल तर हा शेर जिथे जिथे प्रकाशित आहे तिथे तिथे (उदा. बेफिकीर फॅन क्लब) तुम्ही योग्य तो बदल करावात अशी अपेक्षा आहे.

एक स्वतंत्र गझल म्हणून विचार करता फ़कीर शेर विशेष आवडला...

बाकी तुम्ही एखाद्या व्यक्तीला उद्देशून गझल लिहिणे वगैरे हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे..

धन्यवाद मिल्या......

अश्या प्रकारच्या गझलेस उर्दूत कसीदा असे म्हणतात... ( खोडसाळ यांच्या मुळे मला हे ज्ञात झालं )
अधिक माहिती ह्या दुव्यावर उपलब्ध आहे.

http://hi.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%A6%E0%A4%BE

Happy

मतला तितकासा आवडला नाही.

पण या निमित्ताने आपण खूप सरळ व निर्मळ मनाचे आहात हे अधोरेखीत झाले.
मी बेफिकीर व आपल्या सर्व गझला वाचल्या आहेत. तुम्ही दोघेही निर्विवाद उच्च दर्जाचे साहित्यीक व माणसे आहात. तुम्हा दोघांस सलाम.