एक झोपडी, माणसे सहा, त्यातही पिढ्या तीन वेगळ्या
आजच्या कळ्या दोन, वाळक्या दोन, मोकळ्या दोन पाकळ्या
आठ कोंबड्या, चार मेंढरे, एक गाय अन एक वासरू
दोन श्वानही, दोन मांजरे, चार पारवे, एक कोकरू
डोंगरातली एक ती दरी, त्या दरीतही दौलती किती
शांतता किती, रम्यता किती, तुष्टता किती, सवलती किती
घाट वाकडा, वाट ही नसे, कोण यायचे आसपासही?
पंचकोसही आठ कोस अन ऐकु यायचे तेथ श्वासही
फुंकतो विडी एक वृद्धसा, एक पोरगा खेकडे धरी
पोरगी धरे वांड कोकरू, घोंगडी विणे जख्ख शेवरी
दादला धरे रानचे ससे, कारभारणी चूल फुंकते
पोर ढुंकते, श्वान भुंकते, जख्ख शेवरी चूळ थुंकते
काळ जेवढा सूर्य काढतो, काळ तेवढा वीज काढते
मावळायला दीस संपतो अन उजाडले की उजाडते
साप चावतो, मंत्र लागतो, अन विषातला जीव संपतो
रोग लागता, लागते बुटी, नाम घेउनी रोग संपतो
रानची फळे, रानची फुले, दादला कुठे ये विकूनसा
कापडे, चणे, शेव, पापडी, मीठ, जोंधळे ये करूनसा
काय नोकरी, काय शिक्षणे, केवढी घरे, दौलती तुझ्या
काय लागते रे जगायला? हा निसर्गसे संगती तुझ्या
एकदाच त्या झोपडीमधे टेकलो जरासा थकून मी
शांतता तशी त्यापुढे पुन्हा वाटली न एवढा जगून मी
आज जी सुखे लाभतात ती शुन्य त्या जुन्या झोपडीपुढे
आज देह हा वावरे इथे आणि मन कुण्या झोपडीपुढे......
( १९८६ साली केलेल्या ट्रेकमधील सिंहगड राजगड या पहिल्या टप्प्यात भुतोंडे ते कुंभेळे या वाटचालीत 'कावळा' घाट उतरल्यावर एक झोपडी लागली होती. त्या खऱ्याखुऱ्या झोपडीचे हे वर्णन आहे. 'वर्णन' हा या रचनेचा एकमेव हेतू आहे. )
(इतरत्र प्रकाशित - १३ जुलै, २००९ रोजी)
बेफिकीरजी, अहो काय हे???
बेफिकीरजी, अहो काय हे??? तुम्ही इतकी अप्रतिम कविता १९८६ सालीच केली होती??? इतक्या वर्षांपूर्वी??? कमाल आहे बुवा!!! फार सुंदर हो..केवळ अप्रतिम...मस्त ठेका आहे या कवितेला...
माझ्या निवडक १० त नोंदवत आहे.
डोंगरातली एक ती दरी, त्या
डोंगरातली एक ती दरी, त्या दरीतही दौलती किती
शांतता किती, रम्यता किती, तुष्टता किती, सवलती किती>>>> आसुया वाटते आहे त्या झोपडीत राहणार्यांची....
Heidi नावाची एक अप्रतिम कथा माझ्याकडे audiobook च्या स्वरुपात आहे. ती कथाच आठवली एकदम हे सगळे वर्णन वाचतांना...
कविता आवडली....
कविता आवडली....
व्वा मस्त! आवडली
व्वा मस्त! आवडली
सुंदर! मी असे लोक पाहीले
सुंदर!
मी असे लोक पाहीले आहे.
-हरीश
चांगले आणि हृद्य वर्णन... खूप
चांगले आणि हृद्य वर्णन... खूप आवडली कविता.
बेफिकिरजी,
बेफिकिरजी, अप्रतिमच........
अगदी गावाकडची दरीतली धनगरांची घरे डोळ्यासमोर आली लहानपणी पाहिलेली. तंतोतंत उभी केलिये तुम्ही. मस्तच......!!!
आवडली कविता, सुरेख वर्णन.
आवडली कविता, सुरेख वर्णन.
सर्वांचे आभार! सानी यांचे
सर्वांचे आभार! सानी यांचे विशेष! कविता एप्रिल २००९ ची आहे, १९८६ ची नाही.
(झोपडी १९८६ मधे पाहिली होती.)
-'बेफिकीर'!
अप्रतिम कविता आहे, मला फार
अप्रतिम कविता आहे, मला फार आवडली.
खूप छान !!
खूप छान !!
खूप छान वर्णन आणि खूप छान
खूप छान वर्णन आणि खूप छान कविता!!!
धन्यवाद
धन्यवाद
मस्त आहे कविता. फार आवडली.
मस्त आहे कविता.
फार आवडली.
अवर्णनीय सुंदर वर्णन
अवर्णनीय सुंदर वर्णन !
शब्द्प्रभूने रेखाटलेले शब्द्चित्र.
केवळ वर्णनातूनही ती निस्सीम शांती,ती निरागस जीवनशैली अन तिचा संदेश पोचतोय थेटपणे.
काय नोकरी, काय शिक्षणे, केवढी घरे, दौलती तुझ्या
काय लागते रे जगायला? हा निसर्गसे संगती तुझ्या
एकदाच त्या झोपडीमधे टेकलो जरासा थकून मी
शांतता तशी त्यापुढे पुन्हा वाटली न एवढा जगून मी
आज जी सुखे लाभतात ती शुन्य त्या जुन्या झोपडीपुढे
आज देह हा वावरे इथे आणि मन कुण्या झोपडीपुढे......
खंत एवढीच की या निसर्गाच्या लेकरांना धनदांडग्यांच्या भूसंपादनाच्या हावेपासून कोण वाचवेल ??
वा बेफीजी मस्त ग्रेट !!!
वा बेफीजी मस्त
ग्रेट !!! ..ग्रेट आहात तुम्ही
निवडक १० त
आवडली.
आवडली.
आज जी सुखे लाभतात ती
आज जी सुखे लाभतात ती शुन्य
त्या जुन्या झोपडीपुढे
आज देह हा वावरे इथे आणि मन
कुण्या झोपडीपुढे......>>>फारच उत्कट वाटलं हो हे.....
मनाच्या तळापासून आवडली..
वर्णन म्हणजे वर्णन ..
किती गोड.. मी मिसली होती दोन
किती गोड.. मी मिसली होती दोन वर्षं... बेफि लिहिली २००९ आणी माबो वर २०१० मधे टाकलीस??
)
(किती तो तारखांवरून काथ्याकूट
गालगालगा, गालगालगा, गालगालगा,
गालगालगा, गालगालगा, गालगालगा, गालगालगा.................. नॉट इझ टू राईट
हॅट्स ऑफ!
मी खूपदा वाचलीय पण रिप्लाय का नाही दिला किंवा दिल्याचेही आठवतेय... गोंधळ!
" एवढा"---- एवढाच बघून घ्या. (इतका)
निवांत असताना या कवितेवर
निवांत असताना या कवितेवर अभिप्राय लिहिन मी......आता फक्त दोन सुस्कारे....
काय नोकरी, काय शिक्षणे, केवढी
काय नोकरी, काय शिक्षणे, केवढी घरे, दौलती तुझ्या
काय लागते रे जगायला? हा निसर्गसे संगती तुझ्या >>>
१ नंबर . जगायला खरं तर खूप कमी गोष्टी लागतात आणि त्याची सोय निसर्गाने करून ठेवलीये . आपलीच हाव जास्त असते .