एकदा एका साहित्य संमेलनात
नेहमीप्रमाणे अध्यक्षपदाचा गोंधळ संपल्यावर
अन सगळे औपचारिक सोपस्कार उरकल्यावर
.. सुरुवात झाली अखेर संमेलनाला अन कुजबुजण्याला..
त्या गदारोळात एक लेखणी स्वतःहून पुढे आली
शांतता पसरताच तत्क्षणी ती बोलती झाली..
'आज बोलावच लागणार आहे मला
कारण माझ्या दोन्ही बाजूला दिसणारी विसंगती
अता अजूनाजून ठळक होत चाललीये
शाईतून प्रेम उतरवणारे हात भलत्याच निर्यांना हात घालू लागलेत
प्रश्न पडणं साहजिक आहे की खरं नेमकं काय
कागदी प्रेम की प्रेमळ कागदीपण?
जेव्हा शाईतून उमटलं कागदावर तेव्हाचे उमाळे खोटे होते?
की लिहून झाल्यावर मनात जागलेलं श्वापद खरं होतं?
पुस्तकाच्या पानावर डोंगराएवढा दिसणारा
वर्तमानपत्रात यत्किंचित डागाळलेल्या शाईच्या थेंबाएवढा होतो?
कला की कलाकार? कलेची पातळी की कलाकाराची नैतिक मूल्ये?
निर्मितीनेच निर्मितीचंच मूल्यमापन मुळात का करावं?.. आपापलं मत... सापेक्ष...
आपण सगळेही एकाच निर्मात्याची निर्मिती ना?.. निर्माता संदिग्ध.. पण तरीही...
रसिकानं कलेलाच दाद द्यावी हेच खरं.. कलाकाराला दिली असो नसो!
कलाकृती ही फक्त कलेशीच प्रामाणिक हवी.. बाकी कशाशी असो नसो! '
बर्याच चेहर्यांवर हे ऐकून हायसंच वाटल्याचं स्पष्ट कळत होतं
तरी व्यक्ती अन अभिव्यक्तीवर संवाद रंगणार.. हेही दिसत होतं!
टोपी उचलली आहे
टोपी उचलली आहे
कागदी प्रेम की प्रेमळ
कागदी प्रेम की प्रेमळ कागदीपण?
अप्रतिम, प्रश्न पडणं साहजिक
अप्रतिम,
प्रश्न पडणं साहजिक आहे की खरं नेमकं काय
कागदी प्रेम की प्रेमळ कागदीपण? ....>>>>> ग्रेट
पुस्तकाच्या पानावर डोंगराएवढा दिसणारा
वर्तमानपत्रात यत्किंचित डागाळलेल्या शाईच्या थेंबाएवढा होतो?
कला की कलाकार? कलेची पातळी की कलाकाराची नैतिक मूल्ये?
निर्मितीनेच निर्मितीचंच मूल्यमापन मुळात का करावं?.. आपापलं मत... सापेक्ष...
आपण सगळेही एकाच निर्मात्याची निर्मिती ना?.. निर्माता संदिग्ध.. पण तरीही... >> सुपर्ब
वाह ... क्या बात है...
जेव्हा शाईतून उमटलं कागदावर
जेव्हा शाईतून उमटलं कागदावर तेव्हाचे उमाळे खोटे होते?
की लिहून झाल्यावर मनात जागलेलं श्वापद खरं होतं?>>>>
वा! सुंदरच... स्पष्ट तरीही गूढ.... वरकरणी समजायला सोपी दिसणारी पण खोलवर अर्थ असणारी...
सुंदर कविता माणिकराव!!
सुंदर कविता माणिकराव!! कुसुमाग्रजांची आठवण झाली!
वाह ..केवळ .अप्रतिम.. !!! (
वाह ..केवळ .अप्रतिम.. !!! ( विचारात पाडते कविता )
तरी व्यक्ती अन अभिव्यक्तीवर
तरी व्यक्ती अन अभिव्यक्तीवर संवाद रंगणार.. हेही दिसत होतं!>>
तेच तर..... असो, चालायचच.
आवडली कविता.
आवडली .... मस्तच.
आवडली .... मस्तच.
धन्यवाद मित्रांनो!
धन्यवाद मित्रांनो!